Dr Satish Upalkar’s article about Carrots health benefits in Marathi.
गाजर – Carrots :
गाजर हे कंदमूळ असून यात उपयुक्त अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर असे पोषकघटक असतात. गाजरात व्हिटॅमिन-A (म्हणजेच बीटा कॅरोटीन), व्हिटॅमिन-K1 (फायलोक्विनोन), व्हिटॅमिन-B6, बायोटिन आणि पोटॅशियम यांचे मुबलक प्रमाण असते. या लेखात डॉ सतीश उपळकर यांनी गाजर खाण्यामुळे होणारे फायदे व नुकसान याविषयी माहिती सांगितली आहे.
गाजर खाण्याचे फायदे –
गाजराचे आरोग्यासाठी अनेक फायदे असतात. व्हिटॅमिन-A चे प्रमाण गजरात भरपूर असल्याने त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते. गाजरे खाल्ल्याने रोग प्रतिकारकशक्ती वाढते. वाईट कोलेस्टेरॉलची पातळी देखील यामुळे कमी होते. रक्तदाब आटोक्यात राहतो. पर्यायाने हृदयविकाराचा धोका कमी होतो. यात असणाऱ्या कॅरोटीनॉइड्स अँटीऑक्सिडंट्समुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. यातील तंतुमय पदार्थांमुळे वजन कमी होते तसेच पोट नियमित साफ होण्यास मदत होते. असे आरोग्यासाठी गाजराचे विविध फायदे होतात.
1) डोळ्यांचे आरोग्य सुधारते.
गाजरात व्हिटॅमिन-A (बीटा कॅरोटीन) चे भरपूर प्रमाण असते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन-A महत्वाचे असते. यातील कॅरोटीनॉइड्स या अँटीऑक्सिडंट्समुळे मॅक्युलर डिजनरेशनचा धोका देखील कमी होत असल्याने गाजरे ही डोळ्यांच्या आरोग्यासाठी फारच उपयुक्त असतात.
2) रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होते..
गाजरात असणाऱ्या फायबर्स व उपयुक्त अँटीऑक्सिडंट्समुळे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. यामुळे हृदयविकार, पक्षाघात अशा गंभीर आजारांचा धोका कमी होतो.
3) रक्तदाब नियंत्रित राहतो..
रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी आवश्यक असे फायबर्स, पोटॅशियम, व्हिटॅमिन-C हे घटक गाजरात मुबलक असतात. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. ज्यांना हाय ब्लडप्रेशरची समस्या आहे त्यांनी गाजरे जरूर खावीत.
4) वजन कमी होते..
गाजरामध्ये कमी कॅलरीज असतात. तसेच यात पाणी, फायबर्स यांचे मुबलक प्रमाण असते. त्यामुळे गाजरे खाल्याने पोट भरते व लवकर भूक लागत नाही. आणि याचा परिणाम वजन कमी करण्यासाठी होतो. त्यामुळे वजन कमी करायचे असल्यास गाजरे जरूर खावीत.
5) कर्करोगाचा धोका कमी होतो..
गाजरामध्ये असणाऱ्या कॅरोटीनॉइड्स ह्या अँटीऑक्सिडंट्समुळे प्रोस्टेट कॅन्सर, कोलन कॅन्सर, पोटाचा कॅन्सर आणि स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो.
6) हाडे मजबूत होतात..
हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या पोटॅशियम ह्या घटकाचे प्रमाण गाजरामध्ये भरपूर असते. त्यामुळे हाडे मजबूत होण्यासाठी मदत होते. यामुळे दातांचे आरोग्य देखील चांगले राहते.
गाजर खाण्याचे तोटे : Carrot side effects –
गाजरे ठराविक प्रमाणात खाल्यास ती अपायकारक ठरत नाहीत. मात्र जास्त प्रमाणात गाजरे खाल्ल्याने पोट बिघडू शकते. तसेच यामुळे त्वचा पिवळी पडू शकते. जास्त प्रमाणात गाजरे खाल्ल्याने मधुमेही रुग्णांची साखर वाढू शकते. असे काही नुकसान गाजरे खाल्ल्याने होऊ शकतात.
गाजरातील पोषाकघटक (Nutrition value) –
100 ग्रॅम गाजरात पुढीलप्रमाणे पोषकतत्वे असतात.
- कॅलरी: 41
- पाणी: 88%
- प्रोटीन्स: 0.9 ग्रॅम
- कर्बोदके: 9.6 ग्रॅम
- साखर: 4.7 ग्रॅम
- फायबर: 2.8 ग्रॅम
- फॅट: 0.2 ग्रॅम
हे सुध्दा वाचा – बीट खाण्याचे फायदे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
4 SourcesIn this article information about Carrots Health benefits, Nutrition contents and Side Effects in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar (Certified physician and Healthcare expert).