ऑटिझम किंवा स्वमग्नता आजाराची मराठीत माहिती (Autism in Marathi)

Autism in marathi, Autism Symptoms, Causes, Tests, Treatment in marathi, Autism Treatment in Marathi.

ऑटिझम (स्वमग्नता) म्हणजे काय..?
Autism information in Marathi
आज लहान मुलांच्या विविध आजारात ऑटिझमचे प्रमाण वाढत आहे. ऑटिझम म्हणजे स्वमग्नता. स्वतःच्याच जगात हरवून जाणे. हा एक न्यूरोलॅाजिकल डिसऑर्डर असून ऑटिझममुळे मुलांच्या मनोबौद्धिक विकासात अनेकदा अडथळे निर्माण होतात. मुलींपेक्षा मुलांमध्ये ऑटिझमचे प्रमाण जास्त आहे. स्वमग्नता किंवा ओटीजम आजाराविषयी मराठीत माहिती, ओटीजम म्हणजे काय, ऑटिझमची कारणे, ओटीजमची लक्षणे, ऑटिझम उपचार जसे औषधे (medicine), ओटीजम थेरपी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी उपचार, स्टेम सेल थेरपी या सर्वांची मराठीमध्ये माहिती खाली दिली आहे.

ऑटिझमची काही लक्षणे :
Symptoms of autism in Marathi
• अशा मुलांना हाक मारल्यास त्या हाकेला प्रतिसाद न देणे. विचारलेली उत्तरे देत नाहीत, आपले बोलणे ऐकून न ऐकल्यासारखे करतात.
• ‎अशी मुले दुसऱ्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून बोलण्यास घाबरतात.
• ‎एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे. नेहमी तोच-तोच खेळ खेळायला त्यांना आवडते. दररोज ठरलेलीचं कामे करतात. त्यांना बदल केलेला आवडत नाही.
• ‎असंबद्ध बडबड करणे, पुन्हा पुन्हा तेच शब्द बोलत राहणे.
• ‎तीन वर्षे पुरे होऊनही अशी मुले अर्थपूर्ण शब्द बोलू शकत नाहीत.
• ‎अजिबात न बोलणे.
• ‎वारंवार सूचना द्याव्या लागणे.
• ‎संवादात अडथळे असणे.
• ‎अशी मुले एकटी राहण्यास प्राधान्य देतात, इतर लहान मुलांमध्ये मिसळून न खेळणे.
सामान्य मुलांच्या तुलनेने ह्या मुलांचा विकास खूप मंद असतो.

ऑटिझमची कारणे :
Autism causes in Marathi
ऑटिझम होण्यासाठी आनुवांशिकता आणि जेनेटिक फॅक्टर हे प्रमुख कारण असते.
याशिवाय 26 आठविडे होण्यापूर्वीचं बाळंतपण झाल्यास, गर्भावस्थेत झालेल्या गंभीर समस्या, गरोदर स्त्रीचे वय अधिक असल्यास, ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा, मेंदूतील संसर्ग अशी अनेक करणेही ऑटिझम होण्यासाठी सहाय्यक ठरू शकतात.

ऑटिझमवर उपचार :
Autism treatments in Marathi
ऑटिझमवर उपचार करण्याचे अनेक मार्ग आहेत. यामध्ये स्क्रीनिंग टूल, बिहेवियर प्रोग्राम, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच अॅण्ड लँग्वेज थेरपी आणि औषधे यांचा वापर करून या मुलांमध्ये आत्मविश्वासपूर्ण आणि स्वावलंबी जीवन जगण्यासाठी प्रेरित केले जाते.

– डॉ. सतीश उपळकर
CEO, हेल्थ मराठी नेटवर्क

© कॉपीराईट विशेष सूचना : वरील माहिती आपणास कॉपी पेस्ट करून अन्य ठिकाणी वापरता येणार नाही. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व सूचना वाचा.

What Is autism spectrum disorder in Marathi meaning?


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.