Posted inDigestive System

छातीत जळजळ होण्याची कारणे व घरगुती उपाय

छातीत जळजळणे – Heartburn : आपल्यापैकी अनेकांना छातीत जळजळ होण्याची समस्या असते. प्रामुख्याने पित्त वाढवणाऱ्या आहारामुळे हा त्रास होत असतो. त्यामुळे आपल्या जीवनशैलीत थोडा बदल केल्यास व योग्य आहार, पुरेशी झोप घेतल्यास छातीत जळजळण्याची समस्या निश्चितच दूर होईल. जेव्हा पोटात आम्ल हे अन्ननलिकेत ढकलले जाते, त्यावेळी छातीत जळजळ होऊ लागते. यावेळी छातीत जळजळ होण्याबरोबरच आंबट […]

Posted inDiseases and Conditions

Vomiting Blood: रक्ताची उलटी कशामुळे होते ते जाणून घ्या..

रक्ताची उलटी होणे (Vomiting Blood) : रक्ताची उलटी होण्याची कारणे अनेक असतात. यातील काही कारणे ही अगदी सामान्य तर काही कारणे गंभीरही असू शकतात. प्रामुख्याने पोटातील दुखापत, आजारपण किंवा काही विशिष्ट औषधाच्या वापरामुळे रक्ताची उलटी होऊ शकते. ह्यामध्ये गडद लालसर ते काळपट रंगाचे रक्त पडू शकते. रक्ताची उलटी होणे या त्रासाला वैद्यकीय भाषेत हेमेटिमिसिस असे म्हणतात. […]

Posted inDiseases and Conditions

शौचावाटे रक्त पडण्याची कारणे, लक्षणे व उपचार : Rectal Bleeding

अनेक कारणांमुळे शौचातून रक्त पडत असते. यातील काही कारणे ही सामन्य तर काही कारणे गंभीरही असू शकतात. जास्त दिवस शौचामधून रक्त पडत असल्यास त्याचा परिणाम एकूणच आरोग्यावरही होऊन हिमोग्लोबिन कमी होणे, ऍनिमिया यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

Posted inDiseases and Conditions

उचकी लागण्याची कारणे व त्यावरील उपाय

उचकी लागणे – Hiccup : अचानक कधीही उचकी येत असते. उचकी लागल्यावर अस्वस्थता होते. कधीकधी सारख्या उचक्या येत असतात अशावेळी त्यांना रोखणेही अवघड असते. उचक्या का व कशामुळे लागतात..? आपल्या फुफ्फुसाच्या खाली असणारी डायफ्राम नावाची मांसपेशी (मसल्स) अचानक अकुंचन पावल्याने सारख्या उचक्या येऊ लागतात. उचकी लागण्याची कारणे – उचकी लागण्यास अनेक कारणे जबाबदार असतात. यामध्ये […]

Posted inDiseases and Conditions

सारखे ढेकर येण्याची कारणे व घरगुती उपाय : Excessive burping

सतत ढेकर येणे : ढेकर येण्याची अनेक कारणे असू शकतात. जेवल्यानंतर दोन ते तीन वेळा ढेकर येणे ही अगदी समान्य बाब आहे. मात्र सारखे ढेकर येत असेल तर ते काळजीचे कारण ठरू शकते. त्यामुळे सतत ढेकर येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नये. ढेकर येणे याला English मध्ये burping किंवा belching असे म्हणतात. प्रामुख्याने पचनास […]

Posted inDiseases and Conditions

प्रवासात उलटी होत असल्यास हे करा घरगुती उपाय

प्रवासात उलटी होणे (Motion sickness) : आपल्यापैकी अनेकांना प्रवासादरम्यान मळमळ किंवा उलट्या होण्याची समस्या होते. लहान मुले आणि गरोदर स्त्रियांना हा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. या त्रासामुळे अनेकजण प्रवास करणेही टाळतात. या त्रासाला मोशन सिकनेस, गाडी लागणे अशा नावानेही ओळखले जाते. गाडी लागणे यावर हे करा घरगुती उपाय : आले (अद्रक) – प्रवासात मळमळ […]

Posted inDiseases and Conditions

पोटात जंत होण्याची कारणे, लक्षणे आणि जंतावरील उपाय

पोटात जंत होणे – Intestinal Worms : जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार भारतात 1 ते 14 वर्षे वयोगटातील किमान 241 दशलक्ष (68 टक्के) बालकांना दरवर्षी जंत व कृमींची लागण होत असते. अस्वच्छता, माती, दूषित अन्न आणि दूषित पाण्यातून जंत-कृमींचा प्रसार होण्याचे प्रमाण जास्त आहे. लहान मुलांप्रमाणे प्रौढ व्यक्तींमध्येही कृमीचा त्रास होत असतो. जंत हे आतड्यात राहून […]

Posted inDiseases and Conditions

अपचन होण्याची कारणे व घरगुती उपाय – Indigestion

अपचन होणे – Indigestion : अपचन होणे म्हणजे घेतलेला आहार नीट न पचणे. पचनसंस्थेतील पाचक स्त्राव (Digestive enzymes) यांमुळे अन्नाचे पचन होत असते. मात्र काही कारणामुळे पचनसंस्था बिघडल्याने हे पाचक स्त्राव कमी झाल्याने घेतलेले अन्न योग्यरीत्या पचत नाही तेंव्हा अपचन होते. चुकीचा आहार, अवेळी जेवणे, बैठी जीवनशैली यांमुळे अपचनाची समस्या अनेकांना होत असते. पचन म्हणजे […]

Posted inHealth Tips

पित्त झाल्यावर हे घरगुती उपाय करावे

पित्ताचा त्रास होणे – चमचमीत मसालेदार आहार, अयोग्य जीवनशैली, मानसिक ताण, अपुरी झोप यांमुळे आज अनेक आरोग्याच्या तक्रारीबरोबरच पित्ताचा त्रासही जास्त प्रमाणात होत असतो. पित्तामुळे ऍसिडिटी, डोकेदुखी, अंगावर पित्ताच्या गांधी उटणे (शीतपित्त) अशा अनेक तक्रारी होत असतात. पित्त वाढण्याची कारणे – पित्त प्रामुख्याने चुकीचा आहार घेतल्याने वाढत असते. वारंवार तिखट, मसालेदार, आंबट, खारट पदार्थ खाण्यामुळे, […]

Posted inDiseases and Conditions

ऍसिडिटी होण्याची कारणे, लक्षणे व घरगुती उपाय – Acidity

ऍसिडिटी होणे – Acidity : अयोग्य आहार, अनियमित जीवनशैली आणि तणावामुळे ऍसिडिटीचा त्रास अनेकांना होत असतो. आपल्या पोटामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल कमी-अधिक प्रमाणात सतत तयार होत असते. या आम्लामुळे अन्न पचायला मदत करते. ऍसिडिटीची लक्षणे : पोटामध्ये हायड्रोक्लोरिक आम्लाचे प्रमाण अधिक वाढल्यास ऍसिडिटीची समस्या निर्माण होते. ऍसिडिटी झाल्यास छातीमध्ये, पोटामध्ये किंवा घशात जळजळणे, आंबट ढेकर येणे, […]