गरोदरपण आणि RH निगेटिव्ह रक्तगट :

गरोदर स्त्रियांच्या बाबतीत RH पॉझिटिव्ह आणि RH निगेटिव्हचा विचार महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये स्त्रीचा रक्तगट व RH पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आहे हे तपासणे आवश्यक असते. जर गरोदर स्त्रीचा रक्तगट RH निगेटिव्ह व तिच्या पतीचा रक्तगट RH पॉझिटिव्ह असल्यास गर्भावर परिणाम होऊ शकतो. मात्र अशावेळी डॉक्टर RH निगेटिव्ह असणाऱ्या गरोदर स्त्रीमध्ये योग्य ते उपचार करतात त्यायोगे बाळ व आई निरोगी राहण्यास मदत होते.

RH रक्तगट वेगवेगळा असणाऱ्या स्त्रियांमधील गरोदरपण :

प्रेग्नन्सीमध्ये स्त्रीचा रक्तगट व RH फॅक्टर (+ किंवा -) तपासणे आवश्यक असते. साधारणत: 10 टक्के स्त्रियांचा रक्तगट हा RH निगेटिव्ह असतो. जर गर्भवती स्त्रीचा रक्तगट RH निगेटिव्ह व तिच्या पतीचा रक्तगट RH पॉझिटिव्ह असल्यास योग्य ती काळजी घेतली जाते.

रक्ताचे A, B, AB आणि 0 असे एकूण चार मुख्य गट असतात. तसेच ज्यांच्या रक्तामध्ये RH नावाचा घटक असतो त्यांचा रक्तगट पॉझिटिव्ह समजला जातो व ज्यांच्या रक्तामध्ये हा घटक नसतो त्यांचा रक्तगट निगेटिव्ह असा समजला जाते. साधारणपणे 90% लोक हे RH पॉझिटिव्ह असतात तर 10% लोक हे RH निगेटिव्ह असतात.

प्रेग्नन्सीमध्ये RH निगेटिव्ह रक्तात RH पॉझिटिव्ह पेशी मिसळू शकतात. जर गरोदर स्त्री RH निगेटिव्ह असल्यास व पोटातील गर्भ RH पॉझिटिव्ह असल्यास पेशी एकमेकांत मिसळण्याची क्रिया प्रेग्नन्सीच्या सातव्या महिन्यानंतर होऊ लागते.

अशा निगेटिव्ह व पॉझिटिव्ह पेशी मिसळण्याचे प्रमाण सुरवातीच्या दिवसात कमी असते. मात्र गर्भावस्थेचा काळ जसा पुढे सरकत जाईल तसे पेशींच्या एकत्रीकरणाचे प्रमाण वाढत जाते, त्यामुळे (Anti-D, Anthodies to RBC) ही प्रति द्रव्ये तयार होतात. ही प्रतिद्रव्ये गर्भाच्या वारेद्वारे (Placenta) गर्भाच्या रक्तात येतात आणि गर्भाच्या तांबड्या पेशींचे विघटन करतात. त्यामुळे गर्भाच्या तांबड्या पेशी बऱ्याच प्रमाणात निकामी होतात. यामुळे गर्भपात होण्याचा धोकाही जास्त असतो. याशिवाय गर्भास जन्मजात काही विकार जडण्याचीही शक्यता निर्माण होते. या विकारांना Hemolytic Disease of New born असे म्हणतात.

तसेच RH निगेटिव्ह असणाऱ्या स्त्रीच्या बाळास जन्मल्याबरोबर कावीळ (Jaundice) तसेच अ‍ॅनिमिया, हायड्राप्स फिटेलिस हे आजार होऊ शकतात. मात्र गरोदरपणात वेळीच रक्तगटाची तपासणी केल्याने RH निगेटिव्ह गर्भवती स्त्री असल्यास योग्य ती काळजी घेतली जाऊन माता आणि बाळ यांचे आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होते.

रक्तगट वेगळे असल्यास कोणती काळजी घेतली जाते..?

गर्भधारणा झाल्यानंतर प्रत्येक स्त्रीचा रक्तगट व RH फॅक्टर तपासला जातो, जर आर. एच. निगेटिव्ह स्त्री गरोदर असल्यास तिला प्रेग्नन्सीच्या सातव्या महिन्यात Anti-D हे इंजक्शन दिले जाते. तसेच प्रसुतीनंतर नवजात बालकाचा रक्टगट व RH फॅक्टर व D.C.T. वैगरे तपासून तो जर RH पॉझिटिव्ह असल्यास 48 तासांच्या आत Anti-D हे इंजेक्शन पुन्हा दिले जाते. या इंजेक्शनमुळे अँटी बॉडीज निर्माण होत नाहीत. त्यामुळे पुढच्या वेळेस गर्भपात होणे किंवा गर्भास काही धोका असणे या शक्यता राहात नाहीत.

Information about Rh Incompatibility During Pregnancy in Marathi.


प्रेग्नेंसी, डिलिव्हरी आणि बालसंगोपन विषयक मराठी pdf पुस्तक मोफत डाऊनलोड करण्यासाठी खालील फॉर्मद्वारे संपर्क साधा. Pdf मोफत पुस्तक WhatsApp Number वर पाठवण्यात येईल.

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...