तांब्याच्या भांड्यातील पाणी – तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आयुर्वेदातही तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे महत्व सांगितलेले आहे. तांब्याच्या भांड्यात कमीत कमी 8 तास ठेवलेले पाणी प्यायल्यास शरीरातील विविध अपायकारक घटक बाहेर फेकण्यास मदत होते. शरीरातील अशुद्धी दूर झाल्याने यकृत आणि किडनी निरोगी राहण्यास मदत होते. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे हे मायग्रेन डोकेदुखी, […]
Health Tips
सायनसचा त्रास होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार – Sinusitis
सायनस इन्फेक्शन – Sinusitis : आपल्या चेहऱ्याच्या मागे कवटीची हाडे असतात. या कवटीच्या हाडांमध्ये कपाळ, नाक आणि गालाच्या ठिकाणी काही पोकळ भाग असतात, त्या पोकळ भागांना सायनसेस असे म्हणतात. या सायनसेसमध्ये पातळ आणि वाहणारा द्रवपदार्थ तयार होत असतो. त्याला श्लेष्मा (म्युकस) असे म्हणतात. काही कारणांमुळे सायनसमध्ये हा द्रवपदार्थ जास्त झाल्यास तो नाकावाटे बाहेर येऊ लागतो. […]
सर्दी होण्याची कारणे व सर्दी कमी करण्यासाठी घरगुती उपाय
सर्दी होणे – Common cold : सर्दी होणे ही एक सामान्य समस्या असून अनेक कारणांनी सर्दी होऊ शकते. श्वसन मार्ग, नाक व घशामध्ये व्हायरल इन्फेक्शनमुळे सर्दी होत असते. सर्वच ऋतूमध्ये सर्दीचा होऊ शकतो. विशेषतः थंडी आणि पावसाच्या दिवसात हा त्रास हमखास होत असतो. सर्दी होण्याची कारणे (Common cold causes) : साधारणपणे सर्दी ही Rhinovirus नावाच्या […]
मुळव्याध झाल्यास असा आहार घ्यावा : Piles Diet plan
मूळव्याध आणि आहार पथ्य : आजकाल अनेकांना मूळव्याधीचा त्रास सतावत आहे. बैठी जीवनशैली आणि अयोग्य आहार ही प्रमुख कारणे मुळव्याध होण्यास कारणीभूत ठरत आहेत. मूळव्याध म्हणजे गुदद्वाराजवळ असलेल्या शिरांना सूज येते. यामुळे शौचाच्या वेळेस वेदना होणे, रक्त पडणे, खाज येणे अशी लक्षणे जाणवतात. मूळव्याध झाल्यास अनेक दिवस योग्य आहार घेणे आवश्यक असते. मूळव्याधीचा त्रास कमी […]
Exercise tips: व्यायाम कसा करावा व व्यायाम करताना घ्यावयाची काळजी
व्यायाम कसा करावा..? नियमित व्यायाम करण्याचे अनेक फायदे आहेत. आपले वजन आटोक्यात राहते, शरीर मजबूत आणि निरोगी बनते. असे असूनही व्यायाम करताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते. त्यामुळे योग्य काळजी न घेता केलेल्या व्यायामाने होणारे नुकसान टाळता येईल. व्यायाम कसा करावा? किती प्रमाणात करावा? योग्य व्यायाम प्रकार कसा निवडावा? यासंबंधी अनेक प्रश्न निर्माण होतात. […]
हार्ट अटॅक येऊ नये यासाठी हे उपाय करावे -Prevent heart attack
हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी उपाय – हार्ट अटॅकचे स्वरुप आज अंत्यंत चिंताजनक बनले आहे. कारण पूर्वी चाळीशीनंतर आढळणारा हृद्यविकार आज 25 ते 30 वयापुर्वीच युवकांमध्ये अधिक प्रमाणात आढळत आहे. बदललेली जीवनशैली, शारिरीक श्रमाचा अभाव, मानसिक तानतणाव या प्रमुख कारणांमुळे हृद्यासंबंधी विकारांचे प्रमाण वाढत आहे. परीणामी अकाली मृत्युचेही प्रमाण वाढत आहे. यासाठी प्रत्येकाने आपल्या हृद्याची काळजी घेणे […]
मायग्रेन डोकेदुखी कारणे, लक्षणे व उपाय – Migraine symptoms
मायग्रेन – Migraine : मायग्रेन हा डोकेदुखीचा एक प्रकार असून याला अर्धे डोके दुखणे किंवा मायग्रेन डोकेदुखी असेही म्हणतात. अनेकांना वरचेवर हा त्रास होत असतो. पुरुषांच्यापेक्षा स्त्रियांमध्ये याचे प्रमाण अधिक आढळते. मायग्रेनमध्ये डोक्याच्या एका बाजूला खूपच वेदना सुरू होतात. याबरोबरच डोळ्यासमोर अंधारी येणे, काजवे चमकणे, मळमळ व उलट्या होणे असे त्रास मायग्रेन डोकेदुखीमध्ये होत असतात. […]
वजन कमी करण्यासाठी हे उपाय करा : Weight loss tips
वजन कमी करणे (Weight loss) – बैठी जीवनशैली, शारीरिक श्रमाचा अभाव आणि चुकीचे खानपान यामुळे आज सर्वच वयाच्या व्यक्तींमध्ये लठ्ठपणाची समस्या भेडसावत आहे. अनेकजण वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करीत असतात. मात्र अपेक्षेप्रमाणे त्यांचे वजन कमी होत नाही. वजन कमी होण्यासाठी योग्य नियोजन असावे लागते. वजन का कमी केले पाहिजे ..? शरीरातील चरबीची जास्त प्रमाणात वाढ […]
काळी मिरी खाण्यामुळे होणारे फायदे व तोटे : Black pepper benefits
काळी मिरी – Black pepper : मिरी हा मसाल्यातील एक महत्वाचा असा घटक पदार्थ आहे. मिरीला मसाल्यांचा राजा असेही म्हणतात. यातील औषधी गुणांमुळे मिरीचे आयुर्वेदातही विशेष महत्व सांगितलेले आहे. मिरीमध्ये असणाऱ्या Piperine ह्या अँटी-ऑक्सिडंटमुळे कॅन्सर, हृद्यविकार यांपासून रक्षण होते. रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होते, ब्लड शुगरसुध्दा मिरीमुळे कमी होते. सूज कमी करणारे घटकही मिरीत असतात. […]
त्वचेला खाज सुटणे याची कारणे व उपाय : Itching Skin
त्वचेला खाज सुटणे – Itching Skin : विविध कारणांनी त्वचेला खाज सुटते. त्वचेतील इन्फेक्शन, अॅलर्जी यामुळे त्वचेला खाज येत असते. तसेच घामोळ्या, सोरायसिस, गजकर्ण यासारखे त्वचाविकार यामुळेही त्वचेला खाज सुटत असते. त्वचेला खाज सुटण्याची कारणे – त्वचा कोरडी पडण्यामुळे त्वचेला खाज सुटते. हिवाळ्यात हा त्रास अधिक होतो. त्वचा संबंधित समस्या जसे घामोळ्या, सोरायसिस, गजकर्ण नायटे, […]