Posted inDiseases and Conditions

अर्धांगवायू कशामुळे होतो? त्याची लक्षणे, कारणे आणि उपचार जाणून घ्या

अर्धांगवायू म्हणजे काय..? अर्धांगवायू हा मेंदूसंबंधी एक गंभीर आजार असून यावर वेळीच उपचार न केल्यास रुग्णांमध्ये कायमचं अपंगत्वही येऊ शकते. मेंदूला योग्यप्रकारे रक्तपुरवठा न झाल्यास अर्धांगवायूचा झटका येतो त्यामुळे रुग्णाच्या हाता-पायातील ताकद कमी होते व हातपाय लुळे पडतात. अर्धांगवायूचे दोन मुख्य प्रकार आहेत. 1) Ischemic अर्धांगवायू 2) Hemorrhagic अर्धांगवायू 1) Ischemic अर्धांगवायू – पहिल्या प्रकारच्या […]

Posted inDiseases and Conditions

संधिवात कशामुळे होतो, त्याची लक्षणे व सांधेदुखीवरील उपचार

संधिवात – Osteoarthritis : बदललेली जीवनशैली यामुळे आजकाल संधिवाताचा त्रास हा अनेकजणांना आहे. संधिवातमध्ये सांध्यांच्या ठिकाणी सूज व अतिशय वेदना होत असते. त्यामुळेच या त्रासाला सांधेदुखी असेही म्हणतात. दोन हाडे एकत्र येऊन सांधे किंवा joints बनत असते. सांध्यांची हालचाल होताना तेथे असलेली दोन हाडे एकमेकांना घासू नयेत यासाठी तेथे कार्टीलेज नावाचा घटक असतो. या कार्टीलेजमुळे […]

Posted inDiseases and Conditions

किडनी खराब होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार – Kidney failure symptoms

किडनी खराब होणे – Kidney failure : किडनी आपल्या शरीरातील रक्त शुद्ध ठेवण्याचे काम करते. रक्तामध्ये असलेल्या विविध विषारी घटक किडनीतून फिल्टर होऊन लघवीवाटे शरीराबाहेर टाकले जाते. किडनी शरीरातील पाणी, सोडियम, कॅल्शियम आणि पोटॅशियमची मात्रा नियंत्रित ठेवते. किडनी शरीरातील आम्ल आणि क्षार नियंत्रित करते. मात्र जेव्हा कोणत्याही कारणाने किडनी आपले व्यवस्थित कार्य करत नाहीत, तेव्हा […]

Posted inDiseases and Conditions

निपाह व्हायरसची लक्षणे, कारणे आणि उपचार – Nipah virus

निपाह म्हणजे काय..? निपाह हा एक गंभीर असा संसर्गजन्य रोग आहे. याचा फैलाव ‘निपाह व्हायरस’मुळे होत असतो. निपाह रोगाच्या वायरसची लागण ही डुक्कर आणि वटवाघळांमुळे होत असते. निपाह व्हायरस हा बाधित रुग्णाच्या मेंदूवर थेट हल्ला करतो. निपाह रोगामध्ये ताप, थकवा, अंगदुखी, बेशुद्धावस्था अशी लक्षणे आढळतात. ‘निपाह’चा संसर्ग झाल्यास 4 ते 14 दिवस इन्क्युबेशन कालावधी असतो. […]

Posted inDiseases and Conditions

Gout: गाऊट आजाराची लक्षणे, कारणे व उपचार

युरिक ऍसिड किंवा गाऊट आजार : गाऊट हा एक प्रकारचा संधिवात (Gout arthritis) असून आपल्या रक्तात यूरिक ऍसिडचे प्रमाण अधिक वाढल्याने हा त्रास होत असतो. युरिक अॅसिड हे एक प्रकारचे अपायकारक घटक असून शरीरात Purines पासून तयार होते. सामान्यतः आपली किडनी ही शरीरातील या विषारी घटकास लघवीवाटे शरीरातून बाहेर टाकत असते. मात्र कोणत्याही कारणामुळे युरिक ऍसिडचे प्रमाण शरीरात […]

