प्रेग्नंट आहे हे कधी व कसे समजते..?

प्रेग्नन्सीमध्ये होणाऱ्या हार्मोन्समधील बदलांमुळे काही लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांवरून ती स्त्री प्रेग्नंट आहे की नाही हे समजण्यास मदत होते. ही लक्षणे दोन ते तीन आठवड्यानंतर जाणवू शकतात. त्या लक्षणांच्या आधारे प्रेग्नंट असल्याचे अनुमान बांधता येते. स्त्री प्रेग्नंट आहे की नाही हे कसे समजते तसेच प्रेग्नसी कधी व किती दिवसांनी चेक करावी याची माहिती येथे दिली आहे.

प्रेग्नन्सीमध्ये सुरवातीला मासिक पाळी चुकणे, स्तनांच्या ठिकाणी बदल जाणवणे, स्तन दुखू लागणे. स्तन जड व सुजल्यासारखे वाटणे, मळमळणे, उलट्या होणे, थकवा व अशक्तपणा जाणवणे, चक्कर येणे, पोट फुगल्यासारखं किंवा गच्च वाटणे, सारखे-सारखे लघवीला होणे, अंग गरम झाल्यासारखे वाटणे, चिडचिडेपणा वाढणे, मूड सतत बदलत राहणे अशी लक्षणे प्रेग्नंट असल्यास जाणवू शकतात.

याशिवाय काही ब्लड टेस्ट किंवा युरीन टेस्ट करूनही प्रेग्नंट आहे की नाही हे ठरवता येते. ‘Pregnancy test Kit’च्या मदतीने घरच्याघरीही प्रेग्नन्सी टेस्ट करता येते. प्रेग्नन्सी टेस्टचा रिझल्ट अचूक येण्यासाठी ती टेस्ट योग्य वेळीचं करावी लागते.

प्रेग्नन्सी किती दिवसांनी चेक करावी..?

मासिक पाळी चुकल्यानंतर, एक आठवड्याने प्रेग्नन्सी टेस्ट केल्यास गरोदर आहे की नाही याचे अगदी खात्रीशीर निदान होते. आणि जर तुम्ही एवढा वेळ वाट पाहू इच्छित नसाल तर, संबंधानंतर एक ते दोन आठवड्यानी प्रेग्नन्सी टेस्ट करू शकता. मात्र त्याच्या रिझल्टची अचुकचा सांगता येणार नाही.

गर्भ रुजल्यानंतर स्त्रीच्या शरीरात hCG हार्मोन्स रिलीज होते. प्रेग्नन्सी टेस्ट मध्ये hCG हार्मोन्सची उपस्थिची तपासली जाते. जर hCG हार्मोन्स आढळल्यास प्रेग्नन्सी टेस्टचा रिझल्ट पॉझिटिव्ह येऊन गरोदर असल्याचे सूचित होते. आणि जर hCG हार्मोन्स न आढळल्यास प्रेग्नन्सी टेस्टचा रिझल्ट निगेटिव्ह येऊन गरोदर नसल्याचे सूचित होते. प्रेग्नन्सी टेस्ट कशी करावी याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

प्रेग्नन्सी टेस्ट प्रमाणेच रक्तातील हार्मोन्सचे प्रमाण (Serum BHCG) तपासून गरोदर आहे की नाही याचे निदान करता येते. ही ब्लड टेस्टसुद्धा मासिक पाळी चुकल्यानंतर, एक आठवड्याने किंवा संबंधानंतर एक ते दोन आठवड्यानी करता येते. याशिवाय सोनोग्राफी तापसणीद्वारेही खात्रीशीरपणे प्रेग्नट आहे की नाही ते चेक करता येते.

How to Confirm Pregnancy check in Simple Ways information in Marathi.


प्रेग्नेंसी, डिलिव्हरी आणि बालसंगोपन विषयक मराठी pdf पुस्तक मोफत डाऊनलोड करण्यासाठी खालील फॉर्मद्वारे संपर्क साधा. Pdf मोफत पुस्तक WhatsApp Number वर पाठवण्यात येईल.

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...