गर्भावस्था आणि लसीकरण : गरोदरपणात आवश्यक अशा लसीकरणामुळे गर्भवती स्त्रीचे आणि पोटातील गर्भाचे विविध आजारांपासून संरक्षण होत असते. प्रेग्नन्सीमध्ये लसीकरणाअभावी विविध साथीचे आजार होऊन माता व बालकमृत्यू किंवा जन्मणाऱ्या बाळामध्ये व्यंग निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये लसीकरणाचे खूप महत्त्व असून यामुळे गरोदर स्त्री आणि गर्भाचे संरक्षण होण्यास मदत होत असते. गरोदरपणातील लसीकरण – गर्भवतीने धनुर्वात […]
Pregnancy
गरोदरपणात इन्फेक्शन होऊ नये यासाठी घ्यायची काळजी
गर्भावस्था आणि संसर्गजन्य आजार : गर्भावस्थेत रोग्रतिकारकशक्ती कमजोर होत असल्याने इन्फेक्शन होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे गरोदरपणात अनेकदा फ्ल्यू सर्दी, खोकला यासारखे व्हायरल इन्फेक्शन होत असते. अशावेळी प्रेग्नन्सीमध्ये स्वच्छता व योग्य ती काळजी घेतल्यास असे संसर्गजन्य आजार होण्यापासून सहज दूर राहता येते. गरोदरपणात इन्फेक्शन (संसर्ग) होऊ नये यासाठी अशी घ्यावी काळजी : 1) वैयक्तिक स्वच्छतेची […]
गरोदरपणात सोनोग्राफी करणे हे सुरक्षित असते का नाही?
अल्ट्रासाउंड सोनोग्राफी आणि गरोदरपण – अल्ट्रासाउंड सोनोग्राफीमध्ये ध्वनिलहरी पोटावरुन गर्भाशयापर्यंत पाठवली जातात. त्यानंतर ही ध्वनिलहरी गर्भापर्यंत पोहचून परत येतात आणि त्याद्वारे कॉम्प्युटरवर गर्भाशयातील गर्भाची स्थिती, हालचाल याविषयी चित्र दिसू लागतात. गरोदरपणात अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी केल्याने बाळावर काही दुष्परिणाम होतील का, असे विविध प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात येत असतात. यासाठी त्या सर्व शंकांचे निरसन या लेखात केले […]
प्रेग्नन्सीमध्ये RH negative रक्तगट असल्यास काय होते?
गरोदरपण आणि RH निगेटिव्ह रक्तगट : गरोदर स्त्रियांच्या बाबतीत RH पॉझिटिव्ह आणि RH निगेटिव्हचा विचार महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये स्त्रीचा रक्तगट व RH पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आहे हे तपासणे आवश्यक असते. जर गरोदर स्त्रीचा रक्तगट RH निगेटिव्ह व तिच्या पतीचा रक्तगट RH पॉझिटिव्ह असल्यास गर्भावर परिणाम होऊ शकतो. मात्र अशावेळी डॉक्टर RH निगेटिव्ह असणाऱ्या गरोदर […]
गरोदरपणात हिमोग्लोबिन व रक्त वाढण्यासाठी काय खावे?
गरोदरपणात रक्त का वाढले पाहिजे? गरोदरपणामध्ये रक्ताल्पता (ऍनिमिया) होण्याची संभावना असते. रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी झाल्याने रक्ताल्पता होत असते. गरोदरपणात रक्ताचे खूप महत्वाचे कार्य असते. गर्भाचे पोषण आईच्या रक्तातूनच नाळेमधून होत असते. त्यामुळे गरोदरपणात आईच्या शरीरात पुरेसे रक्त वाढणे आवश्यक असते. प्रेग्नन्सीत रक्त कमी असल्यास होणाऱ्या समस्या : प्रेग्नन्सीमध्ये रक्त किंवा हिमोग्लोबिन कमी असल्यास अनेक […]
प्रेग्नन्सीमध्ये गरोदर स्त्रीने कोणते पदार्थ खाणे टाळावेत ते जाणून घ्या..
