Dr Satish Upalkar’s article about causes and treatments of Right side Stomach pain in Marathi.
उजव्या बाजूला पोटात दुखणे – Right side stomach pain :
काहीवेळा आपल्या पोटात उजव्या बाजूला वेदना होऊ लागतात. या पोटदुखीची वेगवेगळी कारणे असू शकतात. कारण आपल्या पोटात उजव्या बाजूस यकृत, पित्ताशय, आतड्याचा उजवीकडील भाग, अपेंडिक्स, उजव्या बाजूची किडनी तसेच स्त्रियांमध्ये right ovary असे अवयव असतात. त्यामुळे विवध कारणांमुळे उजव्या बाजूला पोटदुखी होऊ शकते. पोटात उजव्या बाजूला दुखणे याची कारणे व त्यावरील उपाय याविषयी माहिती डॉ. सतीश उपळकर यांनी येथे दिली आहे.
पोटात उजव्या बाजूला दुखणे याची कारणे –
- पचनासंबधित गॅसेस, अपचन, बद्धकोष्ठता (Constipation), गॅस्ट्रोएन्टेरिटिस, इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS), IBD, अन्न विषबाधा अशा कारणांनी उजव्या बाजूस पोटात दुखू लागते.
- अपेंडिक्सला सूज आल्याने पोटात उजवीकडे दुखते.
- उजव्या किडनीत स्टोन किंवा इन्फेक्शन झाल्याने पोटात उजव्या बाजूला दुखते.
- हर्नियामुळे सुध्दा काहीवेळा उजव्या बाजूला पोटदुखी होते.
- यकृताला सूज येणे, यकृताचे आजार तसेच पित्ताशयातील खडे यामुळेही उजव्या बाजूला पोटात दुखू लागते.
- स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या वेळी, तसेच गरोदरपणात Ectopic pregnancy मुळे उजव्या बाजूला पोटात दुखू शकते.
पोटात उजवीकडे दुखणे याची पचनासंबधित कारणे –
गॅसेस, अपचन, बद्धकोष्ठता (Constipation), गॅस्ट्रोएन्टेरिटिस, इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS), IBD, अन्न विषबाधा, पित्त यासारख्या पचनासंबधित समस्यांमुळे पोटाच्या उजव्या बाजूला वेदना होऊ शकतात. जर पचनासंबधित कारणांनी उजव्या बाजूला पोटात दुखत असल्यास यावेळी खालील लक्षणेसुध्दा जाणवू शकतात.
- उजव्या बाजूला पोटात दुखणे,
- पोटात गॅस होणे,
- पोट फुगणे,
- पोट साफ न होणे,
- पातळ शौचास होणे,
- छातीत जळजळ होणे,
असे त्रास यावेळी होतात.
पोटात उजवीकडे दुखणे याची अपेंडिक्स संबधित कारणे –
अपेंडिक्स हा अवयव पोटात उजव्या बाजूला असतो. जर इन्फेक्शन होऊन अपेंडिक्सला सूज आली असल्यास त्यामुळे पोटात उजव्या बाजूला दुखू लागते. या त्रासाला ‘अपेंडिसाइटिस‘ असे म्हणतात. यामध्ये खालील लक्षणेसुध्दा जाणवू शकतात.
- उजव्या बाजूला पोटात अतिशय वेदना होणे,
- उलट्या व मळमळ होणे,
- ताप येणे,
- भूक कमी होणे,
अशी लक्षणे यावेळी जाणवतात.
असे त्रास होत असल्यास डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे. कारण उपचार न केलेले अॅपेन्डिसाइटिस जीवघेणे ठरू शकते. त्यामुळे वरील लक्षणे जाणवत असल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जावे.
पोटात उजवीकडे दुखणे याची किडनी संबधित कारणे –
किडनी स्टोन, किडनी इन्फेक्शन किंवा किडनी कॅन्सर अशा समस्या उजव्या बाजूच्या किडनीत झाल्यास त्यामुळे उजव्या बाजूला पोटात दुखू लागते. अशावेळी खालील लक्षणेसुध्दा जाणवू शकतात.
