Dr Satish Upalkar’s article about Bael fruit or wood apple benefits in Marathi.

Bael fruit health benefits in Marathi article by Dr Satish Upalkar.

बेल फळ – Bael fruit :

बेलाचे फळ बऱ्याच जणांना ऐकून माहीत आहे. धार्मिक विधीमध्ये याचा वापर केला जातो. बेल फळ हे आवश्यक पोषक तत्वांनी भरलेले असते. म्हणूनच विविध आयुर्वेदिक औषधात बेल फळाचा उपयोग केला जातो. बेल फळ हे चवीला गोड असून ते सुगंधी फळ आहे. याची कच्ची फळे हिरवी-राखाडी असतात तर फळे पिकल्यावर ती पिवळी होतात. बेल फळाचा रस बनवला जातो.

बेल फळातील पोषक घटक –

बेल फळामध्ये व्हिटॅमिन सी, बीटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स अशी जीवनसत्वे असतात. तसेच यात पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, जस्त, तांबे आणि लोह अशी खनिजे व क्षार घटक असतात. याशिवाय यात प्रोटीन्स, फायबर असे पोषकघटक देखील असतात.

बेलाचे फळ खाण्याचे फायदे –

आरोग्यासाठी बेलाचे फळ फायदेशीर असते. यामुळे पोट साफ होते, मूळव्याधचा त्रास कमी होतो. बेल फळ खाण्यामुळे जुलाब, अतिसार थांबते. मायग्रेन डोकेदुखी कमी होते. त्वचा विकार दूर होतात. रोग प्रतिकारशक्ती वाढते. तसेच हृदयाच्या आरोग्यासाठी हे फळ चांगले असते. यामुळे कोलेस्टेरॉल कमी होते असे अनेक फायदे बेलाचे फळ खाण्यामुळे होतात.

1) पचनक्रिया सुधारते..
बेल फळामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात. यामुळे पोट व्यवस्थित साफ होऊन बद्धकोष्ठता, मूळव्याध सारख्या समस्या दूर होतात. तसेच यामुळे पचनक्रिया देखील सुधारते. जुलाब व अतिसार थांबवण्यासाठी यामुळे मदत होते. गॅस्ट्रिक अल्सरचा त्रास कमी होण्यास देखील मदत होते. त्यामुळे अल्सर असणाऱ्यांनी बेलाचे फळ जरूर खावे.

2) कोलेस्ट्रॉल कमी करते..
बेल फळाचा रस कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो आणि रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी देखील कमी करतो. बेल फळातील अँटिऑक्सिडंट्समुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. यात कार्डियोप्रोटेक्टिव एजेंट असल्याने हृदयासाठी बेल फळ फायदेशीर असते.

3) डायबेटिस मध्ये उपयुक्त..
बेलाचे फळ खाण्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी होण्यास मदत होते. तसेच यामुळे स्वादुपिंडाचे कार्य देखील सुधारून इंसुलिन तयार करण्यास मदत होते.

4) त्वचा विकारात उपयोगी..
बेल फळातील अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगस आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांमुळे, त्वचेच्या विविध विकारांवर हे फळ गुणकारी असते. यामुळे त्वचेवर पुरळ उठणे, त्वचेला खाज सुटणे अशा समस्या कमी होतात. पांढरे कोड असणाऱ्यांनी जरूर याचा रस सेवन करावा.

5) रक्त शुद्ध करते..
बेलाच्या फळात डिटॉक्सिफायिंग एजंट असतात. त्यामुळे हे फळ खाण्यामुळे यकृतातील विषारी घटक लघवीवाटे बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे रक्त शुद्ध होऊन बऱ्याच आरोग्य समस्या दूर होतात.

6) रोग प्रतिकारशक्ती वाढते..
बेल फळात व्हिटॅमिन-C आणि महत्वाच्या अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण मुबलक असल्याने रोग प्रतिकारशक्ती चांगली राहण्यास मदत होते. त्यामुळे सर्दी खोकला, ताप अशा आजारांपासून संरक्षण होते.

7) कर्करोगाचा धोका कमी होतो..
बेल फळात फ्री रॅडिकल्सला नष्ट करणारे अँटिऑक्सिडंट्स असतात. कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी यामुळे फायदा होऊ शकतो. बेल फळाच्या ज्यूसचे नियमित सेवन केल्याने स्तनाचा कर्करोग टाळता येतो, असे अभ्यासात दिसून आले आहे.

8) स्तनदा मातांसाठी फायदेशीर..
बेलाचे फळ खाण्यामुळे प्रोलॅक्टिन आणि कॉर्टिकोइड्सच्या उत्पादनास चालना मिळते. त्यामुळे आईचे दूध वाढण्यास मदत होते. यासाठी स्तनपान करणाऱ्या मातांनी बेल फळाच्या रसात सुंठ आणि गूळ घालून प्यावे.

9) डोकेदुखीवर उपयुक्त..
मायग्रेन डोकेदुखी असणाऱ्यांनी बेल फळाचा रस प्यावा. यामुळे मायग्रेन डोकेदुखीची समस्या दूर होण्यास होते.

बेल फळ कसे खावे..?

पिकलेल्या बेल फळाचा गर काढून तो खाऊ शकता. गर खाताना त्याच्या बिया काढून टाकाव्यात. तसेच बेलाच्या गराचा रस करून पिऊ शकता. यापासून सरबत बनवले जाते. उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला थंडावा देणारे याचे सरबत जरूर प्यावे. याशिवाय बेल फळाच्या गरापासून मुरब्बा देखील बनवला जातो.

बेल फळ खाण्याचे नुकसान व होणारे तोटे –

अधिक प्रमाणात बेल फळ किंवा त्याचा रस पिण्यामुळे पोट बिघडू शकते. यामुळे अपचन, पोटदुखी, जुलाब अशा तक्रारी होऊ शकतात.

बेलाचे फळ कोणी खाऊ नये..?

  • बेल फळात फॉस्फरसचे प्रमाण अधिक असल्याने किडनी विकार असणाऱ्यांनी हे फळ खाऊ नये.
  • कॅल्शियम देखील यात भरपूर असल्याने मूतखडा असणाऱ्यांनी बेलाचे फळ खाऊ नये.
  • डायबेटिस रुग्णांनी थोड्या प्रमाणातच हे फळ खाल्ले पाहिजे. कारण जास्त खाल्याने रक्तातील साखर वाढण्याची शक्यता असते.

बेल फळातील पोषक तत्वे – Nutritional Value :
100 ग्रॅम बेल फळात असणारे पोषक घटक पुढीलप्रमाणे आहेत.

  • ऊर्जा – 137 k.cal
  • पाणी – 61.5gm
  • प्रोटीन – 1.8gm
  • Fat – 0.3
  • मिनरल – 1.7gm
  • फायबर – 2.9gm
  • कार्बोहाइड्रेट – 31.8gm
  • कैल्शियम – 85.00mg
  • फास्फोरस – 50mg
  • पोटैशियम – 600mg
  • विटामिन सी – 8mg
Written by - Dr. Satish Upalkar
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.

हे सुध्दा वाचा – फणस खाण्याचे फायदे जाणून घ्या..

In this article information about Bael fruits or Wood apple benefits and side effects in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar (Certified physician and Healthcare expert).

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...

Join the Conversation

4 Comments

  1. उपयुक्त माहिती….आरोग्यं खलु धर्म साधनम्

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *