Dr Satish Upalkar’s article about Stomach heat problem solutions in Marathi.
पोटात उष्णता होणे –
पोटात उष्णता वाढल्याने पोटात जळजळ होणे, घाम जास्त येणे, अंगावर फोड येणे, चेहऱ्यावर मुरुम येणे, डोके सारखे दुखणे यासारखे त्रास होऊ लागतात. या लेखात पोटातील उष्णता कमी करण्याचे उपाय सांगितले आहेत.
पोटात उष्णता वाढण्याची कारणे –
- मसालेदार, तिखट पदार्थ, मांसाहारी पदार्थ अधिक खाण्यामुळे पोटातील उष्णता वाढते.
- चहा कॉफी वारंवार पिण्यामुळे पोटात उष्णता वाढते.
- वारंवार डोकेदुखी किंवा अंगदुखीच्या वेदनाशामक गोळ्या खाण्यामुळे पोटातील उष्णता वाढते.
- मद्यपान, तंबाखू, सिगारेट यासारख्या व्यसनांमुळे देखील पोटातील उष्णता वाढते.
पोटातील उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय –
- एक चमचा धने व जिरे रात्रभर पाण्यात भिजत घालावेत. आणि सकाळी उठल्यावर ते पाणी गाळून घेऊन प्यावे. यामुळे लघवीवाटे शरीरातील उष्णता बाहेर पडण्यास मदत होते.
- पोटातील उष्णता कमी करण्यासाठी दिवसभरात वरचेवर पाणी पीत राहावे. याशिवाय शहाळ्याचे पाणी, ताज्या फळांचा रस असे द्रवपदार्थ प्यावेत.
- पोटातील उष्णता कमी करण्यासाठी जिरेपूड घातलेले ताक प्यावे. ताक पिण्यामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते.
- जेवणानंतर बडीशेप खावी. बडीशेप ही शीत गुणांची असते. यामुळे पोटातील उष्णता कमी होते. हे घरगुती उपाय पोटात उष्णता वाढणे यावर उपयोगी पडतात.
पोटातील उष्णता आणि आहार पथ्य –
- पोटात उष्णता अधिक असल्यास चिकन, मांस, मासे, अंडी असे मांसाहारी पदार्थ खाणे कमी करावे.
- तेलकट, मसालेदार पदार्थ वारंवार खाणे टाळावे.
- चहा-कॉफीचे प्रमाण कमी करावे.
- कलिंगड, डाळींब, संत्री यासारखी रसदार फळे खावीत.
- मद्यपान, तंबाखू सिगारेट अशा व्यसनांपासून दूर राहावे.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
हे सुध्दा वाचा – अल्सर विषयी माहिती व उपाय जाणून घ्या..
In this article information about potatil ushnata kami karnyache upay in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar (Certified physician and Healthcare expert).