रजोनिवृत्ती :
स्त्रीमध्ये जेंव्हा मासिक पाळी येणे पूर्णतः बंद होते त्या अवस्थेस रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज असे म्हणतात. रजोनिवृत्ती ही एक प्रत्येक स्त्रीमध्ये ठराविक काळानंतर साधारणपणे 40 ते 55 वयानंतर येणारी एक सामान्य अवस्था असते. या अवस्थेमध्ये स्त्रीच्या शरीरामध्ये हॉर्मोनल परिवर्तन होते आणि त्यामुळे मासिक पाळी पूर्णपणे बंद होण्यास सुरवात होते.
रजोनिवृत्तीमध्ये कोणती काळजी घ्यावी..?
- रजोनिवृत्तीची भीती मनातून काढून टाकावी.
- रजोनिवृत्ती ही एक स्वाभाविक अवस्था असून त्याविषयी भयभीत होण्याचे काहीच कारण नाही.
- रजोनिवृत्तीमध्ये आहाराकडे विशेष ध्यान देणे आवश्यक असते. पौष्टिक, सहज पचणारा आहार घ्यावा.
- हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये, विविध फळे, तंतुमय पदार्थांचा आहारात समावेश करावा.
- या अवस्थेमध्ये हाडे ठिसूळ होण्याचे प्रमाण वाढते त्यामुळे आहारात कैल्शियम युक्त पदार्थांचा समावेश ठेवावा. ऑस्टिओपोरीस ह्या हाडे ठिसूळ होणाऱ्या आजाराची माहिती जाणून घ्या..
- रजोनिवृत्ती अवस्थेमध्ये हलका व्यायाम करावा. नातवंदसमावेत खेळावे यांमुळे शारीरिक व्यायामासोबतच मनही रमून जाईल.
- सकाळ-संध्याकाळी फिरावयास जावे. योगासने करावीत.
- नियमित वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. महिलांनी कोणत्या वैद्यकीय तपासण्या करून घेणे आवश्यक आहे ते जाणून घ्या..
- मानसिक ताण, तणावापासून दूर राहावे, यासाठी प्राणायाम, ध्यानधारणा करावी. अध्यत्माची ओढ लावून घ्यावी. विविध कादंबऱ्या, पुस्तके वाचावीत, आपल्या आवडीचा छंद जोपासावा.
Read Marathi language article about Menopause care tips. Last Medically Reviewed By Dr. Satish Upalkar on February 14, 2024.