कपाळावरील पुरळ –
काहीवेळा आपल्या कपाळावर पुरळ येत असतात. प्रामुख्याने लालसर रंगाचे व लहानमोठ्या आकाराचे पुरळ कपाळावर येऊ शकतात. याची अनेक कारणे असतात.
कपाळावर आलेले पुरळ हे लालसर रंगाचे व लहानमोठ्या आकाराचे प्रामुख्याने असतात. तसेच काहीवेळा त्या पुरळ आलेल्या ठिकाणी खाज व जळजळ होणे, सूज येणे, फोड येणे अशी लक्षणे यामध्ये दिसून येऊ शकतात.
कपाळावर पुरळ येण्याची कारणे –
इन्फेक्शनमुळे प्रामुख्याने कपाळावर पुरळ येतात. त्याची इतर कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
- एलर्जी,
- मुरूम (पिंपल्स),
- कांजिण्या (Chickenpox),
- गोवर (Measles),
- इम्पेटिगो इन्फेक्शनमुळे (Impetigo),
- केसात कोंडा झाल्यामुळे,
- Folliculitis मुळे,
- काही औषधांच्या परिणामामुळे,
- सोरायसिस, नागीण, गजकर्ण नायटा, घामोळ्या, Rosacea या त्वचा विकारामुळे कपाळावर पुरळ येऊ शकतात.
डॉक्टरांकडे कधी जाणे आवश्यक आहे ..?
कपाळावर आलेले पुरळ अधिक पसरत असल्यास, त्याठिकाणी सूज येणे, अधिक वेदना होणे, पुरळमधून पू येणे अशी लक्षणे दिसून आल्यास डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे. तसेच कपाळावर पुरळ येण्याबरोबरच ताप आला असल्यास तरीही डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे.
कपाळावर पुरळ येणे यावर उपचार –
नेमके कशामुळे कपाळावर पुरळ आलेले आहेत त्यानुसार यावरील उपचार ठरतात. इन्फेक्शनमुळे कपाळावर पुरळ आले असल्यास अँटीबायोटिक्स किंवा अँटीफंगल क्रीम किंवा औषधे दिली जातील.
सोरायसिस, नागीण, गजकर्ण नायटा, घामोळ्या, Rosacea या त्वचा विकारामुळे जर कपाळावर पुरळ आले असल्यास त्या त्वचा विकारांवर उपचार केले जातात.
हे सुध्दा वाचा – कपाळावरील काळे डाग घालवण्याचे उपाय जाणून घ्या.
Read Marathi language article about Rashes on Forehead Symptoms, Causes, and Treatment. Last Medically Reviewed on February 21, 2024 By Dr. Satish Upalkar.