
Black Pepper nutritional benefits in Marathi.
आपल्या जेवणामध्ये मिर्यांचा वापर तिखटाला पर्याय म्हणून केला जातो. परंतु काळ्या मिर्याचे औषधी गुणधर्म व्यापक आहेत.
मिरे उष्ण व तीक्ष्ण असल्याने कफ व वातनाशक आहेत. पित्ताची तक्रार असलेल्यांनी मात्र मिरे जपून वापरावेत.
काळी मिरीचे फायदे :
• मिरे कफ विलयनकर आहेत. सायनसमध्ये साठलेला कफ, दम्यात छातीत साठलेला कफ पातळ होऊन बाहेर पडण्यासाठी त्यांचा उपयोग होतो.
• मिरे हे दिपन आणि पाचन गुणांची आहेत त्यामुळे अन्नपचनासाठी त्याचा उपयोग होईल.
• मिऱ्यात ‘अ’, ‘ब’, ‘क’ आणि ‘ई’ ही जीवनसत्त्वे असतात व त्यांचा शरीराला अँटीऑक्सिडंट म्हणूनही उपयोग होतो. त्यामुळे ‘ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस’पासून हृदय, मूत्रपिंड, यकृत, डोळे, त्वचा अशा अवयवांचे रक्षण करण्यासाठी ते मदत करतात.
• काळे मिरे हे कर्करोग प्रतिबंधक समजले जातात. आपल्या शरीरातल्या विविध पेशीवर आघात करणारे छोटे मोठे विकार काळ्या मिर्याच्या काढ्याने आटोक्यात येऊ शकतात.
• मिऱ्यात सूजनाशक व जंतूनाशक गुणधर्म देखील आहेत.
• काळे मिरे त्वचेसाठी चांगले समजले जातात. संधीवाताच्या काही प्रकारांमध्ये जेव्हा सांध्यांचा दाह होतो तेव्हा काळे मिरे हा दाह कमी करतात. विशेषतः गुडघ्यातील दाह काळ्या मिर्यांनी कमी होतो.
• काळे मिरे अन्नपचनासही उपयुक्त आहेत.
विविध आहार घटकांची, फळांची, भाज्यांतील पोषकतत्वे यांची मराठी माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा..
ही माहिती आपणास आवडल्यास आमचे Youtube चॅनेल subscribe जरूर करा. असेच उपयुक्त माहितीपूर्ण आरोग्यविषयक व्हिडिओ आपणास मोफत उपलब्ध होतील. यासाठी खालील YouTube subscribe बटनावर क्लिक करा.
घशात दुखत असल्यास हे करा घरगुती उपाय – Sore throat treatment...