कवट फळ – Wood Apple :
कवठ ह्या फळाविषयी माहिती फारच थोड्या लोकांना असेल. कठीण आवरण असणारे हे फळ चवीला आंबटगोड असते. त्यामुळे मसालेदार चटणीमध्ये याचा प्रामुख्याने वापर केला जातो. तसेच उपवासाला देखील कवट हे फळ खाल्ले जाते. या फळाला Elephant Apple किंवा Wood Apple या नावांनी सुध्दा ओळखले जाते.
आरोग्यासाठी कवठ हे फळ फायदेशीर असते. यामुळे भूक वाढते. कवठमध्ये असणाऱ्या फायबरमुळे पोट साफ होण्यासाठी मदत होते. मूळव्याध समस्या कमी होते. कवठ फळ खाल्याने जुलाब, उलट्या व मळमळ कमी होते. पोटातील जंत कमी होतात. तसेच हृदयाच्या आरोग्यासाठी हे फळ चांगले असते.
कवठ खाण्याचे आरोग्यदायी 4 फायदे –
1) भूक लागण्यासाठी उपयुक्त –
कवठ खाल्ल्याने भूक वाढण्यास मदत होते. त्यामुळे पुरेशी भूक लागत नसल्यास हे फळ जरूर खावे.
2) पोट साफ होण्यासाठी उपयुक्त –
कवठ फळात मुबलक प्रमाणात फायबर असते. त्यामुळे पोट साफ होण्यासाठी मदत होते. ज्यांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांनी हे फळ खाल्ले पाहिजे. तसेच यामुळे मूळव्याधची समस्या देखील कमी होण्यास मदत होते.
3) पोटाच्या विकारांवर उपयोगी –
पोटातील जंत कमी होण्यास यामुळे मदत होते. तसेच जुलाब लागल्यास किंवा उलट्या व मळमळ होत असल्यास कवठ खाल्ल्याने आराम मिळतो.
4) हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त –
कवठ हे वाईट कोलेस्टेरॉल कमी करते तसेच यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होत असल्याने हृदयाच्या आरोग्यासाठी हे फळ चांगले असते.
कवठ खाण्याचे नुकसान –
जास्त प्रमाणात कवठ खाल्ल्यास पोटात दुखणे, गॅस होणे, अपचन होणे, ॲसिडीटी होते असे त्रास होऊ शकतात.
कवठ कसे खावे ..?
पिकलेलेचं कवठ फळ खाल्ले पाहिजे. कच्चे कवठ खाऊ नये. कारण कच्चे कवठ खाल्ल्याने कफाचा त्रास वाढून सर्दी खोकला होणे, डोके दुखणे असे त्रास होऊ शकतात.
मधुमेह रुग्णांनी कवठ फळ खावे का ..?
कवठ फळ खाल्ल्याने रक्तातील साखर कमी होऊ शकते. त्यामुळे डायबेटिस रुग्णांनी जास्त प्रमाणात हे फळ खाऊ नये. कधीतरीच आणि तेही थोड्या प्रमाणातचं कवठ फळ मधुमेही रुग्णांनी खाल्ले पाहिजे.
हे सुध्दा वाचा – फणस खाण्याचे फायदे जाणून घ्या..
Read Marathi language article about Kavat Fruit or Wood Apple Health Benefits and side effects. Last Medically Reviewed on February 29, 2024 By Dr. Satish Upalkar.