नवजात बाळाचे वजन वाढवण्याचे उपाय –
Newborn baby weight gain :
जर नवजात शिशुचे वजन कमी असल्यास त्यासाठी आईचे दूध हाचं एकमेव व सर्वोत्तम असा पर्याय आहे. नवजात बाळाचे वजन वाढवण्यासाठी प्रत्येक दोन-दोन तासांनी आपल्या नवजात बाळास स्तनपान करावे. आईचे दूध पिण्यामुळे नवजात बाळाचे योग्यप्रकारे वजन वाढण्यास मदत होते. कारण, आईच्या दुधात सर्व पोषकघटक आणि खनिजतत्वे असतात, जी बाळाच्या अधिक चांगल्या विकासासाठी आवश्यक असतात.
बाळाला स्तनपान करताना ही महत्वाची सूचना लक्षात ठेवा :
बाळाला दूध पाजताना दोन्ही बाजूच्या स्तनांचे दूध पाजावे. एका बाजूचे दूध पाजताना ते संपूर्ण दूध प्यायल्यावरच दुसऱ्या बाजूला दूध पाजावे; कारण सुरुवातीस पाण्यासारखे पातळ दूध येते. हे दूध बाळाची तहान भागविते व नंतरचे दूध दाट (हाईड मिल्क) येते. हे दूध बाळाची भूक भागविते व बाळाचे पोषण करत असते.
मात्र जर आईने बाळाला दूध पाजण्यास सुरुवात केल्यावर लगेचच दुसऱ्या बाजूला पाजल्यास बाळाला केवळ पाण्यासारखे दूध (फोअर मिल्क) मिळते, त्यामुळे त्याची तहान भागते; पण भूक भागत नाही. म्हणून बाळ सारखे रडत राहते. तसेच यामुळे बाळाचे पोषण न झाल्याने त्याचे योग्यप्रकारे वजनही वाढत नाही. यासाठी बाळाला दूध पाजताना एकावेळी एका बाजूच्या स्तनानेच पाजले पाहिजे.
नवजात बालक आईचे दूध पित नसल्यास असे वाढवा त्याचे वजन :
जर आपले बाळ वेळेपूर्वी जन्मलेले असल्यास काहीवेळा अशी बालके आईचे दूध पिण्यास असमर्थ असू शकतात. अशावेळी आपण स्तनपंप मशीनद्वारे आपले दूध काढून ते चमच्याने आपल्या बाळास पाजावे.
तसेच काही कारणांमुळे नवजात बाळांना आईचे दूध मिळत नाही. अशावेळी, डॉक्टर आपल्या बाळासाठी योग्य ते फॉर्म्युला दूध देण्यास सांगू शकतात. त्यांच्या सल्ल्याने ते आपल्या बाळास पाजावे. वरील दोन्ही स्थितींमध्ये बाळास दर दोन तासांनी पंपाने काढलेले दूध किंवा तयार केलेले फॉर्म्युला दूध दिले पाहिजे. यामुळे नवजात बाळाचे वजन योग्य प्रमाणात वाढण्यास मदत होईल.
तसेच बाळास दूध दिल्यानंतर बाळाचे पोट भरले आहे की नाही याची खात्री करुन घ्यावी. यासाठी बाळाच्या शी कडे लक्ष द्यावे. जर बाळ दिवसातून 6 वेळा शी आणि लघवी करत असल्यास, याचा अर्थ असा होतो की बाळाचे पोट भरत असून त्याला आईच्या दुधातून आवश्यक ते पोषण मिळत आहे. बालकास योग्यप्रकारे पोषण मिळत राहिल्यास साहजिकच त्याचे वजन वाढण्यास मदत होईल.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
हे सुद्धा वाचा..
नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी ते जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
Tips for Newborn baby weight gain in Marathi. This Medical article Written by Dr. Satish Upalkar.
प्रेग्नेंसी, डिलिव्हरी आणि बालसंगोपन विषयक मराठी pdf पुस्तक मोफत डाऊनलोड करण्यासाठी खालील फॉर्मद्वारे संपर्क साधा. Pdf मोफत पुस्तक WhatsApp Number वर पाठवण्यात येईल.