Posted inDiseases and Conditions

कॅन्सर व ट्युमर्स म्हणजे काय? त्याचे प्रकार जाणून घ्या..

कॅन्सर म्हणजे काय..? हृद्यविकार, मधुमेहाच्या बरोबरीने आज कॅन्सर हा सुद्धा एक गंभीर असा रोग बनला आहे. कर्करोगात शरीरातील विशिष्ट अवयवांमधील पेशींमध्ये काही बदल घडून त्या पेशींच्या संख्येत अनियंत्रित वाढ होते. या विकृत झालेल्या पेशी स्वतःचे कार्य नीट पार पाडत नाहीत मात्र झपाट्याने वाढत जाऊन शेजारील पेशींमध्ये रक्ताद्वारे इतरत्र पसरतात. या पेशी प्रथमतः कोणत्या अवयवांतून वाढीस […]

Posted inDiseases and Conditions

Stomach cancer: पोटाचा कॅन्सर होण्याची कारणे, लक्षणे व उपचार

पोटाचा कॅन्सर (Stomach cancer) : पोटातील कॅन्सरला Stomach cancer किंवा गॅस्ट्रिक कॅन्सर असेही म्हणतात. यामध्ये पोटाच्या अस्तरात कॅन्सरच्या पेशींची वाढ होत असते. पोटाचा कॅन्सर लक्षणे (Stomach cancer symptoms) : पोटाच्या कॅन्सरची सुरवात शरीरात मंद गतीने होत असते. त्यामुळे पोटाच्या कॅन्सरमध्ये सुरुवातीस काहीच लक्षणे दिसून येत नाहीत, पण जसजसा पोटातील कॅन्सर वाढू लागतो तसतशी खालील लक्षणे […]

Posted inDiseases and Conditions

Anemia: एनीमिया होण्याची कारणे, लक्षणे व उपचार

अनिमिया म्हणजे काय..? ऍनिमियामध्ये रक्तातील तांबड्या पेशींची म्हणजे RBC ची संख्या कमी होते, तसेच RBC मधील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होत असते. ऍनिमिया हा विकार रक्ताल्पता, पांडूरोग (रक्ताच्या कमतरतेमुळे शरीर पांढरे पडते), रक्तक्षीणता, अरक्तता या अन्य नावांनीसुद्धा ओळखला जातो. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण तपासून ऍनिमियाचे निदान केले जाते. हिमोग्लोबिन हे ऑक्सिजनला तांबड्या पेशींमार्फत शरीरातील उतींपर्यंत पोहचवण्याचे महत्वाचे […]

Posted inDiseases and Conditions

मलेरिया : मुख्य लक्षणे, कारणे, प्रकार आणि उपचार

मलेरिया (Malaria) – मलेरिया हा एक प्राणघातक असा संसर्गजन्य रोग आहे. मलेरिया आजार हा एनोफिलिस जातीचा बाधित डास (Anopheles mosquito) चावल्यामुळे होत असतो. या बाधित डासात असणाऱ्या ‘प्लाजमोडियम परजिवी’मुळे मलेरिया होत असतो. मलेरिया रोग हा ‘हिवताप’ या नावांनेसद्धा ओळखला जातो. मलेरिया कशामुळे होतो..? मलेरिया हा रोग ‘प्लाजमोडियम परजिवी’ मुळे होतो. हे परजीवी एनोफिलिस जातीच्या डासांच्या […]

Posted inDiseases and Conditions

Measles: गोवर ची मुख्य लक्षणे, कारणे व उपचार

गोवर (Measles) : गोवर हा विषाणूपासून पसरणारा एक संसर्गजन्य आजार आहे. गोवर आजार विशेषतः लहान मुलांमध्ये अधिक प्रमाणात झालेला आढळतो. तसेच काहीवेळा मोठेपणीही गोवर होऊ शकते. गोवर आजार एकदा झाल्यास पुन्हा तो आजार त्या व्यक्तीला होत नाही. या लेखात गोवर रोग कशापासून होतो, त्याची कारणे, लक्षणे आणि उपचार याची माहिती दिली आहे. गोवर आजाराची कारणे […]

