अर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास

9832
views

अर्धशिशी म्हणजे काय..?
मायग्रेन (Migraine) हा डोकेदुखीचा एक प्रकार असून याला अर्धशिशी असेही म्हणतात. मायग्रेनमध्ये डोक्याच्या एका भागात खूपच वेदना सुरू होतात. मायग्रेनमधील डोकेदुखीचा त्रास हा काही तासांपासून ते काही दिवसांपर्यंतही असू शकते. मायग्रेनचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना वरचेवर हा त्रास उद्भवत असतो. काही रुग्णांना अर्धशिशीचा त्रास सुरू व्हायच्या आधी त्यांना शरीराकडून ‘मायग्रेनचा त्रास सुरू होणार आहे..!’ अशा सूचनाही मिळू शकतात त्या सुचनाना ऑरा असे म्हणतात. जेंव्हा अर्धशिशीचा अॅटॅक येतो तेंव्हा उजेड अजिबात सहन न होणे, डोळ्यांनी अंधुक दिसणे, मळमळणे आणि कोणतेही शारीरिक काम केल्याने डोक्यातील वेदना वाढणे ही अर्धशिशीच्या आजारात लक्षणे दिसून येतात.

मायग्रेन होण्याची कारणे :
बदललेली जीवनशैली, अयोग्य आहार, अनुवंशिकता, मानसिक ताणतणाव, वातावरणातील बदल, उच्च रक्तदाबाचा त्रास असणे किंवा काही औषधांच्या साईड इफेक्ट्स यासारख्या कारणांमुळे आजकाल मायग्रेनचा त्रास होण्याचे प्रमाण लोकांमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे.
• पित्त वाढविणारा आहार घेतल्याने जसे, मसालेदार पदार्थ, तेलकट–तिखट-खारट पदार्थ, फास्टफूड, चहा-कॉफी अधिक प्रमाणात घेतल्याने मायग्रेनचा त्रास होतो.
• ‎खूप जागरण करण्यामुळे मायग्रेनचा त्रास होतो.
• ‎भरपूर वेळ स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्हीकडे डोळे ताणून दिल्यामुळे मायग्रेनचा त्रास होतो.
• ‎डोळ्यांवर अचानक खूप प्रकाश आल्यामुळे, उग्र वासामुळेही किंवा मोठा गोंगाट कानावर ऐकू आल्यामुळेही काही जणांना मायग्रेनचा त्रास होतो.
• ‎सिगारेट-तंबाखू, धूम्रपान, मद्यपणाच्या व्यसनामुळे हा त्रास होत असतो.
• ‎हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे महिलांना पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात मायग्रेनचा त्रास होत असतो. विशेषतः मासिक पाळीच्या दिवसात अनेक महिलांना मायग्रेनचा त्रास होऊ लागतो.

मायग्रेनची लक्षणे :
• डोके दुखायला लागते.
• ‎मायग्रेनमध्ये प्रामुख्याने डोक्याच्या एका बाजूकडील भागात प्रचंड वेदना सुरु होतात.
• ‎डोळ्यांसमोर अंधुक दिसणे, तारे चमकणे.
• ‎प्रकाश आणि आवाज सहन न होणे.
• ‎मळमळणे, उलट्या होणे.
• ‎बैचेनी, अशक्तपणा, भूक लागत नाही.
• ‎अधिक घाम येणे.
• ‎कशावरही लक्ष लागत नाही.
काही रुग्णांना अर्धशिशीचे डोके दुखत असताना त्या काळापुरता शरीराला अर्धागवायू (पक्षघात) होऊन हात-पाय हलवणेही शक्य होत नाही.

विशेष सूचना :
ही माहिती Copy Paste करू नका..

हा लेख डॉ. सतीश उपळकर यांनी लिहिला आहे. ही सर्व माहिती हेल्थ मराठी डॉट कॉम यांची आहे. ही माहिती आपणास कॉपी करून अन्य ठिकाणी आमच्या परवानगी शिवाय वापरता येणार नाही. तसे केलेले आढळल्यास कॉपीराईट कायद्याखाली कारवाई करण्यात येईल.

