डाळिंब – Pomegranate :
डाळिंब फळ सर्वांनाच खायायला आवडते. डाळिंबाच्या आत लालबुंद व रसरशीत असे दाणे भरलेले असतात. डाळिंबाचे दाणे हे आंबट आणि गोड चवीचे असतात. डाळिंबामध्ये फायबर, व्हिटॅमिन के, सी आणि बी, अँटिऑक्सिडंट्स, लोह, पोटॅशियम, जस्त आणि ओमेगा-6 फॅटी अॅसिड असे आरोग्यासाठी आवश्यक असणारे पोषकघटक भरपूर प्रमाणात असतात.
डाळिंब हे फळ आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते. यातील फायबरमुळे पोट साफ होते. त्यामुळे बद्धकोष्ठता, मूळव्याध अशा समस्या दूर होतात. डाळिंब खाण्यामुळे वजन आटोक्यात राहते. डाळिंबात असणारे अँटिऑक्सिडंट्स हे हृदयरोग, टाइप 2 मधुमेह, कर्करोग आणि अल्झायमर अशा आजारांना दूर ठेवते. डाळिंब खाल्याने हिमोग्लोबिन व रक्त वाढते.
डाळिंब खाण्याचे आरोग्यदायी 10 फायदे –
1) हृदयाचे आरोग्य चांगले राहते..
डाळिंबात असणारी पॉलिफेनॉलिक घटक ही हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यामुळे रक्तवाहिन्यांमधील ऑक्सिडेटिव्ह ताण आणि दाह कमी होतो. तसेच डाळिंब रक्तदाब आटोक्यात ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे एथेरोस्क्लेरोसिस सारख्या समस्येपासून दूर राहण्यास मदत होते. त्यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोक यांचा धोका कमी होतो. तसेच यामुळे रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यासही मदत होते.
2) फ्री रॅडिकल्सपासून बचाव करते..
डाळिंबात असणाऱ्या अँटिऑक्सिडंट्स आणि पॉलिफेनॉलिक घटकांमुळे शरीरातील पेशींचे फ्री रॅडिकल्सपासून होणारे नुकसान थांबवले जाते.
3) गंभीर आजारांचा धोका कमी करते..
डाळिंब खाण्यामुळे chronic inflammation पासून दूर राहण्यास मदत होते. यामुळे हृदयरोग, टाइप 2 मधुमेह, विविध प्रकारचे कर्करोग आणि अल्झायमर अशा आजारांचा धोका कमी होतो.
4) डाळिंब कॅन्सरपासून संरक्षण करते..
डाळिंबात असणाऱ्या अँटिऑक्सिडंट्समुळे फुफ्फुस कॅन्सर, स्तन कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर, स्किन कॅन्सर आणि कोलन कॅन्सर अशा विविध कॅन्सरपासून बचाव होण्यास मदत होते. तसेच कॅन्सर झालेल्यांसाठीही डाळिंब खाणे फायदेशीर आहे. यामुळे PSA ची पातळी कमी होते आणि कॅन्सरशी लढायला खूप मदत होते.
5) हिमोग्लोबिन व रक्त वाढते..
डाळिंबात लोहाचे मुबलक प्रमाण असल्याने हिमोग्लोबिन व रक्त वाढण्यास मदत होते. रोज डाळिंबाचे दाणे खाल्याने रक्ताची कमतरता दूर होते.
6) वजन आटोक्यात राहते..
दररोज डाळिंबाचे दाणे खाल्याने तुमचे वजन नियंत्रित होण्यास खूप मदत होते. विशेषतः उपाशीपोटी डाळिंबाचे दाणे खाण्यामुळे फॅटी पेशींची निर्मिती कमी होऊ लागते आणि हळूहळू वजन कमी होते. त्यामुळे वजन कमी करायचे असल्यास डाळिंब जरूर खावे.
7) पचनक्रिया सुधारते..
डाळिंबात असणाऱ्या फायबर्स ह्या घटकामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. यामुळे नियमित पोट साफ होते. यामुळे बद्धकोष्ठता, मूळव्याध अशा समस्यावर डाळिंब उपयुक्त असते.
8) गरोदर स्त्रियांसाठी उपयुक्त..
गरोदरपणात डाळिंब खाण्यामुळे हिमोग्लोबिन आणि रक्त वाढण्यास मदत होते. तसेच डाळिंबात आढळणारी खनिजे, जीवनसत्त्वे ही पोटातील गर्भासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे गरोदर स्त्रियांनी आठवड्यातून एकदा डाळिंब जरूर खावे.
9) मुतखड्याच्या त्रासावर फायदेशीर..
डाळिंबात असणाऱ्या अँटिऑक्सिडंट्समुळे मुतखडा होत नाही. त्यामुळे किडनी स्टोन असल्यास डाळिंब जरूर खावे. यामुळे मुतखड्याचा आकार कमी होण्यास मदत होते.
10) मेंदूचे आरोग्य सुधारते..
डाळिंबातील एलाजिटानिन्स ह्या अँटिऑक्सिडंट्समुळे मेंदूच्या आरोग्याचे रक्षण होते. त्यामुळे उतारवयात होणारे अल्झायमर, पार्किन्सन डीसिज अशा मेंदूच्या आजारांचा धोका कमी होतो.
डाळिंब खाण्याचे तोटे –
डाळिंब अधिक प्रमाणात खाल्ल्याने पचनाच्या तक्रारी होऊ शकतात. यामुळे पोटदुखी, अतिसार अशा समस्या होऊ शकतात. तसेच काही जणांना डाळिंब खाण्यामुळे ऍलर्जीचा त्रास ही होऊ शकतो.
डाळिंब कोणी खाऊ नये..?
- जर तुम्ही कोलेस्टेरॉल कमी करण्याची औषधे घेत असाल तर, तुम्ही डाळिंब खाणे टाळले पाहिजे.
- ज्यांना लो ब्लडप्रेशरचा त्रास आहे त्यांनीही डाळिंब खाऊ नये.
- गर्भवती स्त्रियांनी किंवा स्तनपान करत असणाऱ्या स्त्रियांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डाळिंब खाऊ नये. तसेच गरोदर स्त्रियांनी अधिक प्रमाणात डाळिंब खाणे टाळले पाहिजे.
डाळिंबातील पोषक घटक (Nutrition Facts) –
एका डाळिंबात पुढीलप्रमाणे पोषकघटक असतात.
- कॅलरीज: 234
- प्रोटीन्स: 4.7 ग्रॅम
- फॅट: 3.3 ग्रॅम
- कर्बोदके: 52 ग्रॅम
- साखर: 38.6 ग्रॅम
- फायबर: 11.3 ग्रॅम
- कॅल्शियम: 28.2 मिग्रॅ,
- लोह: 0.85 mg,
- मॅग्नेशियम: 33.8 mg,
- फॉस्फरस: 102 mg,
- पोटॅशियम: 666 mg,
- व्हिटॅमिन सी: 28.8 मिलीग्राम,
- फोलेट (व्हिटॅमिन B9): 107 mcg,
Read Marathi language article about Pomegranate health Benefits and side effects. Last Medically Reviewed on February 29, 2024 By Dr. Satish Upalkar.