बाळासाठी स्तनपानाचे महत्त्व –
Breastfeeding importance in Marathi :

बाळासाठी स्तनपान किंवा आईच्या दुधाचे खूप महत्व असते. आईचे दूध हाच पहिल्या सहा महिन्यापर्यंत बाळाचा प्रमुख आहार असतो. बाळंतपणानंतर सुरुवातीला पहिले दोन ते तीन दिवस स्तनातून घट्ट, पिवळसर चीक येतो. याला ‘कोलोस्ट्रम’ असे म्हणतात. नवजात बाळासाठी हा चीक आवश्यक आहे. त्यामुळे त्याला चांगल्या दर्जाची प्रथिने, क्षार यातून मिळतात.

प्रसूतीनंतर बाळाला आईचे दूध पाजणे केंव्हा सुरू करावे..?

डिलिव्हरी झाल्यावर आई आपल्या नवजात बाळास लागेचंच स्तनपान सुरू करू शकते. कारण ब्रेस्ट क्रॉलमुळे स्तनपानाची सुरुवातही एक तासाच्या आतही करता येत असते. तसेच जर सिझेरियन डिलिव्हरी झाल्यास आई शुद्धीवर आल्यानंतर ती आपल्या बाळास लगेचच स्तनपान करू शकते.

डिलिव्हरीनंतर लगेच स्तनपानास सुरुवात करण्याचे फायदे :

• प्रसूतीनंतर बाळाला स्तनपानाठी लगेच जवळ घेतल्याने आईच्या कुशीत बाळाला ऊब मिळते, आईला मानसिक समाधान वाटते.
• प्रसूतीनंतरच्या पहिल्या एक तासात बाळ खूप सतर्क व स्तनपानास उत्सुक असते.
• प्रसूतीनंतर काही दिवस स्तनातून चीक येत असतो. हे चिकदुध बाळाच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त असते.
• प्रसूतीनंतर लगेच स्तनपान केल्याने आईच्या शरीरात स्तनपानाची क्रिया योग्यरित्या सुरू होते.
• प्रसूतीनंतर होणारा रक्तस्त्राव कमी होण्यास मदत होते.
• आई व बाळाचा प्रेमाचा बंध निर्माण होण्यास सुरुवात होते.

नवजात बाळासाठी कोलोस्ट्रम असणाऱ्या चीक दुधाचे फायदे :

• डिलिव्हरीनंतर सुरवातीचे काही दिवस आईच्या स्तनातून येणाऱ्या चीक दुधामध्ये रोगप्रतिकारक शक्ती भरपूर असल्याने बाळाचा जंतूंपासून बचाव होतो.
• बाळाला पहिली शी (मेकॉनियम) होण्यास मदत होते. त्यामुळे नवजात बाळाची कावीळ वाढण्याचा धोका कमी होतो.
• नवजात बाळाच्या आतड्यांचा विकास पूर्ण होण्यास मदत होते.
• सुरवातीच्या चीक दुधात व्हिटॅमिन-A आणि व्हिटॅमिन-K यांचे प्रमाण भरपूर असते.

त्यामुळे चीक दूध व्यवस्थित बाळाला मिळावे यासाठी त्याला वारंवार आईचा स्पर्श द्यावा व बाळाने इच्छा दाखविल्यास त्वरित स्तनपान करावे.


प्रेग्नेंसी, डिलिव्हरी आणि बालसंगोपन विषयक मराठी pdf पुस्तक मोफत डाऊनलोड करण्यासाठी खालील फॉर्मद्वारे संपर्क साधा. Pdf मोफत पुस्तक WhatsApp Number वर पाठवण्यात येईल.

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...