मधुमेह नियंत्रण – Diabetes control :
बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि अयोग्य आहारांमुळे आज मधुमेह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. एकदा मधुमेहाचा आजार पाठीमागे लागल्यास भविष्यात अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. म्हणून हा आजारच होऊ नये यासाठी प्रत्येकाने आपल्या आरोग्याची वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी मधुमेहापासून दूर रहाण्यासाठीचे उपयुक्त उपाय खाली दिले आहेत.
मधुमेह होऊ नये म्हणून अशी घ्यावी काळजी – Diabetes prevention tips in Marathi :
टाईप 1 डायबिटीजवर प्रतिबंध करता येत नाही. तर टाईप 2 डायबिटीज होण्यापासून प्रतिबंधात्मक उपायांद्वारे दूर राहता येते. यासाठी जीवनशैलीमध्ये बदल करणे आवश्यक असते.
- संतुलित आहाराचा घ्यावा.
- आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, जास्त गोड नसणारी विविध फळे, मोड आलेली कडधान्ये, नाचणी, हातसडीचा तांदूळ यांचा समावेश अधिक असावा. यामध्ये फायबर्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मधुमेह, हार्ट अटॅक, पक्षाघात, कॅन्सर पासून दूर राहण्यास मदत होते.
- आहारावर नियंत्रण ठेवावे. एकावेळीचं भरपेट जेवणे टाळा. तीन वेळा थोडे थोडे जेवण करावे. त्यामुळे घेतलेल्या आहाराचे व्यवस्थित पचन होईल.
- साखरेचे गोड पदार्थ, विविध मिठाई, मैद्याचे पदार्थ, बेकरी प्रोडक्ट (बिस्किटे, पाव, केक इ.), तेला-तुपाचे पदार्थ, अंड्यातील पिवळा बलक, चरबीजन्य पदार्थ, कंदमुळे (बटाटा, बिट, रताळी इ.), आणि खारट पदार्थ जास्त प्रमाणात खाणे टाळावे.
- वजन आटोक्यात ठेवावे. वजन आटोक्यात ठेवण्याचे उपायही जाणून घ्या..
- नियमित व्यायाम करावा. दररोज किमान 30 ते 45 मिनिटे व्यायाम करावा. दररोज किमान अर्धा तास चालण्याचा व्यायाम करावा. चालणे, जॉगिंग, सायकलिंग, मैदानी खेळ, योगासने यासारखे व्यायाम करावेत.
- शारीरीकदृष्ट्या सक्रिय रहावे, बैठ्या जीवनशैलीपासून दूर राहा. लिफ्टच्याऐवजी पायऱ्यांचा वापर करा.
- रात्री पुरेशी झोप घ्यावी. दुपारी झोपणे टाळावे.
- मानसिक ताणतणावापासून दूर राहावे यासाठी प्राणायाम, ध्यान-धारणा करू शकता.
- धूम्रपान, सिगारेट, तंबाखू, मद्यपान यासारख्या व्यसनांपासून दूर राहावे.
- सुप्तावस्थेतील मधुमेह लक्षणांवरून ओळखता येत नसल्यामुळे रक्तातील साखरेची तपासणी करावी लागते. यासाठी प्रत्येकाने वयाच्या तिशीनंतर वर्षातून एकदा नियमित ब्लड शुगरची तपासणी करुन घ्यावी.
- मधुमेहाची आनुवंशिकता असल्यास अधिक जागरूक राहावे.
- डॉक्टरांकडून नियमित वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. यामध्ये रक्तदाब, हृदयाचे आरोग्य, डोळ्यांची तपासणी करून घ्यावी.
म्हणजेचं योग्य आहार, व्यायाम आणि नियमित तपासणी यांची आदर्श जीवनशैली आयुष्यभर आचरणात आणल्यास मधुमेह होण्यापासून निश्चितच दूर राहता येईल.
हे सुद्धा वाचा –>मधुमेहाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा..
In this article information about Diabetes control & prevention tips in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar (Certified physician and Healthcare expert).