Dr Satish Upalkar’s article about Herpes zoster diet plan in Marathi.

नागीण आजार – Shingles :

नागीण आजाराला Shingles किंवा herpes zoster ह्या नावाने ओळखले जाते. नागीण रोगात व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे त्वचेवर वेदनादायक असे पुरळ येत असतात. नागीण आजारासाठी varicella zoster (VZV) हे व्हायरस कारणीभूत असतात. तसेच हाचं व्हायरस हा कांजिण्या (chickenpox) ह्या आजारासाठीही कारणीभूत असतो. येथे नागीण रोग झाल्यावर काय आहार घ्यावा, काय खावे व काय खाऊ नये याची माहिती डॉ सतीश उपळकर यांनी येथे दिली आहे.

नागीण रोग आणि आहार पथ्य याची माहिती - लेखक डॉ सतीश उपळकर

नागीण रोगाची कारणे :

आपणास कांजिण्या (chickenpox) हा आजार होऊन गेलेला असल्यास त्याचा varicella zoster व्हायरस हा छुप्या स्वरूपात शरीरात मज्जातंतूमध्ये राहतो. आणि काही वर्षांनी जेंव्हा आपली इम्युनिटी (रोगप्रतिकारक शक्ती) कमी होते तेंव्हा, त्वचेवर वेदनायुक्त पुरळ येऊन नागीण आजार होत असतो. शरीराच्या कोणत्याही भागावर नागिणीचे पुरळ येऊ शकतात.

नागीण आजाराची लक्षणे :

नागीणमध्ये सुरवातीला त्वचेवर असे पुरळ येतात. त्यानंतर काही दिवसांनी त्या पुरळामध्ये पाणी धरते व त्याठिकाणी वेदना होऊ लागते. याशिवाय काही जणांना ताप येणे, उजेड सहन न होणे, थकवा येणे असे त्रासही होऊ शकतात. साधारण दोन ते सहा आठवड्यापर्यंत नागीणमुळे त्रास होऊ शकतो. यावर उपचारासाठी antiviral औषधांचा उपयोग केला जातो.

नागीण रोग आणि आहार पथ्य – Nagin disease diet in Marathi :

नागीण आजारामध्ये आहारात व्हिटॅमिन A, B-12, C आणि E युक्त पदार्थ तसेच झिंक, अमीनो ऍसिड, लाइझिन (Lysine) युक्त आहार पदार्थ समाविष्ट करावेत.

नागीण रोग झाल्यावर काय खावे..?
नागीण आजार झाल्यास पचनास हलका असणारा आहार घ्यावा. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, नारंगी आणि पिवळी फळे, टोमॅटो, पालक, धान्ये व कडधान्ये, दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मांस यांचा जरूर समावेश करावा. कारण या सर्व पदार्थात व्हिटॅमिन्स, झिंक, लाइझिन असे पोषक घटक असतात.

नागीण आजार झाल्यास काय खाऊ नये..?
नागीण आजारात साखरेचे गोड पदार्थ, मिठाई, चॉकलेट, आईस क्रीम, पांढरा ब्रेड, खारट पदार्थ, फास्टफूड, चरबीयुक्त पदार्थ खाऊ नये. तसेच कोल्ड्रिंक्स, दारू पिणे टाळावे. आयुर्वेदात विसर्प म्हणजेचं नागीणीच्या आजारात पित्त वाढवणारा आहार खाणे टाळावे असे सांगितले आहे. त्यानुसार काही दिवस पित्त वाढवणारे तेलकट व मसालेदार पदार्थ खाणे शक्यतो टाळावे.

हे सुद्धा वाचा – नागीण आजाराविषयी माहिती व उपचार जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Written by - Dr. Satish Upalkar
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
3 Sources

In this article information about herpes zoster disease diet plan tips in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar.

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...