हृद्याच्या आरोग्यासाठी आहार कसा असावा

1447
views

हृद्याच्या आरोग्यासाठी आहार कसा असावा –
हृद्याच्या कार्यात बिघाड झाल्यास अनेकविध विकार उत्पन्न होतात. हृद्रोगामुळे अकाली मृत्यु होण्याचा धोका वाढतो. यासाठी प्रत्येकाने हृद्याची काळजी घ्यावी.

हृद्याच्या आरोग्यासाठी योग्य आहार –
◦ हलका, सुपाच्य आहार घ्यावा.योग्य प्रमाणात आहार सेवन करावा.
◦ आहारात हिरव्या पालेभाज्या, हंगामी विविध फळे, फळभाज्या, कोशिंबीर, बदाम, मणुका, मोड आलेली कडधान्ये, तंतूमय पदार्थ यांचा भरपूर समावेश करावा.
◦ चांगले स्निग्धपदार्थ – आहारात मोनोअन्सॅच्युरेटेड [मूफा] आणि पॉलीअन्सॅच्युरेटेड [पूफा] फॅट्सचा समावेश करावा. यांदोहोंच्या सेवनाने शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होते आणि शरीरातील चांगले कोलेस्टेरॉल वाढण्यास मदत होते.

हृद्याच्या आरोग्यासाठी अयोग्य आहार –
हृद्याच्या आरोग्यासाठी खालील आहार घटकांचे सेवन करणे टाळणे गरजेचे असते. यांमध्ये,
◦ सॅच्युरेटेड फॅट्स – उदा. पामतेल, नारियल तेल, तूप, साय, लोणी, प्राणीज चरबी, अंड्यातील पिवळा बलक या पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड फॅट्सचे अधिक प्रमाण असल्याने वरील पदार्थांचे प्रमाणातच सेवन करावे. सॅच्युरेटेड फॅट्सच्या अतिसेवनाने वाईट कोलेस्टेरॉलमध्ये वाढ होते.यांमुळे हृद्यविकार, उच्चरक्तदाब, धमनीकाठिन्यतः, स्थुलता, मधुमेह यासारखे विकार उत्पन्न होतात.
◦ ट्रांस फॅट्स किंवा कृत्रिम स्निग्धपदार्थांचे सेवन करु नये. उदा. वनस्पती तूप यासारख्या पदार्थात ट्रांस फॅट्सचे प्रमाण अधिक असते.
◦ हवाबंद पाकिटे, शीतपेये, विविध मिठाया, बेकरी पदार्थ यांपासून दूरच रहावे.
◦ साखर, मीठाचे अल्प प्रमाणातच सेवन करावे. दररोज 5.8gm पेक्षा कमी प्रमाणामध्येच मीठ सेवन करावे. आहारातील मीठाचे प्रमाण, बाहेरील खाद्यपदार्थ जसे हवाबंद पाकीटे, बिस्किटे, चिवडा वैगरे यांसारख्या पदार्थांच्या पाकीटावरील मिठाचे प्रमाण पहावे. त्यानुसारच आपल्या आहारातील मिठाचे नियोजन ठेवावे.
लक्षात ठेवा 5.8 ग्रॅम पेक्षा अधिक मिठाचे एका दिवसामध्ये सेवन करणे धोकादायक असते. त्यामुळे उच्च रक्तदाब, हृद्यरोग, धमनीकाठिन्यता यासारखे गंभीर विकार होण्याचा धोका वाढतो.
◦ तेलकट पदार्थ, आंबट पदार्थ, पचायला जड असणारा आहार यांचे सेवन करु नये.
◦ धुम्रपान, मद्यपान, तंबाखुसेवनाने हृद्यविकाराचा धोका अधिक पटीने वाढतो. यासाठी हृद्याच्या आरोग्यासाठी व्यसनांचा त्याग करणे अत्यंत आवश्यक आहे.


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.