Dr Satish Upalkar’s article about Peptic ulcer Diet plan in Marathi.

अल्सर झाल्यास काय खावे व काय खाऊ नये याची माहिती Dr Satish Upalkar यांनी येथे दिली आहे.

पेप्टिक अल्सर आणि आहार –

अल्सरचा त्रास अनेकांना असतो. अल्सर मध्ये पोटाच्या किंवा लहान आतड्याच्या आतील आवरणास जखम होते. अल्सरमुळे पोट दुखणे, पोटात जळजळ होणे यासारखे त्रास होतात. अल्सरमध्ये उपचाराबरोबरच योग्य आहार घेण्याची आवश्यकता असते. अल्सरमध्ये आहार पथ्य पाळावे लागते. अल्सर झाल्यास काय खावे व काय खाऊ नये याविषयी मराठी माहिती डॉ सतीश उपळकर यांनी येथे दिली आहे.

हेलिकोबॅक्टर पायलोरी ह्या बॅक्टेरियाचे पोटातील इन्फेक्शन, पोटातील ऍसिड, एस्पिरिन सारख्या ओव्हर-द-काउंटर वेदनाशामक औषधांचा अतिवापर, मद्यपान, तंबाखू किंवा सिगारेटचे व्यसन, वारंवार तिखट मसालेदार पदार्थ खाण्याची सवय अशा अनेक कारणांनी अल्सारचा त्रास होत असतो.

हे सुध्दा वाचा – अल्सरची कारणे, लक्षणे व उपचार जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

अल्सर झाल्यास काय खावे ..?

 • अल्सर असल्यास ग्लासभर दूध आहारात असावे.
 • तूप घालून वरण भात खावा. तूप हे उत्तम पित्तनाशक असल्याने त्याचा ऍसिडिटी कमी होऊन अल्सरवर खूप चांगला उपयोग होतो.
 • दह्यामध्ये प्रोबायोटिक्स घटक असल्याने अल्सर असल्यास दह्याचा आहारात समावेश करावा. दही खाण्याचे फायदे वाचा..
 • दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे.
 • आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, ताजी फळे, हळद, लसूण, मध यांचा समावेश असावा.
 • केळी, डाळींब, सफरचंद, स्ट्रॉबेरी अशी फळे खावीत.
 • उपाशीपोटी फार वेळ न राहू नये. जेवणाच्या वेळा कटाक्षाने पाळाव्यात. कामाच्या व्यापात जेवण करणे विसरू नका.

अल्सर झाल्यास रुग्णांनी असा आहार घेणे आवश्यक आहे.

अल्सर झाल्यावर काय खाऊ नये ..?

 • अल्सर मध्ये तिखट पदार्थ, मसालेदार पदार्थ, खारट पदार्थ, लोणची, पापड, स्नॅक्स, चिप्स, फास्टफूड, चॉकलेट असे पदार्थ खाणे टाळावे.
 • अल्सर असणाऱ्यांनी चहा, कॉपी, कोल्ड्रिंक्स पिणे टाळावे.
 • पोटातील एसिड वाढवणारे लिंबू, टोमॅटो असे पदार्थ खाणे टाळावे.
 • एच पायलोरी या बॅक्टेरियाचा संसर्ग टाळण्यासाठी दूषित अन्न, दूषित पाणी, उघड्यावरील पदार्थ खाऊ नयेत.
 • अल्सरमध्ये छातीत जळजळ होत असल्यास लिंबूपाणी पिऊ नका.
 • ‎अल्सर झाल्यास मद्यपान, तंबाखू व धुम्रपान पूर्णपणे बंद करा.
 • वारंवार डोकेदुखी, अंगदुखीच्या वेदनाशामक गोळ्या औषधे खाणे टाळा.

अल्सर रुग्णांसाठी आहार महत्व –

अशाप्रकारे अल्सर साठी पथ्य आणि अपथ्य असले पाहिजे. अल्सरच्या त्रासावर वेळीच उपचार होणे व योग्य आहार घेणे महत्वाचे आहे. कारण अल्सरकडे दुर्लक्ष केल्यास ते जीवघेणे ठरू शकते. यामुळे पोटात रक्तस्त्राव होण्याची तसेच पोटाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो.

यासाठी हे सुध्दा वाचा –
पेप्टिक अल्सरची कारणे, लक्षणे व उपचार जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

4 Sources

Image source – Pixabay.com

Information about ulcer Diet plan in Marathi language. This article was written by Dr Satish Upalkar.

Medically Reviewed By - Dr. Satish Upalkar
Dr. Satish Upalkar is a Healthcare counsultant. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra University of Health Science, Nashik and is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai.
Qualification: Bachelor of Ayurveda Medicine and Surgery (B.A.M.S.)
Medical Council Registration number: I-72800-A
Contact details -[email protected]
Follow - LinkedIn | Facebook | Twitter | YouTube