अनेकदा आपला कान दुखत असतो. कान हा अनेक कारणांमुळे दुखतो. येथे कान का व कशामुळे दुखतो, त्याची कारणे आणि कान दुखतो त्याच्यावर कोणते औषध उपचार व घरगुती उपाय करावेत याची माहिती डॉ. सतीश उपळकर यांनी येथे दिली आहे.
कान का दुखतो, त्याची कारणे :
अनेक कारणांनी कान दुखत असतात. यामध्ये कानात इन्फेक्शन होणे, कानात मळ अधिक होणे ही कारणे प्रमुख असतात. कान का दुखतो याची कारणे पुढील्रमाणे असू शकतात,
- कानात बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यामुळे,
- सर्दी झाल्याने,
- सायनस इंन्फेकशनमुळे,
- कानात मळ अधिक झाल्याने,
- कानाचा पडदा फाटल्यामुळे,
- कानात काडी अथवा टोकदार वस्तू घालून जखम झाल्यामुळे कान दुखतो. [1]
कान दुखतो यावरील उपाय :
लसूण –
दोन ते तीन लसूण पाकळ्या बारीक करून मोहरीच्या तेलात गरम कराव्यात. थंड झाल्यावर तेल गाळून घ्यावे. ह्या तेलाचे 2-3 ड्रॉप्स दुखणाऱ्या कानात घालावे. कान दुखतो यावर हा घरगुती उपाय खूप उपयुक्त ठरतो.
कांदा –
कांद्यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. यासाठी कांदा थोडा गरम करून त्याचा चमचाभर रस काढावा. या रसाचे 2 ते 3 ड्रॉप्स कानात दिवसातून 3 वेळा घालावेत.
आले –
आल्याच्या रसाचे 2 ते 3 ड्रॉप्स कानात दिवसातून 3 वेळा घालावे. कारण आल्यामध्ये वेदना कमी करणारे आयुर्वेदिक गुणधर्म असतात. अशाप्रकारे कान दुखतो यावर हा आयुर्वेदिक उपाय फायदेशीर ठरतो.
कान दुखतो यासाठी औषध उपचार :
नेमका कशामुळे कान दुखतो आहे त्यानुसार त्यावरील औषध उपचार ठरतात. आपले डॉक्टर हे कान दुखत असल्यास त्यावर वेदना कमी करण्यासाठी paracetamol, ibuprofen सारखी वेदनाशामक गोळ्या औषधे देतील. याशिवाय इन्फेक्शन झाल्यामुळे कान दुखत असल्यास antibiotics औषध किंवा eardrops देतील. आणि जर कानात मळ अधिक झाल्याने कान दुखत असल्यास त्यासाठी मळ बाहेर निघण्यासाठी Clearwax सारखा eardrops दिला जाईल. कान दुखतो त्याच्यावर अशाप्रकारे आपले डॉक्टर उपचार करतील.
हे सुध्दा वाचा..
कानातील मळ काढण्याचे उपाय जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
Dr. Satish Upalkar article about Earache treatment in Marathi.