Posted inDiet & Nutrition

काळी मिरी खाण्यामुळे होणारे फायदे व तोटे : Black pepper benefits

काळी मिरी – Black pepper : मिरी हा मसाल्यातील एक महत्वाचा असा घटक पदार्थ आहे. मिरीला मसाल्यांचा राजा असेही म्हणतात. यातील औषधी गुणांमुळे मिरीचे आयुर्वेदातही विशेष महत्व सांगितलेले आहे. मिरीमध्ये असणाऱ्या Piperine ह्या अँटी-ऑक्सिडंटमुळे कॅन्सर, हृद्यविकार यांपासून रक्षण होते. रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होते, ब्लड शुगरसुध्दा मिरीमुळे कमी होते. सूज कमी करणारे घटकही मिरीत असतात. […]

Posted inDiet & Nutrition

हळद खाण्याचे आरोग्यदायी फायदे – Turmeric Health benefits

हळद (Turmeric) : अन्नपचनाच्या दृष्टीने हळदीचा रोजच्या स्वयंपाकातील वापर महत्त्वाचा. हळदीचा वापर केवळ जेवणापुरताच मर्यादित नाही तर याचे अनेक औषधी गुणधर्मही आहेत. त्वचा, पोट आणि शरीराच्या अनेक आजारांवर हळदीचा वापर केला जातो. गुणकारी हळद : 1) सर्दी-खोकल्यात दुधात हळद टाकून प्यायल्यास फायदा होतो. 2) तोंड आल्यास कोमट पाण्यात हळद पावडर मिक्स करुन त्याच्या गुळण्या करा. […]

Posted inDiet & Nutrition

‘ड’ जीवनसत्व : महत्व, आहार स्त्रोत आणि कमतरतेमुळे होणारे आजार

व्हिटॅमिन D चे महत्व – ‘ड’ जीवनसत्व हे शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे असे vitamin  असते. ‘ड’ जीवनसत्त्वामुळे पाठीचा कणा, हाडे, किडनी यांचे आरोग्य सुधारते. हाडे मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी ते आवश्यक. ते रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते. मांसपेशींच्या कार्यात मदत करते. मधुमेह आणि कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांपासून बचाव करते.   ‘ड’ जीवनसत्वाचे आहार स्त्रोत : सूर्यप्रकाश: सूर्यप्रकाशातून त्वचेद्वारे शरीरात […]

Posted inDiet & Nutrition

फॉलिक अ‍ॅसिडचे फायदे – Folic acid benefits

फॉलिक ऍसिड : फॉलिक अ‍ॅसिडमुळे शरीराची चयापचय क्रिया सुधारते. रक्ताचं प्रमाण वाढतं. शरीरातील लोहाचं प्रमाण कमी होत नाही. म्हणूनच फॉलिक अ‍ॅसिडचं प्रमाण असणारे गाजर, बीट, मुळा आणि त्याची हिरवी पानं, कोबी हे पदार्थ खावेत, व्हिटॅमिन-B9 हे ‘फॉलिक अ‍ॅसिड’ या नावानेही ओळखलं जाते. गरोदर स्त्रिया, नवजात बालक यांना फॉलिक अ‍ॅसिडची गरज असते. फॉलिक अ‍ॅसिडमुळे पोटाचं आरोग्य […]

Posted inDiet & Nutrition

उत्तम आरोग्यासाठी भाज्या अशा शिजवाव्यात..

उत्तम आरोग्यासाठी योग्य पद्धतीने आहार बनवणेही गरजेचे असते जेणेकरून त्या आहारातील पोषक घटकांचा आपल्या शरीराला सम्यक उपयोग होईल. पालेभाज्या व फळभाज्यामध्ये भरपूर प्रमाणातं पोषक घटक असतात. भाज्या शिजवताना हे करा.. पालेभाज्या, फळभाज्या बाजारातून आणल्यावर पाण्याने स्वच्छ कराव्यात. त्यामुळे त्यावरील धूळ, केर, किटकनाशके निघून जातील. पालेभाज्या जास्त बारीक चिरणे टाळावे. जेव्हा पालेभाज्या बारीक चिरल्या जातात तेंव्हा […]

Posted inPregnancy Care

गरोदरपणात काय खावे व काय खाऊ नये?