Posted inDiseases and Conditions

गजकर्ण नायटा : कारणे, लक्षणे व उपचार – Ringworm treatments

गजकर्ण नायटा – Ringworm : गजकर्ण हा विशिष्ट बुरशीमुळे होणारा त्वचारोग आहे. गजकर्णला नायटा किंवा खरूज या नावानेही ओळखले जाते. गजकर्ण, नायट्याचे मुख्य कारण म्हणजे अस्वच्छता हे आहे. पावसाळ्यातील ओलसर दमट हवामान ह्या रोगासाठी पोषक असते. नियमित अंघोळ न केल्याने, स्वच्छतेअभावी त्वचेवर गजकर्ण, नायट्याच्या बुरशीची वाढ होते. ट्रायकोफायटॉन रूब्रम, मायक्रोस्पोरम कॅनिस आणि एपिडर्मोफायटॉन फ्लॉकोसम या […]

Posted inHealth Article

संडास मध्ये रक्त पडणे याची कारणे व उपाय

संडास मधून रक्त पडणे : अनेक कारणांमुळे संडास मधून रक्त पडत असते. यातील काही कारणे ही सामन्य तर काही कारणे गंभीरही असू शकतात. जास्त दिवस संडास वाटे रक्त पडत असल्यास त्याचा परिणाम एकूणच आरोग्यावरही होऊन हिमोग्लोबिन कमी होणे, ऍनिमिया यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. संडासात रक्त पडणे याची कारणे : मुळव्याध, फिशर, बद्धकोष्ठता, पॉलिप्स, जंताचा […]

Posted inDiseases and Conditions

ऑटिझम (स्वमग्नता) आजाराची कारणे, लक्षणे आणि उपचार

स्वमग्नता (Autism) : आज लहान मुलांच्या विविध आजारात ऑटिझमचे प्रमाण वाढत आहे. ऑटिझम म्हणजे स्वमग्नता. स्वत:मध्येच गुंतून असणे असे या स्वमग्न मुलांची वर्तणूक असते. हा एक न्यूरो-डेवलपमेंटल डिसऑर्डर असून ऑटिझममुळे मुलांच्या मनोबौद्धिक विकासात अनेकदा अडथळे निर्माण होतात. या आजारास Autism spectrum disorder (ASD) या नावाने ओळखले जाते. ऑटिझम आजार असणाऱ्या किंवा स्वत:मध्येच मग्न असणाऱ्या मुलांची […]

Posted inDiseases and Conditions

यकृताचा सिरोसिस होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार – Liver cirrhosis

यकृताचा सिरोसिस – Liver Cirrhosis : लिव्हर सिरोसिस हा यकृताचा एक गंभीर असा आजार आहे. प्रामुख्याने दीर्घकालीन मद्यपानाचे व्यसन किंवा व्हायरल इन्फेक्शन्स यांमुळे ही समस्या होत असते. लिव्हर सिरोसिसमुळे यकृताच्या पेशींचे नुकसान होऊ लागते. त्यामुळे यकृताची कार्यक्षमता कमी होते. यकृत हे शरीरातील एक अतिमहत्वाचे असे अवयव आहे. पचनक्रिया, रक्तसंचारण क्रियेमध्ये यकृताची महत्वाची अशी भुमिका असते. […]

Posted inDiseases and Conditions

Epilepsy: अपस्मार कारणे, लक्षणे, उपचार आणि घरगुती उपाय

अपस्मार (Epilepsy) : आपण अनेकदा रस्त्यावर किंवा आजूबाजूला पाहतो की एखादी व्यक्ती अचानक बेशुद्ध होऊन खाली पडते आणि ती व्यक्ती स्वतःचे हात आणि पाय अगदी घट्ट आवळून ठेवते, शरीराच्या विचित्र हालचाली करते आणि त्याच्या तोंडातून फेस किंवा लाळ येऊ लागतो. या विकारास फिट येणे, फेफरे येणे, मिर्गी किंवा एपिलेप्सी (Epilepsy) असेही म्हणतात. अपस्मार हा चेतासंस्थेचा […]