Dr Satish Upalkar’s article about Liver inflammation in Marathi.
लिव्हर ला सूज येणे –
लिव्हरमध्ये विषाणूचे इन्फेक्शन झाल्याने लिव्हरला सूज येत असते. या आजाराला Hepatitis असेही म्हणतात. यामध्ये व्हायरल इंफेक्शनमुळे लिव्हर संक्रमित होऊन त्याला सुज येते. लिव्हरला सूज आल्याने त्याच्या कार्यावर परिणाम होतो त्यामुळे कावीळ सारखी लक्षणे यावेळी दिसून येतात. लिव्हर ला सूज का येते, त्याची कारणे, लक्षणे आणि उपचार याविषयी माहिती डॉ सतीश उपळकर यांनी येथे दिली आहे.
लिव्हर वर सूज का येते ..?
व्हायरल इन्फेक्शन झाल्याने लिव्हरला सूज येते. हिपॅटायटीस व्हायरस हे 5 प्रकारचे असतात. हिपॅटायटीस A, B, C, D आणि E असे पाच प्रकारचे हिपॅटायटीस व्हायरस असतात. यापैकी कोणत्याही व्हायरसचे इन्फेक्शन झाल्यास लिव्हर वर सूज येते. तसेच दारू अधिक पिण्यामुळे आणि वेदनाशामक औषधांच्या दुष्परिणामामुळे सुद्धा लिव्हर वर सूज येते.
लिव्हर ला सूज येण्याची कारणे –
- दूषित अन्न, दूषित पाण्यातून हिपॅटायटीस A आणि E अशा व्हायरसची लागण झाल्याने लिव्हर ला सूज येते.
- Hepatitis B व्हायरस बाधीत झालेल्या रुगणाच्या रक्त, थुंकी, लाळ, मल, मुत्र, वीर्य यांद्वारे दूषित सुया, लैंगिक संबंध याद्वारे हिपॅटायटीस B चा संसर्ग झाल्याने लिव्हर ला सूज येते.
- हिपॅटायटीस C virus बाधीत झालेल्या रुगणाच्या रक्तदानातून किंवा अवयव प्रत्यारोपन, दूषित सुया यांमुळे हिपॅटायटीस C चा संसर्ग झाल्याने लिव्हर ला सूज येते.
- Hepatitis B ची लागण झालेल्यांना झालेल्या हिपॅटायटीस D चा संसर्ग झाल्याने लिव्हर ला सूज येते.
- दारूच्या अधिक सेवनामुळे अल्कोहोलिक हिपॅटायटीस होऊन लिव्हर ला सूज येते.
- वेदनाशामक औषधांच्या दुष्परिणाम लिव्हर वर झाल्याने त्यामुळे लिव्हर ला सूज येते.
लिव्हरला सूज येणे याची लक्षणे –
लिव्हरला सूज आल्यास खालील लक्षणे दिसून येतात.
- कावीळ होणे,
- त्वचा, डोळे, नखे पिवळी होतात,
- लघवीला गडद होणे,
- शौचाला फिकट पांढरट होणे,
- ताप येणे,
- शरीरावर खाज सुटणे,
- भुक मंदावणे,
- मळमळणे व उलटी होणे,
- अतिसार होणे,
- उजव्या कुशीत दुखणे,
- अशक्तपणा जाणवणे, चक्कर येणे, अंगदुखी यासारखी लक्षणे लिव्हर वर सूज आल्यास जाणवतात.
लिव्हर सूज आणि निदान तपासणी –
पेशंट हिस्ट्री, रुग्णामध्ये असलेली लक्षणे आणि शारीरीक तपासणीद्वारे डॉक्टर याचे निदान करतील. तसेच लिव्हरला सूज कशामुळे आली आहे याचे नेमके निदान करण्यासाठी खालील वैद्यकिय चाचण्यांचा कराव्या लागू शकतात.
- रक्त व लघवीची चाचणी,
- लीवर फंक्शन टेस्ट,
- लिव्हर बायोप्सी,
- लिव्हर एक्स-रे परिक्षण,
- अल्ट्रासाउंड,
- Autoimmune ब्लड मार्कर इत्यादी चाचण्या याच्या निदानासाठी केल्या जातील.
लिव्हर सूज आणि त्याचे दुष्परीणाम –
लिव्हर सूज येणे ही दुर्लक्ष करण्यासारखी समस्या नसते. यावर वेळीच योग्य उपचार करणे गरजेचे आहे. वेळीच योग्य उपचार न केल्यास लिव्हर च्या आरोग्यावर परिणाम होऊन खालील गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.
- यकृताचे विविध आजार उद्भवतात,
- लिव्हर सिरोसिस हा विकार होणे,
- लिव्हर कॅन्सर होणे,
- लिव्हर फेल्युअर (यकृत निकामी होणे),
- किडन्या निकामी होणे,
- हिपॅटायटीसमुळे रुग्ण दगावण्याचीसुद्धा अधिक शक्यता असते. भारतामध्ये हिपॅटायटीसमुळे दरवर्षी सुमारे 25 लाख रुग्ण मरण पावतात.
त्यामुळे लिव्हरला सूज आल्यास त्यावर वेळीच योग्य उपचार करणे गरजेचे आहे.
लिव्हर ला सूज येणे यावरील उपचार –
कोणत्या कारणांमुळे लिव्हरला सूज आली आहे त्यानुसार उपचार ठरतात. उपचारात Antiviral औषधांचा समावेश केला जातो. या त्रासात रुग्णाने विश्रांती घेणे आवश्यक असते. तसेच मद्यपान, धूम्रपान यासारखी व्यसने पूर्णपणे बंद करणे आवश्यक असते.
यकृताला सूज येऊ नये यासाठी घ्यायची काळजी –
- स्वच्छतेच्या चांगल्या सवयी लावून घ्याव्यात.
- बाहेरुन आल्यावर, शौचास-लघवीस जाऊन आल्यावर हात, पाय, चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावेत.
- उघड्यावरील दुषित पदार्थ, कच्चे मांस-मासे खाऊ नयेत.
- दुषित पाणी पिणे टाळावेत. पाणी गरम करुन, निर्जंतुक करुन प्यावे. पावसाळ्याच्या दिवसात पाण्याविषयी विशेष खबरदारी घ्यावी.
- दुसऱ्याच्या स्वच्छता साधनांचा वापर करु नये. उदा. दुसऱ्याचा साबण, कपडे, टुथब्रश, रेझर्स इ. वस्तु वापरु नये.
- मद्यपान, धुम्रपान करणे टाळावे.
- असुरक्षीत लैंगिक संबंध टाळावेत.
- रक्त घेताना किंवा अवयव प्रत्यारोपनावेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी विशेष दक्ष रहावे. रक्त, अवयव हे हिपॅटायटीस बाधीत नसल्याची खात्री करुन घ्यावी.
- वापरलेल्या सलाइन्स, इंजेक्शन. सुया यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. वैद्यकीय कचऱ्यापासून दुर रहावे. हिपॅटायटीस रुग्णांची सुश्रृषा करणाऱयांनी विशेष दक्षता घ्यावी.
- हिपॅटायटीसची लस घ्यावी. लसीकरणामुळे हिपॅटायटीस A आणि B होण्यापासून रक्षण करता येते.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
हे सुध्दा वाचा..
3 SourcesInformation about Liver inflammation causes, symptoms, types, prevention & treatments in Marathi language. Article written by Dr Satish Upalkar.