Half headache home remedies in Marathi.
अर्धे डोके दुखणे –
अर्धे डोके दुखणे हा त्रास आपल्यापैकी अनेकांना वरचेवर होत असतो. अर्ध डोके दुखू लागणे ही एक सामान्य अशी न्यूरोलॉजिकल समस्या आहे. अपुरी झोप, डोळ्यावर प्रखर प्रकाश पडणे, मोठा आवाज ऐकू येणे किंवा पित्त वाढवणारा आहार अशा अनेक ट्रिगर्समुळे हा त्रास सुरू होतो. यामुळे अर्धे डोके दुखू लागते, डोळ्यासमोर अंधारी येते, मळमळ होणे यासारखे त्रास होत असतात. यासाठी अर्धे डोके दुखणे यावरील उपाय यांची माहिती या लेखात डॉ सतीश उपळकर यांनी सांगितली आहे.
अर्धे डोके दुखणे याची कारणे – Half head pain reasons in Marathi :
अर्धे डोके दुखणे यासाठी अनेक कारणे ही निमित्त म्हणून जबाबदार असतात. म्हणूनचं त्या कारणांना ट्रिगर असे म्हणतात. असे कोणकोणते ट्रिगर आहेत की ज्यामुळे अर्ध डोके दुखण्याचा त्रास सुरू होऊ शकतो त्यांची माहिती खाली दिली आहे.
- डोळ्यांवर एकाएकी जास्त उजेड पडणे,
- पित्त वाढविणारा आहार खाणे. जसे, मसालेदार पदार्थ, तेलकट-तिखट-खारट पदार्थ, फास्टफूड, चहा-कॉफी अधिक प्रमाणात खाण्यामुळे अर्धे डोके दुखू लागते,
- पुरेशी झोप न झाल्याने अर्धे डोके दुखू लागते,
- काही औषधांचे साईड इफेक्ट्स,
- स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही यांचा अतिवापर,
- पाणी कमी पिण्याची सवय,
- हॉर्मोन्समधील असंतुलन,
- प्रेग्नन्सी, मासिक पाळीमध्ये होणाऱ्या हॉर्मोन्समधील बदल,
- मोठा गोंगाट कानावर पडणे,
- उग्र वासात राहणे,
- मानसिक ताणतणावामुळे अर्धे डोके दुखू लागते,
- अतीप्रवास,
- सिगारेट-तंबाखू, धूम्रपान, मद्यपान यासारखी व्यसने अशी अनेक कारणे ही अर्धे डोके दुखणे यासाठी निमित्त ठरू शकतात.
हे सुद्धा वाचा – पित्त कमी करण्याचे उपाय जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्धे डोके दुखणे याची लक्षणे –
अर्धे डोके दुखण्यापूर्वी डोळ्यासमोर अंधारी येणे, काजवे चमकणे, डोळ्यांना उजेड सहन न होणे, आवाज सहन न होणे असे त्रास होतात. त्यानंतर थोड्या वेळाने अर्धे डोके दुखू लागते. यावेळी मळमळणे, उलट्या होणे, अस्वस्थ वाटणे यासारखी लक्षणे जाणवतात. काही जणांना उलटी झाल्यानंतर बरे वाटू लागते. तर काही जणांचे संपूर्ण दिवसभर अर्धे डोके दुखत असते. अशी लक्षणे यामध्ये जाणवतात.
याशिवाय काही जणांना या त्रासात डोक्यात मुंग्या येणे, बोलण्यास त्रास होणे, हातपाय हलवता न येणे असे तात्पुरते त्रासही होऊ शकतात.
अर्धे डोके दुखणे यावर घरगुती उपाय – Half headache home remedies in Marathi :
- आल्याचा तुकडा चावून खाल्ल्यास अर्धे डोके दुखणे हा त्रास कमी होतो.
- दालचिनी पावडरमध्ये पाणी मिसळून पेस्ट करून ती कपाळाला लावावी. यामुळे अर्धे डोके दुखणे थांबते.
- थोड्या लवंगा तव्यावर गरम करून रुमालात गुंडाळून त्या हुंगत राहावे. हा आयुर्वेदिक उपाय अर्धे डोके दुखणे यावर प्रभावी आहे.
- देशी गाईच्या तुपाचे 2-2 ड्रॉप्स नाकात घालावे.
- दुख्णाऱ्या जागी थंड पाण्याची पट्टी ठेवल्यास अर्धे डोके दुखणे कमी होते.
- काहीवेळ झोप व विश्रांती घ्या.
हे सर्व घरगुती उपाय अर्धे डोके दुखणे यावर खूप उपयोगी ठरतात.
अर्धे डोके दुखणे यावरील उपचार –
अर्धे डोके दुखणे यावर आपले डॉक्टर वेदनाशामक औषधे देतील. याशिवाय मळमळ व उलट्या थांबवण्यासाठीही काही औषधे ते देऊ शकतात.
अनेकांना अर्धे डोके दुखणे हा त्रास वरचेवर होत असतो. अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय यावर उठसुठ वेदनाशामक गोळ्या (पेनकिलर्स) घेणे योग्य नाही. यापेक्षा डॉक्टरांकडे जाऊन निदान व तपासणी करून योग्य उपचार करून घ्यावेत. तसेच खाली काही उपाय दिले आहेत. त्यायोगे अर्धे डोके दुखणे या त्रासापासून कायमस्वरूपी सुटका होण्यासाठी मदत होईल.
अर्ध डोके दुखू नये यासाठी घ्यायची काळजी –
- आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या यांचा समावेश करा.
- ज्यादा वेळ उपाशी राहू नका.
- दिवसभरात किमान 8 से 10 ग्लास पाणी प्यावे.
- मसालेदार पदार्थ, तेलकट-तिखट-खारट पदार्थ, फास्टफूड ह्यासारखे पदार्थ वारंवार खाणे टाळा.
- चहा-कॉफी वारंवार पिणे टाळा.
- रोजच्यारोज पोट साफ राहील याची काळजी घ्या.
- स्मार्टफोन, कॉम्प्युटर, लॅपटॉप, टीव्हीसमोर सतत बसू नका.
- जास्त प्रकाशाच्या उजेडकडे पाहणे टाळा.
- जागरण करणे टाळा. दररोज किमान 6 ते 7 तासांची झोप घ्यावी.
- नियमित व्यायाम करा. दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करा. मोकळ्या हवेत फिरायला जा.
- मानसिक ताणतणाव, चिंता यापासून दूर रहा.
- तंबाखू, गुटखा, सिगरेट अशी व्यसन टाळा.
अशी काळजी घेतल्यास अर्धे डोके दुखण्याचा त्रास पूर्णपणे दूर होण्यास मदत होते.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
हे सुद्धा वाचा – सायनस डोकेदुखी वरील उपाय जाणून घ्या..
4 SourcesIn this article information about half headache pain reason and Home remedies in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar.