Kavat Fruit or Wood Apple Health Benefits in Marathi.

Kavat Fruit health benefits in marathi article by Dr Satish Upalkar.

कवट फळ – Wood Apple :

कवठ ह्या फळाविषयी माहिती फारच थोड्या लोकांना असेल. कठीण आवरण असणारे हे फळ चवीला आंबटगोड असते. त्यामुळे मसालेदार चटणीमध्ये याचा प्रामुख्याने वापर केला जातो. तसेच उपवासाला देखील कवट हे फळ खाल्ले जाते. या फळाला Elephant Apple किंवा Wood Apple या नावांनी सुध्दा ओळखले जाते.

कवठ खाण्याचे फायदे –

आरोग्यासाठी कवठ हे फळ फायदेशीर असते. यामुळे भूक वाढते. कवठमध्ये असणाऱ्या फायबरमुळे पोट साफ होण्यासाठी मदत होते. मूळव्याध समस्या कमी होते. कवठ फळ खाल्याने जुलाब, उलट्या व मळमळ कमी होते. पोटातील जंत कमी होतात. तसेच हृदयाच्या आरोग्यासाठी हे फळ चांगले असते. असे अनेक फायदे कवठ फळ खाण्यामुळे होतात.

भूक लागण्यासाठी उपयुक्त –
कवठ खाल्ल्याने भूक वाढण्यास मदत होते. त्यामुळे पुरेशी भूक लागत नसल्यास हे फळ जरूर खावे.

पोट साफ होण्यासाठी उपयुक्त –
कवठ फळात मुबलक प्रमाणात फायबर असते. त्यामुळे पोट साफ होण्यासाठी मदत होते. ज्यांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांनी हे फळ खाल्ले पाहिजे. तसेच यामुळे मूळव्याधची समस्या देखील कमी होण्यास मदत होते.

पोटाच्या विकारांवर उपयोगी –
पोटातील जंत कमी होण्यास यामुळे मदत होते. तसेच जुलाब लागल्यास किंवा उलट्या व मळमळ होत असल्यास कवठ खाल्ल्याने आराम मिळतो.

हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त –
कवठ हे वाईट कोलेस्टेरॉल कमी करते तसेच यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होत असल्याने हृदयाच्या आरोग्यासाठी हे फळ चांगले असते.

कवठ खाण्याचे नुकसान –

जास्त प्रमाणात कवठ खाल्ल्यास पोटात दुखणे, गॅस होणे, अपचन होणे, ॲसिडीटी होते असे त्रास होऊ शकतात.

कवठ कसे खावे ..?

पिकलेलेचं कवठ फळ खाल्ले पाहिजे. कच्चे कवठ खाऊ नये. कारण कच्चे कवठ खाल्ल्याने कफाचा त्रास वाढून सर्दी खोकला होणे, डोके दुखणे असे त्रास होऊ शकतात.

मधुमेह रुग्णांनी कवठ फळ खावे का ..?

कवठ फळ खाल्ल्याने रक्तातील साखर कमी होऊ शकते. त्यामुळे डायबेटिस रुग्णांनी जास्त प्रमाणात हे फळ खाऊ नये. कधीतरीच आणि तेही थोड्या प्रमाणातचं कवठ फळ मधुमेही रुग्णांनी खाल्ले पाहिजे.

Written by - डॉ. सतीश उपळकर
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास येथे क्लिक करून आमचे YouTube चॅनल Subscribe करा.

हे सुध्दा वाचा – फणस खाण्याचे फायदे जाणून घ्या..

In this article information about Wood apple benefits and side effects in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar (Certified physician and Healthcare expert).

माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल जरूर Subscribe करा.


सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...

Leave a comment

Your email address will not be published.