Dr Satish Upalkar’s article about How to suppress or decrease appetite in Marathi.

भूक कमी करण्यासाठी घरगुती उपाय याविषयी माहिती Dr Satish Upalkar यांनी येथे दिली आहे.

भूक कमी करणे –

काही लोक त्यांच्या भूकेवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत, आणि यामुळे ते वारंवार काहीनाकाही खातचं असतात. त्यामुळे एका दिवसात आवश्यकतेपेक्षा जास्त कॅलरीज त्यांच्या शरीरात जातात. परिणामी वजन वाढून लठ्ठपणाची समस्या होत असते. अशावेळी भूक कशी कमी करायची असा प्रश्न अनेकांना पडतो. यासाठी भूक कमी करण्यासाठी काही सोपे उपाय डॉ सतीश उपाळकर यांनी येथे दिले आहेत.

आपल्याला जगण्यासाठी अन्नाची गरज असते. आपण घेतलेल्या अन्नातूनचं शरीराला ऊर्जा मिळते. आणि त्या ऊर्जेवर शरीरक्रिया चालत असतात. त्यामुळे भूक अधिक लागते म्हणून उपाशी राहणे असले प्रकार करू नयेत. तसेच भूक कमी करण्यासाठी औषधेही घेऊ नयेत. कारण त्या औषधांचा दीर्घकालीन परिणाम एकूणच आरोग्यावर होत असतो. यासाठी येथे नैसर्गिक घरगुती उपाय सांगितले आहेत. ज्यायोगे अधिकवेळ पोट भरल्यासारखे वाटते व भुक कमी लागते.

भूक कमी करण्याचे घरगुती उपाय –

1) भूक कमी करण्यासाठी प्रोटीन्सयुक्त आहार घ्या ..

प्रोटीन्सयुक्त आहार घेतल्यामुळे पोट अधिककाळ भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वारंवार भूक लागत नाही. यासाठी आहारात अंडी, मांस, चिकन, मासे, दही, पनीर, बीन्स आणि मटार, सोया प्रोडक्ट आणि यांचा समावेश करावा.

2) भूक कमी करण्यासाठी हेल्दी फॅट्सचा समावेश करा ..

ओमेगा-3 फॅटी ऍसिडस् असे हेल्दी फॅट्स आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे असतात. यामुळे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होऊन हृदयविकाराचा धोका कमी होत असतो. शेंगदाणे, काजू, बदाम, अक्रोड यासारख्या सुख्यामेव्यात तसेच जवस, तीळ, अॅव्होकॅडो, ऑलिव्ह ऑईल, मासे यामध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिडस् मुबलक प्रमाणात असतात. भूक कमी होण्यासाठी आहारात हेल्दी फॅट्स असणाऱ्या वरील पदार्थांचा जरूर समावेश करा.

3) भूक कमी होण्यासाठी फायबर्सयुक्त आहार घ्या ..

फायबर असणारे पदार्थ म्हणजे तंतुमय पदार्थ. इतर अन्नपदार्थांप्रमाणे, फायबर हे लवकर पचत नाहीत. त्यामुळे फायबर्स हे जास्त काळ शरीरात राहते आणि पचन मंदावते. ज्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते व भुक सारखी लागत नाही. हिरव्या पालेभाज्या, भाज्यांचे सूप, शेंगा, फळभाज्या, विविध फळे, कडधान्ये, धान्ये, मेथी बिया, ओटब्रॅन, बार्ली यांचा आहारात समावेश करावा. भूक कमी करण्यासाठी यामुळे मदत होते.

4) भूक कमी करण्यासाठी जेवणापूर्वी पाणी प्यावे ..

जेवणापूर्वी थोडे पाणी पिण्यामुळे पोट भरलेले असल्याने जेवताना कमी भूक लागेल. तसेच अधिकवेळ पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे भूक कमी करण्यासाठी जेवणापूर्वी पाणी पिणे हा एक चांगला उपाय आहे. याशिवाय दिवसभरात वरचेवर पाणी पीत राहावे. यामुळे भूक कमी होते तसेच वाढलेले वजन आणि चरबी कमी होण्यास मदत होते.

भूक कमी करण्यासाठी उपाय –

  • अन्न न खाणे किंवा उपाशी राहणे असले प्रकार करू नका.
  • आहारात प्रोटीन्स, फायबर्स, हेल्दी फॅट्स यांचा समावेश करा.
  • जेवणापूर्वी थोडे पाणी प्या.
  • दिवसभरात पुरेसे पाणी पीत राहावे.
  • भूक लागल्यास तेलकट, चरबी वाढवणारे पदार्थ, फास्टफूड, स्नॅक्स, मिठाई, बेकरी प्रोडक्ट खाणे टाळा.
  • भूक लागल्यास आल्याचा तुकडा चघळावा.
  • दोन ग्रॅम मेथी बिया खाण्यामुळे भूक कमी होते.
  • नियमित व्यायाम करा.
  • पुरेशी झोप घ्यावी. दररोज सात तासांची झोप आवश्यक असते.
  • तणावापासून दूर राहावे.

अशाप्रकारे येथे भूक कमी करण्यासाठी कोणते घरगुती उपाय केले पाहिजे याची माहिती दिली आहे.

Written by - Dr. Satish Upalkar
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.

हे सुध्दा वाचा –
वजन कमी करण्याचे उपाय जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

5 Sources

In this article information about Natural Home remedies to Reduce Hunger and Appetite in Marathi language. This article is written by Dr Satish Upalkar.

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...