मधुमेहाचे निदान कसे केले जाते

874
views

मधुमेहाचे निदान कसे करतात..?
रुग्ण इतिहास, व्यक्त लक्षणे, शारिरीक तपासणीद्वारे आपल्या डॉक्टरांकडून मधुमेहाच्या निदानास सुरवात होते. याशिवाय खालिल वैद्यकिय चाचण्यांचा मधुमेहाच्या सम्यक निदानासाठी आधार घ्यावा लागतो.

रक्त परिक्षण – यांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण तपासले जाते.
[1] Fasting Plasma Glucose test –
या चाचणीचा अधिक वापर केला जातो. ही चाचणी उपाशीपोटी करावी लागते. ह्या चाचणीनुसार रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण तपासण्यापुर्वी किमान 8 तास उपाशी असणे गरजेचे असते.

(FPG test) रक्तातील साखरेचे प्रमाण आणि स्थिती :-

रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिती
70 ते 99 mg/dL यामध्ये असल्यास नॉर्मल प्रमाण
100 ते 126 mg/dL यामध्ये असल्यास मधुमेहपुर्व अवस्था (टाईप 2 डायबिटीज)
126 mg/dL पेक्षा अधिक असल्यास मधुमेहाचे निदान होते (टाईप 1 डायबिटीज)

 

[2] Casual Plasma Glucose test –
भोजन केल्यानंतर ही चाचणी केली जाते. या चाचणीत जर रक्तातील साखर 200 mg/dL पेक्षा अधिक असल्यास मधुमेहाचे निदान होते.


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.