काकडी – Cucumber :
आपण आपल्या सलाड मध्ये काकडीचा आवर्जून समावेश केला जातो. यात उपयुक्त अशी विविध पोषकतत्वे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. काकडीत असणाऱ्या अँटिऑक्सिडंट्स मुळे बऱ्याच आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. काकडीत पाण्याचे भरपूर प्रमाण असते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात आहारात काकडीचा जरूर समावेश केला पाहिजे.
काकडीमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असून यात फायबर आणि पाणी भरपूर असते. त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. काकडीमध्ये कमी कॅलरीज असल्याने वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.काकडीमुळे हाडांमध्ये कॅल्शियम शोधण्यास देखील मदत होते. असे अनेक फायदे काकडी खाण्यामुळे होतात.
काकडी खाण्याचे आरोग्यदायी 6 फायदे –
1) वजन आटोक्यात राहते.
तंतुमय पदार्थ आणि पाणी हे घटक काकडीमध्ये असतात. एक कप काकडीतून फक्त 16 कॅलरीज मिळत असतात. त्यामुळे लो कॅलरीज काकडीचा समावेश आहारात करुन वजन आटोक्यात ठेवता येते.
2) पोट साफ होते.
काकडीत भरपूर प्रमाणात फायबर आणि पाणी असते. त्यामुळे नियमित पोट साफ होण्यास यामुळे मदत होते. ज्यांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांनी काकडी जरूर खावी.
3) रक्तातील साखर आटोक्यात ठेवते.
काकडी खाल्याने रक्तातील साखरेची पातळी आटोक्यात राहण्यास मदत होत असते. यामुळे मधुमेहाशी संबंधित गुंतागुंत कमी होतात.
4) हाडांसाठी उपयुक्त असते.
काकडीत हाडांसाठी उपयुक्त असणारे व्हिटॅमिन-K चे प्रमाण चांगले असते व्हिटॅमिन-K मुळे कॅल्शियमचे हाडांमध्ये शोषण होण्यास मदत करते.
5) डोळ्यांसाठी फायदेशीर असते.
काकडीचे काप डोळ्यांवर ठेवल्याने डोळ्यांना आराम मिळतो. डोळ्यांची सूज कमी होते. तसेच डोळ्याखाली आलेले काळे डाग देखील कमी होतात.
6) कॅन्सर पासून रक्षण होते.
काकडीमध्ये Molybdenum नावाचा एक प्रमुख असा पोषकघटक आढळतो. त्यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतो. त्यामुळे कॅन्सर पासून रक्षण होते. तसेच या पोषकतत्वामुळे चेतासंस्था आणि किडनीचे कार्य योग्य प्रकारे होण्यास मदत होते.
काकडी खाण्याचे तोटे –
काकडी जास्त प्रमाणात खाल्यास पोट बिघडू शकते. यामुळे पोट दुखणे, अपचन होणे, अतिसार यासारखे त्रास होऊ शकतात.
काकडी कोणी खाऊ नये..?
- सर्दी आणि सायनसचा त्रास असणाऱ्यांनी काकडी खाणे टाळावे.
- काकडीची ऍलर्जी असणाऱ्यांनी काकडी खाणे टाळावे.
- गरोदर स्त्रियांनी जास्त प्रमाणात काकडी खाऊ नये. कारण यामुळे पोटदुखी सारख्या समस्या होऊ शकतात.
- काकडीत पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने किडनीचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी काकडी खाणे टाळावे.
काकडी खाताना काय काळजी घ्यावी..?
काकडविर कीटकनाशके फवारली जातात. त्यामुळे बाजारातून काकडी आणल्यावर ती स्वच्छ धुवून मगचं खावी.
काकडीतील पोषकघटक –
फायबर्सचा चांगला स्त्रोत –
काकडी मध्ये फायबर्सचे प्रमाण मुबलक असते. 1 कप काकडीतून 0.83 ग्रॅम इतके तंतुमय पदार्थ मिळतात. म्हणजे 1 कप काकडीतून 4 टक्के फायबर्सची दररोजची गरज भागवली जाते.
काकडीतील विटामिन्स –
एक कप काकडीमध्ये विटमिन ‘ए’ चे प्रमाण 223.60 IU इतके असते. म्हणजे यामुळे विटामिन ‘ए’ ची 4.5 टक्के इतकी दैनिक गरज (RDA) भागवली जाते. काकडीमध्ये वाटामिन ‘ए’ मुबलक प्रमाणात असते. विटामिन ‘ए’ मुळे विविध कैन्सर होण्याचा धोका कमी होतो. तसेच डोळ्यांच्या आरोग्यासाठी, पांढऱ्या पेशींच्या (WBC) निर्मीतीसाठी विटामिन ‘ए’ ची महत्वाची भुमिका असते.
तर एक कप काकडीतून 5.5 mg इतके विटामिन ‘सी’ मिळते. यामुळे विटामिन ‘सी’ ची 10 टक्के इतकी दैनिक गरज (RDA) एक कप काकडीतून भागवली जाते
तर काकडीमध्ये विटामिन ‘के’, ‘ई’ आणि ‘बी’ अल्प प्रमाणात असतात.
काकडीतील खनिजतत्वे –
काकडीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, झिंक, पोटॅशियम, फॉस्फरस, तांबे, मॅंगनीज यासारखे खनिजतत्वे असतात. 100 ग्रॅम काकडीतून 150 मिग्रॅ इतके पोटॅशियम मिळते.
Cucumber Nutritional facts –
300-ग्रॅम काकडीमधून आपल्या शरीराला खालील पोषाकघटक मिळतात.
कॅलरी: 45
फॅट: 0 ग्रॅम
कर्बोदके: 11 ग्रॅम
प्रोटीन्स: 2 ग्रॅम
फायबर: 2 ग्रॅम
व्हिटॅमिन C: RDI च्या 14%
व्हिटॅमिन K: RDI च्या 62%
मॅग्नेशियम: RDI च्या 10%
पोटॅशियम: RDI च्या 13%
मॅंगनीज: RDI च्या 12%
हे सुध्दा वाचा – कोहळा खाण्याचे फायदे व तोटे जाणून घ्या.
Read Marathi language article about Health benefits and Side effects of Eating Cucumber. Last Medically Reviewed on February 15, 2024 By Dr. Satish Upalkar.