अळीव (Halim seeds) :
अळीवमध्ये अनेक पोषकघटक असतात. अळीवला अहळीव किंवा हळीव या नावानेही ओळखले जाते. अळीवला english मध्ये Garden cress seeds असे म्हणतात. अळीवपासून केले जाणारे लाडू, अळीवाची खीर वैगरे पदार्थ खुपचं रुचकर आणि पौष्टिक असतात.
अळीवमध्ये भरपूर प्रमाणात लोह, फॉलेट, व्हिटॅमिन-C, व्हिटॅमिन-A, व्हिटॅमिन-E, फायबर आणि प्रोटीनसह अनेक पोषकघटक असतात.
अळीव खाण्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन आणि रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होते. अळीवमधील फायबर्समुळे बद्धकोष्ठता, अपचन असे त्रास कमी होतात. अळीव खाण्यामुळे वजन आटोक्यात ठेवण्यासाठी मदत होते. अनियमित मासिक पाळीची समस्या यामुळे दुर होते. बाळंतिणीला दूध येण्यासाठी अळीव उपयुक्त ठरते. यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
अळीव खाण्याचे फायदे :
1) अळीव खाण्यामुळे हिमोग्लोबिन वाढते –
अळीवमध्ये मुबलक प्रमाणात लोह (आयर्न) असते. त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन आणि रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होते. हिमोग्लोबिन कमी असल्यास किंवा ऍनिमिया सारखे आजार असल्यास चमचाभर अहळीवचा दररोजच्या आहारात जरूर समावेश करावा.
2) अळीव खाणे हे दमा किंवा अस्थमावर उपयुक्त असते –
फुफ्फुसांच्या कार्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आवश्यक असणारे कार्यकारी घटक अळीवमध्ये असतात. त्यामुळे दम्याचा त्रास कमी होण्यास मदत होते. याशिवाय अळीव खाल्यामुळे खोकला आणि घसादुखी कमी होते.
3) अळीव खाण्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते –
अळीवमधील फायबर्समुळे नियमित पोट साफ होण्यास मदत होते. बद्धकोष्ठता, अपचन यासारखा त्रास असल्यास अळीव खाणे उपयुक्त ठरते.
4) अळीव खाण्यामुळे वजन आटोक्यात राहण्यास मदत होते –
दररोज सकाळी उपाशीपोटी चमचाभर हाळीव कोमट पाण्यातून खाल्याने वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.
5) अळीवमुळे मासिक पाळीच्या तक्रारी दूर होतात –
अनियमित मासिक पाळी होत असल्यास अळीव खाणे उपयुक्त असते. हळीव मध्ये असणारे phytochemicals हे इस्ट्रोजेन हार्मोन्ससाठी फायदेशीर ठरतात त्यामुळे मासिक पाळी नियमित होते.
6) अळीव हे बाळंतिणीला उपयुक्त असते –
अळीवमध्ये असणारी प्रोटीन, लोह यासारखी पोषकतत्वे बाळंतिणीला पुरेसे दूध येण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळेच आपल्याकडे स्तनपान करणाऱ्या बाळंतिणीला अळीवाचे लाडू, अळीवाची खीर खाण्यास दिली जाते. बाळंतिणीचा आहार कसा असावा याची माहिती जाणून घ्या.
7) अळीव खाण्यामुळे स्मरणशक्ती वाढते –
हळीवमध्ये असणाऱ्या linolenic acids आणि arachidonic fatty acids या पोषकघटकांमुळे स्मरणशक्ती वाढण्यास खूप चांगली मदत होते.
8) अळीव हे कँसरला दूर ठेवण्यास मदत करते –
अळीव हे त्याच्या अँटी-कँसर गुणांमुळे आणि त्यात असणाऱ्या उपयुक्त अँटी-ऑक्सिडंटमुळे कँसर होण्यापासून रक्षण होण्यास मदत होते.
9) अळीव खाणे हे त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त असते –
अळीव बारीक करून त्यात मध घालून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट उन्हामुळे काळवंडलेली त्वचा, कोरडी त्वचा यावर लावणे उपयुक्त असते. तसेच यातील व्हिटॅमिन-E, प्रोटीन, लोह आणि मॅग्नेशियम या घटकांमुळे केस घनदाट, मजबूत होण्यास मदत होते.
अळीव खाण्याचे नुकसान आणि अळीव कोणी खाऊ नये..?
अळीवमध्ये अनेक उपयुक्त पोषकघटक असतात मात्र ते योग्य प्रमाणात खाणे आवश्यक असते. जास्त प्रमाणात अळीव खाण्यामुळे शरीरासाठी काही त्रास होऊ शकतो.
- लघवीसंबधी तक्रारी असणाऱ्या रुग्णांनी अहाळीव खाणे टाळावे.
- अळीव खाणे बाळंतिणीसाठी उपयुक्त असते मात्र अळीव गरोदरपणात खाऊ नये. कारण यातील abortifacient गुणांमुळे गर्भपात होण्याचा धोका असतो.
- अधिक प्रमाणात अळीव खाण्यामुळे शरीरात आयोडीनची कमतरता होऊन गॉयटरसंबंधित त्रास होऊ शकतो.
अळीव पोषकघटक :
100 ग्रॅम अळीवमध्ये पुढीलप्रमाणे पोषकतत्वे (nutritional contents) असतात.
ऊर्जा – 32 कॅलरीज
फॅट – 0.7 ग्रॅम
कोलेस्टेरॉल – 0 मिलीग्राम
कर्बोदके – 5.5 ग्रॅम
फायबर – 1.1 ग्रॅम
साखर – 4.4 ग्रॅम
प्रथिने (प्रोटीन) – 2.6 ग्रॅम
सोडियम – 14 मिलीग्राम
व्हिटॅमिन ए – 138%
व्हिटॅमिन सी – 115%
कॅल्शियम – 8%
लोह (आयर्न) – 7%
हे सुद्धा वाचा – जवस खाण्याचे फायदे जाणून घ्या.
Read Marathi language article about Aliv Seeds or Halim Health Benefits, side effects and Nutritional contents. Last Medically Reviewed on February 23, 2024 By Dr. Satish Upalkar.