महिलांसाठी आवश्यक हेल्थ चेकअप –
आजच्या व्यस्त जीवनामध्ये महिलांना आपल्या आरोग्याविषयी अत्यंत जागरूक असणे गरजेचे झाले आहे. आज महिलांमध्ये हृद्यविकार, मधुमेह, स्तनाचा कर्करोग, गर्भाशय कर्करोग, हाडांचे विकार, रक्तदाब या सारखे विविध गंभीर विकार उद्भवत आहेत. त्यामुळे अकाली मृत्यु होण्याचे प्रमाण वाढले आहे. या ‘सायलंट किलर’ ठरणाऱ्या विकारांचे वेळीचं निदान झाल्यास त्यापासून आपला बचाव करणे शक्य आहे यासाठी वेळोवेळी हेल्थ चेकअप करून घेणे गरजेचे झाले आहे.
1) सामान्य आरोग्य तपासणी :
महिलांनी नियमित एक किंवा दोन वर्षातून एकदा आपल्या शरीराचे चेकअप करून घ्यावे. यामुळे भविष्यात होणाऱ्या रोगांचे निदान वेळीचं होण्यास मदत होते.
2) थायराइड टेस्ट :
याशिवाय तीन किंवा चार वर्षातून एकदा थायराइड टेस्ट (टीएसएच, टी 3, टी -4) जरूर करून घ्या असे केल्याने थायराइड ग्रंथी संबंधीत विविध रोग होण्यापासून रक्षण करता येते.
3) हाडांची तपासणी :
वाढत्या वयाबरोबर आपली हाडे कमजोर होऊ लागतात. हाडे ठिसुळ बनल्याने अनेक रोगांना निमंत्रण मिळते यासाठी हाडांचे चेकअप करने गरजेचे आहे. महिलांनी आपली बीएमडी म्हणजे बोन मिनरल डेंसिटी टेस्ट ची तपासनी वयाच्या 50शी नंतर करून घ्यावी.
4) ब्रेस्ट कैंसर चेकअप :
बहुतांश वेळेला स्त्रीला स्वत:ला स्तनांचा कर्करोग झाला आहे हे कळतच नाही. जेव्हा कळतं तेव्हा उशिर झालेला असतो. आज भारतीय स्त्रियांना होणा-या कर्करोगाच्या प्रकारांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचं प्रमाण सर्वात जास्त आहे आणि सुमारे 13 लाख स्त्रीया या स्तनांच्या कर्करोगाने पिडित आहेत. स्तनांचा कर्करोग हा असा आजार आहे की, ज्याचे जितक्या लवकर निदान होईल तितक्या लवकर यावर उपाय करणे शक्य होते.
यासाठी वयाच्या 35 शी नंतर वर्षातून एकदा मेमोग्राफी टेस्ट व क्लीनिकल ब्रेस्ट चेक-अप करणे तर 35 वर्षाच्या आतिल स्त्रियांनी किमान दोन वर्षाआड तज्ञांकडून क्लीनिकल ब्रेस्ट चेक-अप करुन घ्यावी. या टेस्टमुळे सुरवातीच्या अवस्थेमध्येचं स्तन कैंसर ला ओळखून त्याला अटकाव करण्यास मदत होते.
5) डायबिटीज चेकअप :
डायबिटीज म्हणजेचं मधुमेहापासून रक्षण करण्यासाठी वयाच्या 30शी नंतर वर्षातून एकदा ब्लड ग्लूकोस टेस्ट करून घ्या. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कळते आणि डायबिटीज आणि त्याच्या दुष्परीणामापासून रक्षण करण्यास मदत होते.
6) ह्रदय तपासणी :
महिलांनी वयाच्या 30शी नंतर वर्षातून एकदा ब्लड प्रेशर स्क्रीनिंग टेस्ट आणि ECG टेस्ट करून घ्यावी. यामुळे विविध हृद्यरोगांपासून रक्षण करता येते. याशिवाय 35 वर्षानंतर दर पाच वर्षातून एकदा कोलेस्ट्रॉल स्क्रीनिंग टेस्ट जरूर करून घ्या.
7) रिप्रोडक्टिव हेल्थ :
प्रजनन संस्थेचे आरोग्य राखण्यासाठी वयाच्या 21-65 वर्षानंतरच्या प्रत्येक स्त्रीने 3 वर्षातून एकदा तरी पॅप टेस्ट करून घेणे गरजेचे आहे. पॅप स्मिअर टेस्ट करून सर्वाइकल कैंसर, गर्भाशयाच्या कर्करोगाचे वेळीचं निदान करता येते.
तर वंधत्वाची समस्या होऊ नये म्हणून 18 ते 40 वयाच्या महिलांनी नियमित ‘पीसीओएस’ संबंधी हेल्थ चेकअप करून घ्या. ‘पीसीओएस’ हे सध्याच्या काळात वंध्यत्वाचे एक सर्वाधिक प्रमुख कारण बनले आहे.
Last Medically Reviewed By Dr. Satish Upalkar on February 14, 2024.