उचकी – Hiccup :
बऱ्याचदा अचानक उचकी लागू शकते. अशावेळी येणारी उचकी थांबता थांबत नाही. त्यामुळे अस्वस्थ वाटू लागते. आपल्या फुफ्फुसाच्या खाली असणारी डायफ्राम नावाचे स्नायू अचानक अकुंचन पावल्याने उचक्या येत असतात.
उचकी थांबवण्यासाठी घरगुती उपाय –
उचकी येत असल्यास ग्लासभर थंड पाणी पिण्यामुळे उचकी थांबण्यास मदत होते. तसेच मध आणि लिंबू रसाचे चाटण केल्यानेही उचक्या लवकर थांबतात. अशावेळी खडीसाखर आणि मिरी एकत्रित चावत राहावे. खडीसाखर आणि मिरी खावून झाल्यावर घोटभर पाणी प्यावे. या उपायाने देखील उचक्या लवकर थांबतात. उचकी थांबवण्यासाठी हे उपाय तुम्ही करू शकता. या घरगुती उपायांमुळे तुमची उचकी लगेचच थांबण्यास मदत होईल.
उचकी थांबण्यासाठी काय करावे..?
1) ग्लासभर थंड पाणी प्यावे.
उचकी येत असल्यास ग्लासभर थंड पाणी प्यावे यामुळे उचकी थांबण्यास मदत होते. यावेळी नाक बंद करत थोडे पाणी पिऊन बघावे.
2) मध आणि लिंबू रसाचे चाटण करावे.
सारख्या उचकी येत असल्यास एक चमचा मधात थोडासा लिंबूरस घालून मिश्रणाचे चाटण करावे. यामुळेही उचकी थांबते.
3) खडीसाखरेबरोबर काळे मिरे खावे.
उचक्या थांबवण्यासाठी तीन ते चार काळे मिरे आणि खडीसाखरेबरोबर चावत राहावेत. त्यावर एक ते दोन घोट पाणी प्यावे. यामुळे उचकी थांबण्यासाठी मदत होते.
4) उलटे अंक मोजावे.
100 ते 1 असे उलटे अंक मोजल्याने उचकी थांबण्यास मदत होते.
उचकी येत असल्यास डॉक्टरांकडे कधी जावे..?
उचकी येणे सामान्य गोष्ट आहे मात्र जर घरगुती उपाय केल्यानंतरही उचकी थांबत नसल्यास किंवा उचकीचा त्रास अधिक होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते.
हे सुध्दा वाचा – पोटात गॅस होत असल्यास करायचे उपाय जाणून घ्या..
Read Marathi language article about Hiccups Home remedies. Last Medically Reviewed on February 26, 2024 By Dr. Satish Upalkar.