Article about Cancer information in Marathi.

कॅन्सर म्हणजे काय..?

हृद्यविकार, मधुमेहाच्या बरोबरीने आज कॅन्सर हा सुद्धा एक गंभीर असा रोग बनला आहे. कर्करोगात शरीरातील विशिष्ट अवयवांमधील पेशींमध्ये काही बदल घडून त्या पेशींच्या संख्येत अनियंत्रित वाढ होते.

या विकृत झालेल्या पेशी स्वतःचे कार्य नीट पार पाडत नाहीत मात्र झपाट्याने वाढत जाऊन शेजारील पेशींमध्ये रक्ताद्वारे इतरत्र पसरतात. या पेशी प्रथमतः कोणत्या अवयवांतून वाढीस लागलेल्या आहेत यावरुन त्यांना त्या अवयवाचे नाव दिले जाते. उदा. फुप्फुसात प्रथम वाढलेल्या पेशींना फुप्फुसाचा कॅन्सर असे म्हंटले जाते. तर याच विकृत पेशी जेंव्हा इतरत्र हाडामध्ये पोहोचल्या तर त्यांना हाडाचा कर्करोग न म्हणता हाडापर्यंत पोहचलेला फुप्फुसाचा कॅन्सर असे म्हणतात.

ट्युमर्स म्हणजे काय –
कॅन्सर हा विकृतीजन्य पेशींचा समूह असून याला कॅन्सरजन्य ट्युमर्स असेही म्हणतात. यांमध्ये विकृत पेशींची अनियंत्रीत वाढ होत असते. शरीरात निर्माण होणारे सर्व ट्युमर्स हे कॅन्सरजन्य असतीलच असे नाही.

ट्युमर्स दोन प्रकारचे असतात. सौम्य ट्युमर्स (Benign tumors) आणि घातक ट्युमर्स (Malignant tumors).यापैकी सौम्य ट्युमर्स हे कैन्सरजन्य नसतात. तर घातक ट्युमर्स हे कैन्सरजन्य असुन ते शरीरातील उतींवर आक्रमण करून त्या उतींना नष्ट करत असतात. तसेच त्यांमुळेच कॅन्सरजन्य पेशींची शरीरात अनियंत्रीत वाढ होत असते. पेशींची अनियंत्रीत वाढ झाल्याने ते कॅन्सरजन्य ट्युमर्स शरीरातील एका भागापासून अन्य ठिकाणी पसरत असतात.

कॅन्सरचे प्रकार –
शरीरातील ज्या भागामध्ये कॅन्सर प्रथमतः निर्माण झाला आहे त्यानुसार तो कॅन्सर ओळखला जातो. उदा. फुप्फुसात प्रथम वाढलेल्या पेशींना फुप्फुसाचा कॅन्सर असे म्हंटले जाते. तर याच विकृत पेशी जेंव्हा इतरत्र हाडामध्ये पोहोचल्या तर त्यांना हाडाचा कर्करोग न म्हणता हाडापर्यंत पोहचलेला फुप्फुसाचा कैन्सर असे म्हणतात.

प्रकाराचा विचार केल्यास जगामध्ये फुफ्फुसाच्या कॅन्सरने मरणाऱयांची संख्या सर्वात जास्त आहे. तर भारतात आढळणाऱया कैन्सरच्या प्रकारामध्ये तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे. तोडांचा कर्करोगासाठी तंबाखु, गुटका, धुम्रपान, पानसुपारी किंवा अन्य तंबाखुजन्य पदार्थांचे व्यसन हेच प्रमुख कारण ठरत आहे. कॅन्सरचे प्रमाण वयाच्या 55 वर्षानंतर अधिक आढळते. स्त्रीयांपेक्षा पुरुषांमध्ये कॅन्सरचे प्रमाण अधिक आहे. भारतीय स्त्रियांमध्ये सर्वायकल कँसर व स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे.

वेळीच कॅन्सरचे निदान करणे महत्वाचे..
कॅन्सर हा एक गंभीर असा विकार असून यामध्ये रोगाच्या सुरवातीस रुग्णाला कोणतेही लक्षण जाणवत नाहीत. आणि कॅन्सरच्या बाबतीत सुरवातीच्या अवस्थेमधीलच कॅन्सर हा उपचारांद्वारे बरा होतो. अनेक व्यक्तींमध्ये जेंव्हा कॅन्सरचे निदान केले जाते तेंव्हा बहुतांशवेळा कैन्सर हा दुसऱया अवस्थेमध्ये पोहचलेला आढळतो. आणि दुसऱया अवस्थेतील कॅन्सर हा चिकित्सेच्या दृष्टिने असाध्य असतो. यासाठी कैन्सरला वेळीच ओळखणे गरजेचे असते. कॅन्सरला वेळीच कसे ओळखावे हे जाणून घ्या..

खालील कॅन्सरची मराठीत सर्व माहिती वाचा..

Written by - Dr. Satish Upalkar
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
Image Source – NIH
सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...