पार्किन्सन्स (कंपवात) कारणे, लक्षणे, उपचार मराठीत माहिती – Parkinson’s disease in Marathi

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

Parkinson’s disease in Marathi, Parkinson’s treatments in marathi, Parkinson’s causes, symptoms, diagnosis and treatment in Marathi language.

कंपवात म्हणजे काय..?

Parkinson’s disease information in Marathi
कंपवात किंवा पार्किन्सन्स हा प्रामुख्याने वृद्धांचा मेंदूसंबंधित आजार असून 60 वर्षानंतरच्या वृद्ध व्यक्तीमध्ये हा आजार होण्याचे प्रमाण जास्त आहे. काहीवेळा साठ वर्षाच्या आतील लोकांनाही पार्किन्सन्सचा आजार होऊ शकतो. पार्किन्सन्स डिसिजमुळे अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या निर्माण होतात. या आजारावर निश्चित असा उपचार उपलब्ध नाही. मात्र योग्यवेळी यावर ट्रीटमेंट घेतली तर ही समस्या काही प्रमाणात कमी केली जाऊ शकते तसेच पुढे निर्माण होणारी अनेक लक्षणेही टाळता येतील.

पार्किन्सन्सची कारणे (कंपवाताची कारणे) :

Parkinson’s causes in Marathi
या आजाराची कारणे अजून निश्चित सांगता येत नाहीत जगभर याबाबतचे संशोधन चालू आहे. पार्किन्सन्स डिसिज हा न्यूरोडिजनरेटीव्ह (मेंदूसंबंधी) आजार आहे. अनुवांशिक घटक, वृद्धापकाळ, मेंदूतील बिघाड आणि काही औषधांचे दुष्परिणाम ह्या आजारास कारणीभूत ठरतात.

सामान्यतः आपल्या मेंदूमध्ये शरीराची हालचाल व तोल सांभाळण्याचे कार्य करण्यासाठी आवश्यक असणारे डोपामिन नावाचे एक रसायन तयार होत असते. तर पार्कीन्संन्समध्ये डोपामिन तयार करणार्‍या मेंदूतील पेशी हळूहळू कमी होऊ लागतात. त्यामुळे शरीराच्या हालचाली मंदावतात, तोल सांभाळता येत नाही, शरिराला कंप सुटतो, हाता-पायाचे स्नायू कडक होतात यासारखी लक्षणे दिसू लागतात आणि जसजसे या पेशी व त्यांचे कार्य कमी होत जाते तसतसे लक्षणे वाढत जातात.

पार्किन्सनची लक्षणे (कंपवाताची लक्षणे मराठीत) :

Parkinson’s disease symptoms in Marathi
• शरीराला कंप सुटतो (Tremors) पार्किन्सन्स मध्ये हात, बोटे, खांदा, पाय यांमध्ये कंप होऊ लागतो.
• ‎शारीरिक हालचाली मंदावणे. अंघोळ करणे, कपडे घालणे यासारख्या दररोजच्या क्रिया करण्यास वेळ लागणे.
• ‎हाताने लिहिताना कंप सुटतो.
• ‎या आजारात स्नायू कडक होतात त्यामुळे स्नायू दुखतात.
• ‎शरीराचा तोल सांभाळता येत नाही.
• ‎चालताना जवळजवळ पावले टाकली जातात.
• ‎अन्न गिळताना त्रास होणे.
• ‎झोप न लागणे.
• ‎डिप्रेशन आणि तणावाखाली वावरणे.
वारंवार लघवीस जावे लागणे ही लक्षणे दिसू शकतात.

पार्किन्सन उपचार (कंपवात उपचार) :

Parkinson’s treatments in marathi
पार्किन्सन आजार हा उपचारांनी पूर्णपणे बरा होत नाही. मात्र योग्यवेळी यावर ट्रीटमेंट घेतली तर ही समस्या काही प्रमाणात कमी केली जाऊ शकते तसेच पुढे निर्माण होणारी अनेक लक्षणेही टाळता येतील.
पार्किन्सनमध्ये औषधोपचाराचा उद्देश हा असलेल्या लक्षणावर नियंत्रण ठेवणे, नवीन लक्षणे निर्माण करण्यास अटकाव करणे आणि रुग्णाचे जगणे सुसह्य करणे असा असेल.
डोपामिनच्या कमतरतेने आजार होत असल्याने Dopamine promoter औषधे दिली जातात. याशिवाय कंप कमी करण्यासाठी Anti-Tremor औषधे, नैराश्य कमी करण्यासाठी Antidepressant औषधे दिली जातील. तसेच योग्य व्यायाम, स्पीचथेरपी, फिजिओथेरपी, योगासने यांचाही उपचारामध्ये समावेश करण्यात येईल.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

औषधाची परिणामकारकता कमी होऊन हालचालीवर मर्यादा येऊ लागल्यास शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो..काही लक्षणे दूर करण्यासाठी थलमोटोमी (Thalamotomy), पॅलिडोटॉमि (Pallidotomy) डीपब्रेन स्टीम्युलेशन (Deep brain stimulation) अशा शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत.

हे सुद्धा वाचा..
आमवात म्हणजे काय
पक्षाघात, लकवा मराठीत माहिती
स्किझोफ्रेनिया आजार मराठीत माहिती

Kanpavat, kampvat in marathi mahiti, kampvat karne, lakshne, test, gharguti upay, home remedies, upchar marathi kampvat disease meaning.