Dr Satish Upalkar’s article about Mucus in stool or aav padne upay in Marathi.

aav padne upay in Marathi article by Dr Satish Upalkar.

आव पडणे म्हणजे काय..?

आव पडणे यामध्ये पोटात कळ येऊन जेलीसारखा द्रवपदार्थ संडासवाटे बाहेर पडतो. या त्रासात वारंवार शौचाला लागते. यामध्ये पोटात कळ येऊन शौचाला होते, शौचाला घाण वास येतो, पोट बिघडते तसेच काहीवेळा शौचावाटे रक्तही पडू शकते. या लेखात संडासात आव पडणे याची कारणे व उपाय याविषयी माहिती या लेखात डॉ सतीश उपळकर यांनी सांगितली आहे.

आव पडणे याची कारणे –

दूषित अन्न, दूषित पाणी यातून जंतुसंसर्ग झाल्यामुळे पोट बिघडते व संडास वाटे आव पडत असतो. अमीबियासिस ह्या आजारामुळे देखील आव पडतो. अमिबियासिस हा Entamoeba histolytica या परजीवी च्या संसर्गामुळे होतो. याची लागण सुद्धा दूषित अन्न, दूषित पाणी यातून होते.

संडास मधून आव पडणे याची लक्षणे –

अशी लक्षणे यामध्ये जाणवू लागतात.

आव पडणे यावर घरगुती उपाय –

उपाय क्रमांक 1 –
आव पडत असल्यास ताकात थोडे हिंग, सुंठ, मिरी, जिरे आणि सैंधव मीठ घालून ते ताक प्यावे.

उपाय क्रमांक 2 –
संडासात आव पडत असल्यास गरम पाण्यात अर्धा चमचा सुंठ मिसळून ते पाणी प्यावे.

उपाय क्रमांक 3 –
संडास मधून आव पडत असल्यास झोपण्यापूर्वी ग्लासभर गरम दुधात चमचाभर तूप मिसळून प्यावे.

उपाय क्रमांक 4 –
संडास मध्ये आव पडत असल्यास दहीभात खावा. तसेच मेथी दाण्याचे चूर्ण दह्यात मिसळुन खाल्याने आव पडणे थांबते. हे उपाय संडासात आव पडणे यावर उपयोगी पडतात.

संडास मध्ये आव पडत असल्यास घ्यायची काळजी –

  • बाहेरचे उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे टाळावे.
  • उकळवून गार केलेले पाणी पिण्यासाठी वापरावे.
  • पुरेसे पाणी तसेच शहाळ्याचे पाणी, लिंबूपाणी, ताज्या फळांचा रस असे द्रवपदार्थ प्यावेत.
  • आव पडत असल्यास हलका आहार घ्यावा.
  • यावेळी मसालेदार, तिखट, पचनास जड असणारे पदार्थ खाणे टाळावे.
  • बाहेरून आल्यावर हात, पाय साबणाने स्वच्छ धुवावेत.
  • जेवण्यापूर्वी आपले हात साबणाने स्वच्छ धुवावेत.
  • भाज्या व फळे स्वच्छ धुवूनचं खावीत.

आव पडणे यावरील औषध उपचार –

आमांशमुळे आव पडत असल्यास मेट्रोनिडॅझोल यासारखे औषध दिले जाते. यासोबतच अँटिबायोटिक्स औषधे देखील उपचारामध्ये दिले जाऊ शकतात.

Written by - डॉ. सतीश उपळकर
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास येथे क्लिक करून आमचे YouTube चॅनल Subscribe करा.

हे सुध्दा वाचा – जुलाब वरील उपाय जाणून घ्या..

In this article information about Mucus in My Stool Causes, Symptoms, Treatments and Home remedies in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar (Certified physician and Healthcare expert).

माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल जरूर Subscribe करा.


सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...

Leave a comment

Your email address will not be published.