डोळ्याखाली काळे डाग होणे – Eyes dark circle :
डोळ्याखाली काळे डाग पडण्याची समस्या अनेकांना असते. आजची धावपळीची जीवनशैली, अयोग्य आहार, अपुरी झोप, प्रदूषण, मानसिक ताण या कारणांमुळे डोळ्यांखाली काळे डाग येत असतात. या काळ्या डागांमुळे एकतर आपण वयस्कर किंवा आजारी दिसत असतो. त्यामुळे डोळ्यांखाली असणाऱ्या काळ्या डागांचा परिणाम आपल्या सौंदर्यावर होत असतो.
डोळ्याखालील काळे डाग जाण्यासाठी हे करा घरगुती उपाय :
मेकअप करून काळे डाग तात्पुरते झाकता येत असले तरीही हा त्याच्यावरचा योग्य उपाय नव्हे, यापेक्षा या समस्येवर अनेक चांगले उपयुक्त उपाय आहेत याद्वारे डोळ्याखालचे काळे डाग घालावण्यासाठी पूर्णपणे मदत होईल.
बटाट्याच्या चकत्या व रस –
बटाटा किसून त्याचा रस काळ्या डागांभोवती लावावा किंवा बटाटाच्या चकत्या ठेव्याव्यात आणि दहा मिनिटांनी चेहरा गार पाण्याने धुवावा. याशिवाय काकडीचे कापही डोळ्यांवर ठेवू शकता.
हर्बल चहा –
हर्बल चहा बनवल्यानंतर त्या टी बॅग्ज किंवा वापरलेला चहा पावडरचा चोथा टाकून न देता ते फ्रीजमध्ये ठेवावेत त्यानंतर टी बॅग्ज किंवा हर्बल चहा पावडर कापडात बांधून डोळ्यांवर ठेवावी. याचाही खूप चांगला उपयोग होतो आणि काळे डाग कमी होतात.
थंडगार लेप –
एक चमचा टोमॅटो रस, लिंबाच्या रसाचे काही थेंब, चिमूटभर हळद आणि थोडंसं गव्हाचे पीठ यांची पेस्ट बनवा. ही पेस्ट काळ्या डागांवर लावा व पंधरा मिनिटांनी धुवून टाका.
टोमॅटो आय टोनर –
लिंबाचा रस आणि टोमॅटोचा रस एकत्र करावा आणि या मिश्रणानं डोळ्याभोवतीच्या काळ्या डागांवर मसाज करावा. वीस मिनिटानंतर थोडे नारळ पाणी घेऊन त्यानं हे टोनर पुसून काढावा.
मसाज –
खोबऱ्याचे आणि बदामाच तेल एकत्र करून त्याने काळ्या डागांवर हलक्या हाताने मसाज करावा. एक तास हे तेल चेहऱ्यावर राहू द्यावे. तासाभराने चेहरा कोमट पाण्याने पुसावा आणि नंतर धुवावा.
डोळ्याखाली काळे डाग होऊ नये यासाठी ही काळजी घ्यावी :
• दिवसभरात भरपूर पाणी प्यावे. दिवसभरात साधारण आठ ग्लास पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक निघून जातील आणि काळ्या डागांचं प्रमाण कमी होईल.
• रात्रीची आठ तासांची झोप घ्या. अपुऱ्या झोपेमुळेही डोळ्याच्या खाली काळे डाग येऊ शकतात.
• चहा-कॉफीमुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होते. त्यामुळे कॅफेनयुक्त पेयांचं प्रमाण कमी करावे.
• भर उन्हात बाहेर जायचं असेल तर गॉगल आणि सनस्क्रीनचा वापर करावा.
चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्याचे उपाय जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.