केस गळण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी कांदा हा खूप उपयुक्त ठरतो. कांद्याच्या रसात सल्फरचे प्रमाण अधिक असते. यांमुळे टिश्यूतील कोलेजनच्या निर्मितीस मदत होऊन केसांची वाढ होते तसेच केस मजबूतही होतात. यासाठी केस गळतीवर घरगुती उपाय म्हणून कांदा हा खूप गुणकारी ठरतो. 2002 मध्ये केलेल्या संशोधनानुसार, केस गळती रोखण्यासाठी कांद्याचा रस उपयुक्त ठरू शकत असल्याचे दिसून आले […]
Diseases and Conditions
जळवात वरील घरगुती उपाय जाणून घ्या – Cracked heels
जळवात (Cracked Heels) : तळपायाला भेगा पडणे या त्रासाला जळवात असे म्हणतात. जळवात ही तळव्याची एक सामान्य समस्या असून याचा त्रास अनेकांना होत असतो. याला English मध्ये Cracked Heels ह्या नावाने ओळखले जाते. जळवात होण्याची कारणे (Cracked Heels causes) जळवात होण्यास अनेक कारणे जबाबदार असतात. यामध्ये, • अनवाणी चालण्याच्या सवयीमुळे, • अधिक वेळ उभे राहण्याच्या […]
शौचावाटे रक्त पडण्याची कारणे, लक्षणे व उपचार : Rectal Bleeding
अनेक कारणांमुळे शौचातून रक्त पडत असते. यातील काही कारणे ही सामन्य तर काही कारणे गंभीरही असू शकतात. जास्त दिवस शौचामधून रक्त पडत असल्यास त्याचा परिणाम एकूणच आरोग्यावरही होऊन हिमोग्लोबिन कमी होणे, ऍनिमिया यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
लवकर केस पांढरे होण्याची कारणे व त्यावरील उपाय जाणून घ्या
केस पांढरे का व कशामुळे होतात..? तरुण वयात केस पांढरे होण्याची समस्या अनेकांना आहे. मेलेनिनची कमतरता, अनुवंशिकता, चुकीचा आहार, धूळ-प्रदूषण, मानसिक ताणतणाव अशा अनेक कारणांमुळे केस वेळेपूर्वी पांढरे होऊ लागतात. लवकर केस पांढरे होण्याची कारणे : मेलेनिन पिग्मेंटेशनच्या कमतरतेमुळे केसांचा रंग पांढरा होऊ लागतो. वाढत्या वयाबरोबरच शरीरातील मेलेनिनचं प्रमाण कमी होऊ लागते त्यामुळे केस पांढरे […]
अल्झायमर आजाराची कारणे, लक्षणे व उपचार : Alzheimer’s disease
अल्झायमर (Alzheimer’s disease) : अल्झायमर हा मेंदूशी संबंधित एक विकार असून तो प्रामुख्याने 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांत अधिक प्रमाणात आढळतो. अलझायमर आजारामुळे रुग्णाची स्मरणशक्ती हळूहळू कमी होत जाऊन विसराळूपणा अधिक वाढतो. काहीवेळा 65 पेक्षाही कमी वयाच्या लोकांना हा आजार होऊ शकतो. अल्झायमर आजार होण्याची कारणे (Alzheimer’s causes) : अल्झायमर हा रोग कशामुळे होतो याचे […]
स्थानभ्रष्ट गर्भधारणा कारणे, लक्षणे आणि उपचार : Ectopic Pregnancy
स्थानभ्रष्ट गर्भधारणा – Ectopic Pregnancy : गरोदरपणात ‘एक्टोपिक प्रेग्नन्सी’ ही एक गंभीर अशी स्थिती असून यामध्ये गर्भधारणा ही गर्भाशयात होण्याऐवजी गर्भनलिकेमध्ये होते. Ectopic pregnancy ला मराठीमध्ये स्थानभ्रष्ट गर्भधारणा किंवा अस्थानिक गर्भावस्था असेही म्हणतात. सामान्यपणे गर्भ हा गर्भाशयात (गर्भ पिशवीत) वाढणे आवश्यक असते. मात्र असे न होता जर गर्भ हा गर्भनलिकेमध्येचं वाढू लागल्यास अनेक गंभीर समस्या […]
केस जाड होण्यासाठी हे करावे घरगुती उपाय
केसांची जाडी वाढवणे (Thicker Hair) : केसांचा आकार पातळ होण्याची अनेक कारणे असतात. जसे शारीरिक आजार, मानसिक तणाव, हार्मोन्समधील असंतुलन, पोषकतत्वांची कमतरता, प्रदूषण, एलर्जी, अयोग्य ब्यूटी प्रोडक्टचा अतिवापर, केसांची देखभाल न करणे यांमुळे केसांचा आकार पातळ होऊ शकतो. पातळ झालेले केस कमजोर होऊन सहज तुटतही असतात. याशिवाय केसांचा आकार पातळ झाल्यामुळे केस गळतीचे प्रमाणही वाढते. […]
केस लवकर वाढवण्यासाठी हे करा घरगुती उपाय
केस लवकर वाढवणे (Grow Hair Faster) : आपले केस काळे, दाट आणि चमकदार असावेत असे प्रत्येकालाचं वाटत असते. काही जणांचे केस लवकर लवकर वाढत असतात तर काहींचे सावकाशपणे वाढत असतात. तसेच केस गळून पातळ होण्याच्या तक्रारीही अनेकांना भेडसावत असतात. त्यामुळे केस लवकर वाढावेत अशी अनेकांची इच्छा असते. यासाठी याठिकाणी केस लवकर वाढवण्याचे उपाय दिले आहेत. […]
चरबीच्या गाठी येणे याची कारणे, लक्षणे व उपचार
अंगावर चरबीच्या गाठी येणे – Lipoma : शरीराच्या त्वचेवर होणाऱ्या चरबीच्या गाठींना लिपोमा (Lipoma) असे म्हणतात. त्वचेवर चरबीच्या गाठी येण्याची समस्या अनेकांना असते. शरीराच्या कोणत्याही भागावर अशा चरबीच्या गाठी होऊ शकतात. प्रामुख्याने मान, खांदा, हात, मांडी, पोट आणि पाटीवर अशा गाठी होत असतात. ह्या चरबीच्या गाठी benign ट्युमर प्रकारच्या असतात. त्यामुळे त्या गाठी कॅन्सरच्या नसतात. […]
मान अवघडली असल्यास हे करा घरगुती उपाय – Stiff neck
मान आखडणे (Neck stiffness) : रात्री चुकीच्या स्थितीत झोपल्यामुळे किंवा झोपताना योग्य उशी न वापरल्याने सकाळी मान दुखू लागते. या त्रासाला मान आखडणे, मान जखडणे किंवा मान लचकणे असेही म्हणतात. मान अवघडल्यामुळे त्याठिकाणी दुखू लागते. अशावेळी मान वळवताना तीव्र वेदना जाणवू लागतात. मानेतील मांसपेशी व सॉफ्ट टिश्यू यांमध्ये ताण आल्याने हा त्रास होत असतो. आजकालच्या […]