हे करा..
मायग्रेनचा त्रास असणाऱ्यांनी मायग्रेन डोकेदुखीचा त्रास होऊ नये म्हणून ह्या करा उपाययोजना :
• संतुलित आहार घ्यावा. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या यांचा समावेश करा. ज्यादा वेळ उपाशी राहू नका.
• ‎दिवसभरात किमान 7 से 8 ग्लास पाणी प्यावे.
• ‎मसालेदार पदार्थ, तेलकट–तिखट-खारट पदार्थ, फास्टफूड ह्यासारखे पदार्थ वारंवार खाणे टाळावे. म्हणजे पित्त वाढविणारे पदार्थ खाऊ नका.
• ‎चहा-कॉफी वारंवार पिणे टाळा.
• ‎पोट साफ राहील याची काळजी घ्या.
• ‎स्मार्टफोन, काम्प्युटर, टीव्हीसमोर सतत बसू नका.
• ‎जास्त प्रकाशाच्या उजेडकडे पाहणे टाळा.
• ‎जागरण करणे टाळा. दररोज किमान 6 तासांची झोप आवश्यक असते. पुरेशी झोप घ्यावी.
• ‎नियमित व्यायाम करावा. दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करावा. मोकळ्या हवेत फिरायला जावे.
• ‎मानसिक ताणतणाव, चिंता यापासून दूर रहा. मनशांत ठेवण्यासाठी योगा, प्राणायाम, ध्यानधारणा करावी.
• ‎वारंवार डोकेदुखी होत असल्यास डोळ्यांचीही तपासणी करून घ्या.
• ‎तंबाखू, गुटखा, सिगरेट, बीडीचे व्यसन करणे टाळा.
• ‎मायग्रेन डोकेदुखीवर सतत वेदनाशामक औषधे घेणे टाळा.
• ‎मायग्रेनचा त्रास होऊ लागल्यास ज्या भागात दुखते तेथे थंड पाण्याची पट्टी ठेवा. असे केल्याने त्रास काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.
• ‎मायग्रेन त्रास होऊ लागल्यास आल्याचा तुकडा खल्यानेही आराम मिळतो.

डॉक्टरांकडून वेळीच उपचार करून घ्या..
वारंवार अर्धशिशीचा (मायग्रेनचा) त्रास होत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अर्धशिशीवर उठसुठ वेदनाशामक गोळ्या (पेनकिलर्स) घेणे धोकादायक ठरू शकते. यापेक्षा वारंवार अर्धशिशीचा त्रास होत असल्यास डॉक्टरांकडे जाऊन निदान व तपासणी करून योग्य उपचार करून घ्यावेत. मायग्रेनचा आजार तसा सामान्य असला तरीही गोष्ट असते आपल्या ‘मेंदूची’..! म्हणून आधीच सावध राहिलेले बरे.

– डॉ. सतीश उपळकर
CEO, हेल्थ मराठी नेटवर्क

अर्धशिशी म्हणजे, अर्धशिशी आजार, अर्धशिशी माहिती मराठीतून, मायग्रेन म्हणजे काय, अर्ध डोकेदुखी उपाय, अर्धशिशीवर उपाय, डोकेदुखी आयुर्वेदिक उपचार, मायग्रेन कशामुळे होतो, मायग्रेनची लक्षणे, अर्धशिशी आणि डोकेदुखी, अर्धशिशी आयुर्वेदिक उपचार, अर्धशिशी कारणे, का होतो मायग्रेन, मायग्रेन घरगुती उपाय, अर्धे डोके दुखणे उपाय, डोकेदुखीवर उपाय, डोकेदुखी कमी करण्याचे उपाय, डोकेदुखी साठी उपाय, डोकेदुखीवर रामबाण उपाय, डोके दुखीवर घरगुती उपाय, डोके दुखणे उपाय, डोकेदुखी वर औषध, ardha shishi upay in marathi, dokedukhi upchar in marathi, ardha dokedukhi upay, dokedukhi in marathi, dokedukhi gharelu upay, dokedukhi tablet, marathi gharguti upay, dokedukhi karne, pitta var upay, migraine information in marathi.

आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.