Posted inDiseases and Conditions

Chickenpox: कांजिण्या ची मुख्य लक्षणे, कारणे आणि उपचार

कांजिण्या (Chickenpox) : कांजिण्या हा विषाणूपासून होणारा एक संसर्गजन्य आजार आहे. कांजिण्या आजारास Chicken Pox (चिकनपॉक्स) किंवा व्हॅरिसेला (varicella) या नावानेही ओळखले जाते. कांजण्या आजाराची लागण ही प्रामुख्याने लहान मुलांमध्ये अधिक झालेली आढळते. या आजारात शरीरावर खाज सुटणारे लालसर फोड येत असतात. कांजण्या या रोगाची कारणे (Chickenpox causes) : कांजिण्या आजार हा Varicella-zoster व्हायरसमुळे होतो. […]

Posted inDiseases and Conditions

स्वाइन फ्लू ची मुख्य लक्षणे, कारणे व उपचार : Swine Flu Symptoms

स्वाइन फ्लू आजार – Swine Flu (H1N1) : स्वाइन फ्लू हा एक संसर्गजन्य आजार असून त्याची लागण ही H1N1 ह्या व्हायरसपासून होते. स्वाइन फ्लूची लक्षणे ही साधारण फ्ल्यू सारखीच म्हणजे सर्दी होणे, खोकला, ताप येणे अशी असतात. स्वाइन फ्लूचा व्हायरस हा डुकरांमधून माणसाकडे पसरला आहे. 2009 साली पहिल्यांदा स्वाइन फ्ल्यू हा आजार माहीत झाला. जागतिक […]

Posted inDiseases and Conditions

हिपॅटायटीस आजार होण्याची कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार

हिपॅटायटीस (Hepatitis) : हिपॅटायटीस हा यकृताचा एक महत्वाचा असा आजार आहे. या आजारात लिव्हरला सूज येते. हिपॅटायटीस हा व्हायरल इंफेक्शनमुळे (विषांणूद्वारा) पसरणारा आजार आहे. व्हायरल इंफेक्शनमुळे यकृत संक्रमित होऊन त्याला सुज येते त्यामुळे यकृताची सामान्य कार्ये होण्यास अडथळा निर्माण होतो. हिपॅटायटीसचे ए, बी, सी, डी आणि इ असे पाच प्रकार आहेत. यकृताची कार्ये – यकृत […]

Posted inDiseases and Conditions

Liver cancer: लिव्हर कॅन्सर ची मुख्य लक्षणे, कारणे, प्रकार आणि उपचार

यकृताचा कर्करोग – Liver cancer : यकृत कॅन्सरला Hepatocellular carcinoma किंवा Hepatoma या अन्य नावांनीसुद्धा ओळखतात. यकृताच्या कॅन्सरमध्ये यकृतातून अपायकारक विषारी घटकांचा निचरा होण्यास अडथळा होतो. पर्यायाने रक्तातील अपायकारक विषारी घटकांची वाढ होते. अशावेळी योग्य उपचार केले गेले नाही तर यकृत निकामी होऊन रुग्ण दगावण्याचाही धोका अधिक असतो. यकृताचा कर्करोग हा यकृत आजारातील दुसऱ्या क्रमांकाचा […]

Posted inDiseases and Conditions

Low BP: ब्लड प्रेशर कमी होण्याची कारणे, लक्षणे व उपचार

रक्तदाब कमी होणे (Low Blood Pressure) : रक्तवाहिन्यांमधून वाहणाऱ्या रक्ताचा दाब जेंव्हा असामान्यपणे कमी होतो तेंव्हा रक्तदाब कमी होतो. या स्थितीला लो ब्लडप्रेशर, अल्प रक्तदाब, हायपोटेन्शन (hypotension) किंवा लो बीपी असेही म्हणतात. बीपी कमी होणे ही हाय ब्लडप्रेशर इतकीच गंभीर समस्या ठरू शकते त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका. रक्तदाबाचे नॉर्मल प्रमाण म्हणजे 120/80 इतके असते […]