Posted inChildren's Health

Childhood asthma: बालदमा लक्षणे, कारणे व उपचार

बालदमा (Asthma in Children) : दमा हा एक दीर्घकालीन (क्रॉनिक) असा आजार आहे. यामध्ये आपल्या श्वसनमार्गावर परिणाम होत असतो. जो आपल्या वायुमार्गावर परिणाम करतो. दम्यामध्ये श्वसनमार्ग अरुंद आणि सुजयुक्त बनतो. त्यातून अधिक प्रमाणात कफाची (Mucus) निर्मिती होते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊन दम लागत असतो. दमा हा आजार सर्वच वयाच्या लोकांना होऊ शकतो. लहान मुलांमध्ये […]

Posted inDiagnosis Test

महिलांसाठी आवश्यक वैद्यकीय तपासण्या : Health Checkup

महिलांसाठी आवश्यक हेल्थ चेकअप – आजच्या व्यस्त जीवनामध्ये महिलांना आपल्या आरोग्याविषयी अत्यंत जागरूक असणे गरजेचे झाले आहे. आज महिलांमध्ये हृद्यविकार, मधुमेह, स्तनाचा कर्करोग, गर्भाशय कर्करोग, हाडांचे विकार, रक्तदाब या सारखे विविध गंभीर विकार उद्भवत आहेत. त्यामुळे अकाली मृत्यु होण्याचे प्रमाण वाढले आहे. या ‘सायलंट किलर’ ठरणाऱ्या विकारांचे वेळीचं निदान झाल्यास त्यापासून आपला बचाव करणे शक्य […]

Posted inDiagnosis Test

CT Scan: सीटी स्कॅन तपासणी म्हणजे काय ते जाणून घ्या..

CT स्कॅन – म्हणजेच कॉम्प्युटराईज्ड टोमोग्रॉफी. सी.टी. स्कॅन ही रेडिओलॉजीमधील अगदी महत्त्वाची डेव्हलपमेंट आहे. सीटी स्कॅनला कॅट स्कॅन (CAT) कम्प्युटराईज्ड ऍक्सिअल टोमोग्रॉफी देखील म्हणतात. सीटी स्कॅन हे एक्सरे (क्ष किरण) प्रकारातील ऍडव्हान्स तंत्र आहे. त्यामुळे आपल्याला छोट्या छोट्या अवयवांबद्दल देखील स्टँडर्ड एक्सरेपेक्षा अधिक खोलवर (डिटेल) माहिती देते. एक्सरे मशिन्स एका जागी स्थिर असतं तर हे […]

Posted inDiagnosis Test

सोनोग्राफी तपासणी कशासाठी करतात ते जाणून घ्या..

सोनोग्राफी तपासणी म्हणजे काय (Ultrasound Sonography) : अल्ट्रासाऊंड स्कॅन ही एक वैद्यकीय तपासणी आहे. यामध्ये हाय-फ्रिक्वेन्सी ध्वनी लहरींचा वापर करून आपल्या शरीराच्या आतील अवयवांची स्थिती कॉम्प्युटरवर images स्वरुपात तपासली जाते. इतर स्कॅनिंग तपासणीप्रमाणे, अल्ट्रासाऊंड सोनोग्राफीमध्ये रेडिएशनचा वापर केला जात नाही. त्यामुळे सोनोग्राफी तपासणी ही सुरक्षित असते. म्हणूनच गर्भधारणेदरम्यान गर्भाची स्थिती पाहण्यासाठी सोनोग्राफी तपासणीचा वापर केला जातो. […]

Posted inDiagnosis Test

MRI स्कॅनिंग तपासणी म्हणजे काय? ती कशी केली जाते ते जाणून घ्या..

MRI Scanning तपासणी : मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग (Magnetic Resonance Imaging) म्हणजेच MRI तपासणी. आज MRI स्कॅनिंग तपासणीचा उपयोग विविध आजारांच्या निदानासाठी केला जात आहे. MRI स्कॅनिंग तपासणीवेळी कोणताही विशेष त्रास होत नाही. MRI स्कॅनिंग हे तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्रासाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहे. MRI मध्ये स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड व रेडिओ लहरींचा वापर केला जातो. त्यामुळे MRI […]

Posted inDiagnosis Test

थायरॉइड टेस्ट : T3, T4, TSH Test बद्दल जाणून घ्या

थायरॉइड टेस्ट (Thyroid Test) : थायरॉइड ही आपल्या शरीरातील अतिशय महत्त्वपूर्ण अशी एक ग्रंथी आहे. थायरॉइड ग्रंथी शरीरात गळ्याजवळ असते. तिचा आकार एखाद्या फुलपाखरासारखा असतो. या ग्रंथीतून T3 आणि T4 या संप्रेरकांची (हार्मोन्स) निर्मिती होते. शरीरक्रिया सुरू ठेवण्यासाठी या हार्मोन्सची गरज असते. शरीरातील बहुतेक क्रियांचा वेग हा या हार्मोन्सवर अवलंबून असतो. थायरॉइड ग्रंथींतून स्र्वणाऱ्या संप्रेरकांमुळे […]

Posted inDiagnosis Test

Mammography: मैमोग्राफी तपासणी कशी केली जाते?

स्तन कॅन्सरचे निदान करण्यासाठी मैमोग्राफीद्वारे स्क्रीनिंग परिक्षण केले जाते. क्ष-किरण परिक्षणासारखेच मैमोग्राफीचे चाचणी असून 30 मिनिटामध्ये टेस्ट पूर्ण होते. तसेच चाचणीवेळी कोणताही त्रास होत नाही. या चाचणीतून उपस्थित गाठ ही कॅन्सरची आहे की नाही याचे निदान होण्यास मदत होते.

Posted inDiagnosis Test

पॅप टेस्ट – सर्वायकल कॅन्सर निदानासाठी Pap Test कशी केली जाते?

पॅप टेस्टमुळे सर्वायकल कँसरचे निदान होण्यास मदत होते. सर्वायकल कँसर (गर्भाशय मुखाचा कर्करोग) हा स्त्रियांमधील सर्विक्स ह्या भागात होणारा कँसर आहे. सर्विक्स म्हणजे गर्भपिशवी आणि योनीला जोडणारा भाग. तर आशा ह्या सर्विक्सच्या पेशींमध्ये होणाऱ्या सर्वायकल कँसरचे निदान पॅप टेस्टमुळे केले जाते.

Posted inHealth Tips

Menopause: महिलांनी रजोनिवृत्तीमध्ये घ्यावयाची काळजी

रजोनिवृत्ती : स्त्रीमध्ये जेंव्हा मासिक पाळी येणे पूर्णतः बंद होते त्या अवस्थेस रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज असे म्हणतात. रजोनिवृत्ती ही एक प्रत्येक स्त्रीमध्ये ठराविक काळानंतर साधारणपणे 40 ते 55 वयानंतर येणारी एक सामान्य अवस्था असते. या अवस्थेमध्ये स्त्रीच्या शरीरामध्ये हॉर्मोनल परिवर्तन होते आणि त्यामुळे मासिक पाळी पूर्णपणे बंद होण्यास सुरवात होते. रजोनिवृत्तीमध्ये कोणती काळजी घ्यावी..? रजोनिवृत्तीची […]