बाळाला दूध असे पाजावे :
पहिल्या सहा महिन्यापर्यंत बाळाचे पोषण हे आईच्या दुधावरच होत असते. त्यामुळे बाळाला योग्यप्रकारे स्तनपान करणे आवश्यक असते. बाळाला स्तनपान कसे करावे, दूध पाजताना बाळाला कसे पकडावे याची माहिती येथे दिली आहे.
बाळाला आईचे दूध पाजण्याची पद्धत – Breastfeeding posture :
• आईने शक्यतो बाळाला बसून किंवा आरामदायी झोपून दूध पाजावे.
• दूध पाजण्यापूर्वी व पाजल्यानंतर स्तनाग्रे ओल्या कापसाच्या बोळ्याने पुसावीत.
• स्तनपान करण्यासाठी बाळास योग्य प्रकारे पकडावे.
• स्तनपान करताना निप्पलचा जास्तीत जास्त काळा भाग बाळाच्या तोडात गेला पाहिजे व बाळाची हनुवटी स्तनाला चिकटलेली असावी.
• बाळाची इच्छा नसताना बाळाला बळजबरीने दूध पाजण्याचा प्रयत्न करू नये. बाळाच्या रडण्याचे दुसरे काही कारण असू शकते, केवळ भूकच नव्हे.
बाळाला स्तनपान करताना ही महत्वाची सूचना लक्षात ठेवा :
बाळाला दूध पाजताना दोन्ही बाजूच्या स्तनांचे दूध पाजावे. एका बाजूचे दूध पाजताना ते संपूर्ण दूध प्यायल्यावरच दुसऱ्या बाजूला दूध पाजावे; कारण सुरुवातीस पाण्यासारखे पातळ दूध येते. हे दूध बाळाची तहान भागविते व नंतरचे दूध दाट (हाईड मिल्क) येते. हे दूध बाळाची भूक भागविते व बाळाचे पोषण करत असते.
मात्र जर आईने बाळाला दूध पाजण्यास सुरुवात केल्यावर लगेचच दुसऱ्या बाजूला पाजल्यास बाळाला केवळ पाण्यासारखे दूध (फोअर मिल्क) मिळते, त्यामुळे त्याची तहान भागते; पण भूक भागत नाही. म्हणून बाळ सारखे रडत राहते. तसेच यामुळे बाळाचे पोषण न झाल्याने त्याचे योग्यप्रकारे वजनही वाढत नाही. यासाठी बाळाला दूध पाजताना एकावेळी एका बाजूच्या स्तनानेच पाजले पाहिजे.
हे सुद्धा वाचा..
नवजात बाळाचे वजन वाढवण्यासाठी कोणते उपाय करावेत ते जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
Breastfeeding posture in Marathi. This Medical article Written by Dr. Satish Upalkar.