निपाह रोग कारणे, लक्षणे, निदान, उपचार मराठी माहिती (Nipah in Marathi information)

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

Nipah in marathi, nipah rog in Marathi, Nipah Virus information in marathi.

निपाह म्हणजे काय, निपाह वायरस मराठी माहिती :

निपाह हा एक गंभीर असा संसर्गजन्य रोग आहे. याचा फैलाव ‘निपाह व्हायरस’मुळे होत असतो. निपाह रोगाच्या वायरसची लागण ही डुक्कर आणि वटवाघळांमुळे होत असते. निपाह व्हायरस हा मेंदूवर थेट हल्ला करतो.

निपाह रोगामध्ये ताप, थकवा, अंगदुखी, बेशुद्धावस्था अशी लक्षणे आढळतात. ‘निपाह’चा संसर्ग झाल्यास 4 ते 14 दिवस इन्क्युबेशन कालावधी असतो. या रोगावर कोणतेही ठोस अशी औषधे किंवा लस उपलब्ध नाहीत. त्यामुळे निपाह रोग होऊच नये यासाठी योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते.

निपाह रोगाची कारणे :

Nipah virus causes in Marathi
निपाह विषाणूची लागण ही डुक्कर आणि वटवाघळांमुळे होते. प्रामुख्याने फळे खाणाऱ्या वटवाघळांमुळे हा विषाणू मानवी शरीरात प्रवेश करतो. निपाह रोगाचे व्हायरस हे वटवाघळांच्या लाळेत आसतात. वटवाघळांनी खाऊन उष्टी केलेली खजूर, आंबा यासारखी फळे मनुष्य किंवा अन्य प्राण्यांच्या खाण्यात आल्यास हा रोग पसरत असतो. त्यानंतर अशा नीपाह विषाणू बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास त्याची लागण इतर अन्य व्यक्तींनाही होते.

निपाह ची लक्षणे :

Nipah symptoms in Marathi
निपाह रोगाची लागण झाल्यास सुरुवातीला ताप येणे, डोकेदुखी, झोप न येणे, अंगदुखी, अंधूक दिसणे, उलट्या होणे अशी लक्षणे असतात. त्यानंतर अतिथकवा जाणवणे, चक्कर येणे, मेंदूला सूज येणे, शुद्ध हरपणे अशी लक्षणे असतात.

यासारखी लक्षणे दिसून येत असल्यास तात्काळ उपचार न घेतल्यास पुढील 24-48 तासामध्ये संबंधित व्यक्ती कोमामध्ये जाण्याची शक्यता असते. याशिवाय काही रुग्णांमध्ये श्वसनसंस्थेचे संक्रमण होऊन त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

रोगाची गंभीरता :

या रोगावर कोणतेही ठोस अशी औषधे किंवा लसही उपलब्ध नाही. त्यामुळे ताप मेंदूपर्यंत पोहोचल्यास रुग्ण कोम्यात जाऊन दगावतो. संसर्ग झाल्याचे ध्यानात येताच रुग्णाला अतिदक्षता विभागात ठेवले जाते.

निपाह रोग होऊ नये म्हणून ह्या करा उपाययोजना :

Nipah rog prevention tips in Marathi
निपाह रोगावर कोणतेही औषध उपलब्ध नाही त्यामुळे या रोगापासून दूर राहण्यासाठी प्रत्येकाने दक्षता घेतली पाहिजे.
• पक्षी किंवा प्राण्यांनी अर्धवट खाऊन टाकलेली फळे खाणे टाळावे.
• झाडावरून खाली पडलेली फळे खाणे टाळावे.
• ‎संसर्ग झालेले डुक्कर, वटवाघुळ किंवा निपाहचा संसर्ग झालेल्या माणसांच्या थेट संपर्कात येणे टाळावे.
• ‎कच्चे किंवा अर्धवट शिजलेले मांस खाणे टाळावे.
• पाणी उकळून प्यावे, विहिरीवर जाळी बसवून वटवाघुळे किंवा इतर पक्ष्यांना रोखावे.
• ‎आजारी व्यक्तींना भेटायला जाणे शक्यतो टाळावे किंवा अशावेळी मास्क, ग्लोव्ह्स यांचा वापर करावा.
• ‎तुम्हांला इंफेक्टेड भागात फिरताना अस्वस्थ वाटत असल्यास किंवा ताप, अंगदुखी, चक्कर येणे यासारखी लक्षणे दिसून आल्यास तात्काळ डॉक्टरांकडून निदान व उपचार करून घ्या.
• ‎वैद्यकीय मदत करणार्‍या व्यक्तींनीही रूग्णांवर उपचार करताना पुरेशी काळजी घेणं आवश्यक आहे. सोबतच ग्लोव्ह्स, मास्क घालून रूग्णांची तपासणी करावी. विशेषतः डॉक्टर, नर्स व रुग्णांची सेवा करणाऱ्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी.

Nipah virus in Marathi information, Nipah treatment in marathi, How to prevents from Nipah virus.