करपट ढेकर येणे –
दिवसभरात आपल्याला काहीवेळा ढेकर हा येतोचं. आपली पचनसंस्था ही पोटातील अतिरिक्त असणारी हवा काढून टाकत असते, यासाठीच ढेकर येतो. तसेच आपणास काहीवेळा करपट ढेकर येतात. अशावेळी आंबट-कडवट ढेकर बरोबर दुर्गंधीयुक्त वाससुध्दा येऊ लागतो. करपट ढेकर येण्याची कारणे व उपाय याची माहिती डॉ सतीश उपळकर यांनी येथे दिली आहे.
करपट ढेकर येण्याची कारणे –
- तिखट, मसालेदार, आंबट-खारट पदार्थ असे पित्त वाढवणारे पदार्थ अधिक खाण्यामुळे करपट ढेकर येतात.
- पचनास जड असणारे पदार्थ खाण्यामुळे जसे हरभरे, वाटाणा, कोबी, मैद्याचे पदार्थ, तेलकट पदार्थ खाण्यामुळे करपट ढेकर येतात.
- सल्फर घटक असणारे ब्रोकोली, कोबी, मुळा यासारखे पदार्थ अधिक खाण्यामुळे करपट ढेकर येतात.
- अन्न गिळताना किंवा पाणी पिताना हवा गिळल्यामुळे,
- अधिक प्रमाणात भरपेट अन्न खाण्यामुळे,
हायपर अॅसिडिटी, पोटाचा अल्सर, गॅस्ट्रोपॅरेसिस, पित्ताशयातील खडे, Gastroesophageal reflux disease (GERD) अशा समस्या असल्यास त्यामुळेही करपट ढेकर येऊ शकतात. - मद्यपान, तंबाखू, सिगारेट यासारखी व्यसने,
अशा कारणांनी करपट ढेकर येऊ लागतात.
दुर्गंधीयुक्त करपट ढेकर का येतात ..?
अन्नावर पचनक्रिया होताना पोटात हायड्रोजन सल्फाईड यासारखे वायू तयार होत असतात. अशावेळी जेवताना अन्नाबरोबर गिळलेली हवा या वायुत मिसळते. त्यामुळे ढेकर आल्यावर हायड्रोजन सल्फाईड वायूमिश्रित हवा तोंडातून बाहेर पडत असते. अशाप्रकारे दुर्गंधीयुक्त वास असणारे करपट ढेकर येतात.
करपट ढेकरा आल्यावर तोंड आंबट-कडवट बनते तसेच छातीत जळजळ होऊ शकते. काहीवेळा खाल्लेले अन्न पुन्हा तोंडात येऊ शकते, असे त्रास यामध्ये होतात. करपट ढेकर येणे ही एक सामान्य अशी तक्रार असते. यावर सहसा उपचारांची गरज नसते. मात्र वारंवार करपट ढेकर येण्याचा त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.
करपट ढेकर येणे यावर उपाय –
- भराभर अन्न खाल्याने घासाबरोबर पोटात हवा शिरत असते. यासाठी सावकाश अन्न चवून खावे.
- जेवताना बोलू नये. कारण यामुळेही पोटात हवा शिरत असते.
- जेवताना सारखे पाणी पिणे टाळावे. यापेक्षा जेवणानंतर अर्ध्या तासाने पाणी प्या.
- एकाचवेळी भरपेट जेवण करणे टाळा. दिवसभरात 3 ते 4 वेळा थोडे थोडे खावे.
- जेवल्यावर लगेच झोपणे टाळावे.
- तिखट, आंबट-खारट, मसालेदार अन्नपदार्थ, जड पदार्थ वारंवार खाणे टाळा. चहा, कॉफी वारंवार पिणे टाळा.
- कोल्ड्रिंक्स, सोडा असणारी पेये पिणे टाळा.
- मद्यपान, तंबाखू आणि धूम्रपान अशा व्यसनांपासून दूर राहा.
हे उपाय अवलंबल्यास करपट ढेकर येणे ही समस्या निश्चितच कमी होते.
करपट ढेकर येणे यावर घरगुती उपाय –
- करपट ढेकर येत असल्यास बडशेप चघळून खावी.
- जिरे चघळल्याने करपट ढेकर येणे थांबते. पचनक्रियेसाठी उपयुक्त असे आयुर्वेदिक गुणधर्म जिऱ्यात असतात. त्यामुळे ते करपट ढेकर साठी उपयुक्त ठरते.
- करपट ढेकर येत असल्यास अर्धा चमचा ओव्यात चिमुटभर सैंधव मीठ मिसळून खावे.
- चिमुटभर हळद खाल्याने सुद्धा करपट ढेकर कमी होण्यास मदत होते.
करपट ढेकर साठी वरील घरगुती उपाय उपयोगी पडतात.
डॉक्टरांकडे कधी जाणे आवश्यक आहे ..?
जर अधिक दिवस करपट ढेकर येण्याची समस्या होत असेल तर, डॉक्टरकडे जाणे आवश्यक आहे. कारण या त्रासाचे निदान करून, डॉक्टरचं त्यावर योग्य अशी औषधे देतील.
करपट ढेकर येणे हा त्रास आम्लपित्त मुळेही होऊ शकतो. आम्लपित्त वरील उपाय जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
Karpat dhekar is called ‘Sulfur Burps’ in English. This article information about Sulfur Burps causes, treatments & Home remedies in Marathi language. Article written by Dr Satish Upalkar.