आहाराचे महत्त्व –
आपल्याला जगण्यासाठी आहाराची गरज असते. आपण घेतलेल्या अन्नातूनचं शरीराला ऊर्जा मिळते, शरीराची झीज भरून काढली जाते. तसेच त्या ऊर्जेवर शरीरक्रिया चालत असतात. त्यामुळे आहाराचे असाधारण महत्त्व असते. हेल्दी राहण्यासाठी याठिकाणी उपयुक्त अशा आहार टीप्स सांगितल्या आहेत.
ह्या आहार टीप्सची देखील माहिती जाणून घ्या..
- गरम पाणी पिण्याचे फायदे
- जवस खाण्याचे फायदे व तोटे
- लसूण खाण्याचे फायदे
- केळी खाण्याचे फायदे
- मधाचे फायदे
- दही खाण्याचे फायदे
- ताक पिण्याचे फायदे
- बदाम खाण्याचे फायदे व नुकसान
हेल्दी आहार –
आपल्याला निरोगी राहण्यासाठी विशिष्ट प्रमाणात कॅलरी आणि विविध पोषकतत्वांची आवश्यकता असते. हेल्दी आहार घेतल्यास हेल्दी राहता येते. जंकफूड, फास्टफूड यासारखा निकृष्ट आहार घेतल्यास आरोग्य धोक्यात येते. यासाठी आपण हेल्दी आहारचं घेण्याला प्राधान्य दिले पाहिजे.
ज्या आहरातून शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्वे मिळतात त्या आहाराला ‘हेल्दी आहार’ असे म्हणतात. यालाच संतुलित आहार किंवा पौष्टिक आहार असेही म्हणतात. हेल्दी आहारात कर्बोदके, प्रथिने (प्रोटीन्स), स्निग्ध पदार्थ (हेल्दी फॅट्स), फायबर, जीवनसत्वे, खनिजे आणि क्षार या पोषकघटकांचा अंतर्भाव होतो.
हेल्दी राहण्यासाठी काय खावे ..?
हेल्दी राहण्यासाठी पोषकघटकांनी परिपूर्ण आणि संतुलित असा आहार घ्यावा. यासाठी तुमच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, फळभाज्या, शेंगभाज्या, धान्ये, कडधान्ये, सुकामेवा (Dry fruits), दूध, दुधाचे पदार्थ, अंडी, मांस, मासे यांचा समावेश करा. तसेच दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे. याशिवाय ताज्या फळांचा रस, शहाळ्याचे पाणी असे तरल पदार्थ आहारात समाविष्ट करावेत.
हेल्दी राहण्यासाठी काय खाऊ नये ..?
चरबी वाढवणारे पदार्थ, तेलकट पदार्थ, साखरेचे पदार्थ, खारट पदार्थ, मैद्याचे पदार्थ, जंकफूड, फास्टफूड खाणे टाळले पाहिजे. सोडायुक्त कोल्ड्रिंक्स पिणे टाळावे. चहा, कॉफी यांचे प्रमाणही कमी करावे. तसेच धुम्रपान, मद्यपान, तंबाखू अशा व्यसनांपासून दूर राहावे.
सॅच्युरेटेड फॅट्स असणारे पामतेल, नारियल तेल, तूप, साय, लोणी, प्राणीज चरबी, अंड्यातील पिवळा बलक हे पदार्थ खाणे कमी करावे. सॅच्युरेटेड फॅट्सच्या अतिसेवनाने वाईट कोलेस्टेरॉलमध्ये वाढ होते. यांमुळे हृद्यविकार, उच्च रक्तदाब, धमनीकाठिन्यतः, लठ्ठपणा, मधुमेह यासारख्या समस्या उत्पन्न होतात. तसेच ट्रांस फॅट्स असणारे वनस्पती तूप यासारखे पदार्थ खाणे टाळावे.
Read Marathi language article about Diet and Nutrition tips. Last Medically Reviewed on February 26, 2024 By Dr. Satish Upalkar.