- उजव्या बाजूला पोटात अतिशय वेदना होणे,
- लघवी करताना वेदना अधिक होणे,
- लघवीला जळजळ होणे,
- लघवीत रक्त पडणे,
- ताप येणे,
असे त्रास यावेळी होऊ लागतात.
अशावेळी डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे. कारण किडनी स्टोन किंवा इन्फेक्शनमुळे किडनीला दीर्घकालीन नुकसान होऊ शकते, यासाठी या समस्येवर त्वरीत उपचार करणे महत्त्वाचे आहे.
पोटात उजवीकडे दुखणे याची यकृत व पित्ताशय संबधित कारणे –
यकृताला सूज येणे (हिपॅटायटीस), यकृताचे आजार, यकृताचा कर्करोग तसेच पित्ताशयातील खडे यामुळेही उजव्या बाजूला पोटात दुखू लागते. यावेळी त्वचा पिवळसर होणे, ताप येणे, भूक कमी होणे अशी लक्षणे जाणवू शकतात.
स्त्रियां संबधित कारणे –
स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या वेळी उजव्या बाजूला पोटात दुखू शकते. यावेळी उजव्या बाजूला पोटात दुखणे, मळमळ होणे, पातळ शौचास होणे, डोकेदुखी, डोके गरगरणे असे त्रास जाणवू शकतात.
कधी डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे ..?
खालील लक्षणे जाणवत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता, तातडीने आपल्या डॉक्टरांकडे जावे.
- पोटात उजव्या बाजूला अतिशय वेदना होणे,
- छातीत दुखणे,
- ताप येणे,
- शौचावाटे रक्त पडणे,
- लघवीतून रक्त पडणे,
- उलट्या होणे,
- उलटीतून रक्त पडणे,
- त्वचा पिवळसर होणे,
- पोटावर सूज येणे
अशी लक्षणे दिसून आल्यास तातडीने आपल्या डॉक्टरांकडे जावे.
पोटात उजव्या बाजूला दुखणे यावर घरगुती उपाय –
- अर्धा कप पाण्यात लिंबू रस व काळे मीठ घालून ते मिश्रण प्यावे.
- गरम पाण्यात अर्धा चमचा ओवा मिसळून ते पाणी प्यावे. यामुळे उजव्या बाजूला पोटात दुखणे थांबते.
- आल्याचे तुकडे पाण्यात घालून ते पाणी उकळावे. मिश्रण कोमट झाल्यावर ते पाणी अर्धा कप प्यावे.
चहामध्ये आले टाकून काळा चहा प्यावा. - डाळिंबाच्या दाण्यात थोडे काळे मीठ मिसळून ते दाणे खाल्याने उजव्या बाजूला पोटात दुखणे थांबते.
- पोटावर गरम शेक घ्यावा.
हे घरगुती उपाय खानपान संबंधित गॅसेस, अपचन, बद्धकोष्ठता अशा कारणांमुळे पोटात उजव्या बाजूला दुखत असल्यास उपयोगी पडतात. मात्र जर इतर गंभीर कारणामुळे पोटात उजवीकडे दुखत असल्यास त्यावर घरगुती उपाय करीत वेळ वाया घालवू नये. अशावेळी तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावेत.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
खालील लेख सुध्दा वाचा –
4 Sources- https://my.clevelandclinic.org/health/articles/appendicitis
- https://www.kidneyfund.org/kidney-disease/kidney-problems/kidney-infection.html
- https://www.mayoclinic.org/symptoms/abdominal-pain/basics/when-to-see-doctor/sym-20050728%20-
- https://www.mayoclinic.org/diseases-conditions/kidney-stones/symptoms-causes/syc-20355755
Image source – Pixabay.com
Information about Right Abdomen pain Causes, Symptoms, Treatments and Home remedies in Marathi language. Article written by Dr Satish Upalkar.