गरोदरपणातील आहार : गर्भधारणा झाल्यापासून बाळाचा जन्म होईपर्यंत साधारणपणे नऊ महिने इतका कालावधी असतो. या नऊ महिन्यांत आईने पौष्टिक आहार घ्यायला हवा. कारण आई जो आहार घेत असते त्यावरच पोटातील बाळाचे पोषण होत असते. त्यामुळे बाळ निरोगी राहण्यासाठी गरोदरपणात आईने योग्य व संतुलित आहार घेणे आवश्यक असते. गरोदरपणात कोणता आहार घ्यावा याविषयी अनेक गरोदर महिलांना […]

Posted inDiet & Nutrition

Fresh diet: ताजा व गरम आहाराचे फायदे जाणून घ्या

आहार नेहमी ताजा असतानाच खावा असा अलिखित नियम आहे आणि हा नियम योग्यच आहे. शरीरातील जाठराग्नीमुळे अन्नाचे पचन योग्यप्रकारे होऊन रस, रक्त, मांस आदि धातुंचे पोषण होत असतो. तर असा हा जाठराग्नी आहार गरम असताना घेतल्यास प्रदिप्त होण्यास मदत होते. ताजे अन्न घेतल्याने होणारे फायदे : आहार गरम असताना घेतल्यास भूक वाढते, घेतलेल्या अन्नाचे सम्यक […]

Posted inDiet & Nutrition

हृद्याच्या आरोग्यासाठी योग्य आहार जाणून घ्या ..

हृद्याच्या कार्यात बिघाड झाल्यास अनेकविध विकार उत्पन्न होतात. हृद्रोगामुळे अकाली मृत्यु होण्याचा धोका वाढतो. यासाठी प्रत्येकाने हृद्याची काळजी घ्यावी. हृद्याच्या आरोग्यासाठी काय खावे..? हलका, सुपाच्य आहार घ्यावा. आहारात हिरव्या पालेभाज्या, हंगामी विविध फळे, फळभाज्या, कोशिंबीर, बदाम, मणुका, मोड आलेली कडधान्ये, तंतूमय पदार्थ यांचा भरपूर समावेश करावा. चांगले स्निग्धपदार्थ आहारात असावेत – आहारात मोनोअन्सॅच्युरेटेड (मूफा) आणि […]

Posted inDiet & Nutrition

उन्हाळ्याच्या दिवसात हा आहार घ्यावा

उन्हाळा आणि आहार : उन्हाळ्याच्या दिवसात जाठराग्नि मंद असतो. त्यामुळे आहाराचे योग्य प्रकारे पचन होण्यासाठी पचणास हलका आहार घेणे आवश्यक असते. तसेच उन्हाळ्यात आहार कमी प्रमाणातच घ्यावा लागतो. उन्हाळा ऋतू सुरू झाल्यावर आहार कोणता घ्यावा याची माहिती खाली दिली आहे. उन्हाळ्यातील आहार असा असावा : विविध पेये – माठातील थंड पाणी, कोकम सरबत, लिंबू सरबत, […]

Posted inDiet & Nutrition

हिवाळ्यात आपला आहार असा असावा

हिवाळ्यातील आहार : हिवाळा हा स्वभावतःच शीत हवामानाचा असतो. त्यामुळे शरीरातील संतुलन राखण्यासाठी उष्ण गुणात्मक आहाराचा समावेश हिवाळ्यामध्ये करणे गरजेचे असते. उष्ण वीर्यात्मक आहाराच्या सेवनाने शरीरातील अग्नी प्रदिप्त होतो. त्यामुळे भूक जास्त लागण्यास मदत होते शिवाय अन्नाचे सम्यक पचनही होते. हिवाळ्यामध्ये गुरु, स्निग्ध, उष्ण गुणात्मक आहार घ्यावा. हिवाळ्यात काय खावे ..? हिवाळ्यात दूध व दुग्धजन्य […]