आहार नेहमी ताजा असतानाच खावा असा अलिखित नियम आहे आणि हा नियम योग्यच आहे. शरीरातील जाठराग्नीमुळे अन्नाचे पचन योग्यप्रकारे होऊन रस, रक्त, मांस आदि धातुंचे पोषण होत असतो. तर असा हा जाठराग्नी आहार गरम असताना घेतल्यास प्रदिप्त होण्यास मदत होते.
ताजे अन्न घेतल्याने होणारे फायदे :
- आहार गरम असताना घेतल्यास भूक वाढते,
- घेतलेल्या अन्नाचे सम्यक पचन होते,
- अन्नाचे योग्य पचन झाल्याने रस, रक्तादि धातुंचे पोषण होते,
- शरीराचे पोषण होते, शरीरक्रिया सुरळीत होते,
- अन्न रुचकर लागते,
- अन्न लवकर पचते,
- पोट साफ होण्यास, मलमुत्राचे निसःरण योग्यरित्या होण्यास मदत होते. त्यामुळे शरीर हलके होते,
- शरीराचे संतुलन राखण्यास मदत होते.
यासाठी नेहमी ताजा, गरम आहारच सेवन करावा.
सर्वच ऋतुंमध्ये गरम आहार घेतला पाहिजे विशेषतः पावसाळा आणि हिवाळ्याच्या दिवसात तरी ताजा आणि गरम आहारच घेतला पाहिजे.
आहारसंबंधीत हे सुद्धा वाचा..
उत्तम आरोग्यासाठी भाज्या कशा शिजवाव्यात?
उन्हाळ्यात आहार कसा असावा?
Last Medically Reviewed on February 15, 2024 By Dr. Satish Upalkar.