हार्ट अटॅकपासून दूर राहण्यासाठी स्मार्ट टिप्स :

हार्ट अटॅकचे स्वरुप आज अंत्यंत चिंताजनक बनले आहे. कारण पूर्वी चाळीशीनंतर आढळणारा हृद्यविकार आज 25 ते 30 वयापुर्वीच युवकांमध्ये अधिक प्रमाणात आढळत आहे. बदललेली जीवनशैली, शारिरीक श्रमाचा अभाव, मानसिक तानतणाव या प्रमुख कारणांमुळे हृद्यासंबंधी विकारांचे प्रमाण वाढत आहे. परीणामी अकाली मृत्युचेही प्रमाण वाढत आहे. हार्ट अटॅक विषयी सर्व माहिती जाणून घ्या.

यासाठी प्रत्येकाने आपल्या हृद्याची काळजी घेणे गरजेचे बनले आहे. यासाठी योग्य आहार, विहाराचे पालन करणे, नियमित व्यायाम करणे, वजन आटोक्यात ठेवणे, वेळोवेळी हृद्यसंबंधी तपासणी करुन घेणे आणि हृद्याशी संबंधीत सामान्य समस्याविषयी जागरुक असणे गरजेचे आहे. हार्ट अटॅकपासून बचाव कसा करावा, ह्रदय विकाराचा झटका येऊ नये यासाठी काय काळजी व दक्षता घ्यावी ही माहिती येथे दिली आहे.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

हार्ट अटॅकला दूर ठेवण्याचे उपाय :

Tips for Avoid Heart attack in Marathi.
हार्ट अटॅकचा धोका वाढवणाऱया कारणांपासून दूर राहिल्यास हार्ट अटॅक येण्यापासून दूर राहता येते. यासाठी,
उच्चरक्तदाब, मधुमेह, हाय ब्लड कोलेस्टेरॉल किंवा लठ्ठपणा हे विकार असल्यास त्यांवर तज्ञांद्वारा योग्य उपचार करुन घ्यावेत.
• नियमित वैद्यकिय तपासणी करुन घ्या.
• ब्लड प्रेशरची नियमित तपासणी करा.
• कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर लक्ष ठेवा.
मधुमेह असल्यास रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे आवश्यक.
उच्चरक्तदाब (हाय ब्लडप्रेशरचा) त्रास असल्यास डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमित घ्या.
• ‎वजन आटोक्यात ठेवावे. वजन आटोक्यात कसे ठेवावे हे ही जाणून घ्या.
• ‎शारीरीकदृष्ट्या सक्रिय रहावे. नियमित व्यायाम, व योगासने करावित. दररोज किमान 30-45 मिनिटे व्यायामासाठी द्यावित.
• ‎सॅच्युरेटेड फैट्स, अंड्यातील पिवळा बलक, मांसाहार, चरबीजन्य पदार्थ, तेलकट पदार्थ, फास्टफूड, बेकरी पदार्थ, मिटाई, खारट, गोड पदार्थ जास्त प्रमाणात खाणे टाळावे.
• सॅच्युरेटेड फैट्स म्हणजे सामान्य तापमानाला गोठणारे पदार्थ. जसे तूप, लोणी, साय, खवा, प्राणिज चरबी, चरबीजन्य पदार्थ, चॉकलेट्स, वनस्पती तूप (डालडा), अंड्यातील पिवळा बलक इत्यादी पदार्थ खाणे टाळावे. सॅच्युरेटेड फैट्समुळे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल वाढते.
• ‎आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, विविध फळे, मोड आलेली कडधान्ये, लसूण, तंतुमय पदार्थांचा समावेश अधिक असावा.
• धुम्रपान, तंबाखू, मद्यपान इ. व्यसनांपासून दूर राहावे. धुम्रपान, मद्यपान, तंबाखुसेवनाने हार्ट अटॅकचा धोका अधिक पटीने वाढतो. यासाठी हृद्याच्या आरोग्यासाठी व्यसनांपासून दूर राहणे अत्यंत गरजेचे आहे.
• ‎परिवारामध्ये (उदा. आई, वडील, आजी, अजोबा, बहिण, भाऊ) यांमध्ये जर हार्ट अटॅकसंबंधी समस्या आहेत का पहा. कारण अनुवंशिक कारकांमुळे आपणासही हृद्य विकार होण्याची अधिक शक्यता असते. असे काही असल्यास विशेष काळजी घ्या.
‎• मानसिक ताणतणाव रहित रहावे.
या उपायांचे अवलंब केल्यास हृद्यविकारापासून दूर राहता येते.

हार्ट अटॅक येण्याचा धोका कोणाला..?
• कोणत्याही व्यक्तीमध्ये जर मधुमेह (डायबेटीस), उच्चरक्तदाब किंवा हाय ब्लडप्रेशर, उच्च कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा यासारख्या समस्या असल्यास हार्ट अटॅक येण्याचा अधिक धोका असतो.
• ‎गुड कोलेस्ट्रॉल 50 पेक्षा कमी असणे धोक्याचे असते.
• ‎बॅड (वाईट) कोलेस्ट्रॉल 100 पेक्षा अधिक असणे धोक्याचे असते.
• ‎तर ब्लड प्रेशर 130/85 mm/Hg पेक्षा अधिक असणे धोक्याचे असते.
• ‎धुम्रपान, मद्यपान, तंबाखुसेवनाने हृद्यविकाराचा धोका अधिक पटीने वाढतो.

Heart attack prevention tips in Marathi