पपई बिया ह्या आरोग्यासाठी फायदेशीर असून त्यामध्ये विविध पोषकतत्वे असतात. मी डॉ. सतीश उपळकर आहारतज्ञ असून या लेखात, तुम्हाला पपई बिया खाण्यामुळे आरोग्यासाठी कोणते फायदे होतात व त्या बिया कशा खाव्यात, कोणती काळजी घ्यावी याची माहिती मी देत आहे.
पपई बिया खाण्याचे फायदे –
यामुळे पचनक्रिया सुधारते, रोगप्रतिकार शक्ती वाढते, जंत कृमी पडतात, वजन आटोक्यात राहते तसेच रक्तातील कोलेस्टेरॉल पण कमी करते. असे अनेक फायदे पपईच्या बिया खाण्यामुळे होतात.
पचनक्रिया सुधारते –
पपई बियामध्ये papain नावाचे एंजाइम असते. ज्यामुळे प्रथिने पचण्यास मदत होते.
रोगप्रतिकारशक्ती वाढते –
पपई बियामध्ये अँटिऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन ए असते. ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत होते.
पोटातील कृमी कमी करते –
पपई बियामध्ये अँटि-पॅरासिटिक आणि अँटिफंगल गुणधर्म असतात. ज्यामुळे पोटातील जंतकृमी कमी होण्यास मदत होते.
वजन कमी करण्यास मदत होते –
पपई बिया फायबरने समृद्ध असतात आणि त्यामुळे लवकर पोट भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे भूक कमी लागून वजन कमी होण्यास मदत होते.
कोलेस्टेरॉल कमी करते –
पपई बिया रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात. यामुळे हृद्यविकाराचा धोका कमी होतो.
पपई बिया कोणी खाऊ नये?
गरोदर महिला आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी पपई बिया खाणे टाळावे. तसेच 5 वर्षापेक्षा लहान मुलांनी देखील पपई बिया खाऊ नयेत.
पपई बिया कशा खाव्यात?
पपई बिया धुवून त्या तशाच खाऊ शकता किंवा स्मूदी, सलाडमध्ये घालून त्या खाऊ शकता.
दिवसाला 1 ते 2 चमचे पेक्षा जास्त प्रमाणात पपई बिया खाऊ नयेत.
Read a Marathi language article about health benefits of Papaya seeds. Last Medically Reviewed By Dr. Satish Upalkar on April 6, 2024.