गरोदरपणात आई जो आहार घेत असते त्याचा परिणाम बाळाच्या आरोग्यावर होत असतो. त्यामुळे गरोदरपणात बाळाच्या आरोग्याचा विचार करून काळजीपूर्वक योग्य आहार घेणे गरजेचे असते. प्रेग्नन्सीत गरोदर स्त्रीने हे पदार्थ काय खाऊ नयेत : चरबी वाढवणारे पदार्थ खाणे टाळा.. तेलकट, तुपकट पदार्थ, मैद्याचे पदार्थ, बेकरी प्रोडक्ट, साखरेचे पदार्थ, केक, चॉकलेट, मिठाई, फास्टफूड, जंकफूड असे चरबी व […]
गरोदरपणातील ब्लिडिंग – Bleeding During Pregnancy
गरोदरपणात ब्लिडिंग व स्पॉटिंग होण्याची समस्या.. अनेक प्रेग्नेंट स्त्रियांना योनीतुन रक्तस्राव होत असतो. प्रामुख्याने पहिल्या तीन महिन्यात याचे प्रमाण अधिक असते. योनीतून होणाऱ्या रक्तस्त्रावाचे स्वरूप हे हलकेसे रक्ताचे डाग (स्पॉट) किंवा अधिक प्रमाणात गुठळ्याच्या स्वरूपात रक्तस्राव होऊ शकतो. गरोदरपणात योनीतून अधिक प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्यास ते धोकादायक लक्षण असू शकते. अशावेळेस आपल्या डॉक्टरांकडून निदान व […]
गर्भधारणा झाली आहे की नाही हे किती दिवसात समजते?
दर महिन्याला येणारी नियमित मासिक पाळी चुकणे हे गरोदरपणाचे पहिले लक्षण मानले जाते. गरोदर अवस्थेत हार्मोन्समध्ये बदल घडतात व नियमित येणारी मासिक पाळी थांबली जाते. त्यामुळे पाळी बंद होऊन महिन्याहून अधिक काळ झाल्यास गरोदर असण्याची शक्यता असू शकते. संबंधानंतर स्त्री किती दिवसात गरोदर होऊ शकते..? बर्थ कंट्रोल पिल्स म्हणजे गर्भनिरोधक गोळ्या किंवा कंडोम, डायाफ्राम यांचा […]
प्रेग्नंटआहे हे कसे समजते व प्रेग्नन्सी किती दिवसांनी चेक करावी ते जाणून घ्या..
प्रेग्नंट आहे हे कधी व कसे समजते..? प्रेग्नन्सीमध्ये होणाऱ्या हार्मोन्समधील बदलांमुळे काही लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांवरून ती स्त्री प्रेग्नंट आहे की नाही हे समजण्यास मदत होते. ही लक्षणे दोन ते तीन आठवड्यानंतर जाणवू शकतात. त्या लक्षणांच्या आधारे प्रेग्नंट असल्याचे अनुमान बांधता येते. प्रेग्नन्सीमध्ये सुरवातीला मासिक पाळी चुकणे, स्तनांच्या ठिकाणी बदल जाणवणे, स्तन दुखू लागणे. […]
लैंगिक संबंधानंतर स्त्रीमध्ये गर्भधारणा किती दिवसात होत असते ते जाणून घ्या..
गर्भधारणेसाठी प्रयत्न करणार्या महिलांमध्ये त्यांच्या मनामध्ये गरोदरपणाबद्दलचे अनेक प्रश्न येत असतात. काही स्त्रिया त्यांच्या गर्भावस्थेबद्दल आनंदी असतात, तर काहीजणींना भीतीही वाटत असते. लैंगिक संबंधानंतर गर्भधारणा किती दिवसात होते असे प्रश्न अनेकांना पडत असतात. गर्भधारणा कधी होऊ शकते..? जर बर्थ कंट्रोल पिल्स (म्हणजे गर्भनिरोधक गोळ्या) किंवा कंडोम, डायाफ्राम यांचा वापर न करता स्त्री आणि पुरुषामध्ये सेक्स […]