लैंगिक संबंधानंतर स्त्रीमध्ये गर्भधारणा किती दिवसात होत असते याविषयी जाणून घ्या..

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

गर्भधारणेसाठी प्रयत्न करणार्‍या महिलांमध्ये त्यांच्या मनामध्ये गरोदरपणाबद्दलचे अनेक प्रश्न येत असतात. काही स्त्रिया त्यांच्या गर्भावस्थेबद्दल आनंदी असतात, तर काहीजणींना भीतीही वाटत असते. लैंगिक संबंधानंतर गर्भधारणा किती दिवसात होते, सेक्सनंतर गरोदर किती दिवसात राहते, प्रेग्नन्सी किती दिवसात होत असते असे प्रश्न अनेकांना पडत असतात. यासाठी या लेखात सेक्सनंतर स्त्रीमध्ये गर्भधारणा किती दिवसात होऊ शकते याबद्दल माहिती दिली आहे.

गर्भधारणा कधी होऊ शकते..?

जर बर्थ कंट्रोल पिल्स (म्हणजे गर्भनिरोधक गोळ्या) किंवा कंडोम, डायाफ्राम यांचा वापर न करता स्त्री आणि पुरुषामध्ये सेक्स घडल्यास त्या स्त्रीमध्ये गर्भधारणा होण्याची शक्यता अधिक असते.

सेक्सनंतर गरोदर (प्रेग्नन्सी) किती दिवसात होते..?

सेक्सनंतर काही मिनिटांपासून ते 5 दिवसापर्यंत स्त्रीबीज आणि पुबीज यांचे मिलन होऊन फर्टिलाईजेशन होते. त्यानंतर 6 ते 15 दिवसांपर्यंत मिलनातून फर्टिलाईज झालेले अंडे हे गर्भाशयात रुजण्याची प्रक्रिया (Implantation) सुरू होते व तेंव्हा ती स्त्री गर्भवती होते. साधारणपणे सेक्सनंतर 6 ते 15 दिवसांपर्यंत गर्भधारणा होऊन ती स्त्री गरोदर होते.

प्रेग्नंट आहे की नाही ते पाहण्यासाठी प्रेग्नन्सी टेस्ट कधी करावी..?

गरोदर आहे की नाही हे पाहण्यासाठी घरच्याघरी प्रेग्नन्सी टेस्ट करता येते. प्रेग्नन्सी टेस्ट किट मेडिकल स्टोअरवर मिळते. प्रेग्नन्सी टेस्टचा रिझल्ट अचूक येण्यासाठी ती टेस्ट योग्य वेळीचं करावी लागते.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

प्रेग्नंट आहे की नाही हे पाहण्यासाठी सेक्सनंतर साधारण एक ते दोन आठवड्यानी प्रेग्नन्सी टेस्ट करू शकता. प्रेग्नन्सी टेस्ट कशी करावी याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

सोप्या शब्दात..

1) सेक्स – पहिला दिवस
2) फर्टिलाईजेशन – सेक्सनंतर 5 दिवसापर्यंत
3) गर्भधारणा (Implantation) – 6 ते 15 दिवसांपर्यंत
4) प्रेग्नन्सी टेस्ट – सेक्सनंतर 1 ते 2 आठवड्यानंतर करा.

How long does it take a woman to get pregnant after sex information in Marathi.