उन्हाळा आणि आहार :
उन्हाळ्याच्या दिवसात जाठराग्नि मंद असतो. त्यामुळे आहाराचे योग्य प्रकारे पचन होण्यासाठी पचणास हलका आहार घेणे आवश्यक असते. तसेच उन्हाळ्यात आहार कमी प्रमाणातच घ्यावा लागतो. उन्हाळा ऋतू सुरू झाल्यावर आहार कोणता घ्यावा याची माहिती खाली दिली आहे.
उन्हाळ्यातील आहार असा असावा :
विविध पेये –
माठातील थंड पाणी, कोकम सरबत, लिंबू सरबत, शहाळाचे पाणी, विविध फळांचे रस, ताक, लस्सी, नाचण्याचे अंबिल इ. पेयांचे उन्हाळ्यामध्ये सेवन करणे हितकारक असते.
फळे –
उन्हाळ्याच्या दिवसामध्ये द्राक्षे, टरबूज, कलिंगड, करवंदे, फणस, आंबे, डाळिंब यासारखी रसदार फळे खावीत.
पालेभाज्या व फळभाज्या –
उन्हाळ्यामध्ये पालेभाज्यांची टंचाई असते. आहारात विविध फळभाज्या, पालेभाज्यांचा समावेश असावा. काकडी, गाजर, बीट, टोमॅटो आणि कांद्याचे कोशिंबीर आहारात ठेवावे.
मसाला –
उन्हाळ्यामध्ये आहारात मसाल्यांचा वापर अत्यंत कमी प्रमाणातच करावा. मुळात मसाले हे उष्ण गुणाचे असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात मसाले अतिप्रमाणात वापरणे टाळावे.
मांसाहार –
उन्हाळ्यामध्ये जाठराग्नि मंद असल्याने पचनास जड असणारे मांसाहारी पदार्थ अल्प प्रमाणामध्येच सेवन करणे हिताचे असते. मांसाहारामध्ये मसाल्यांचा अतिवापर करणे टाळावे.
उन्हाळ्यामध्ये दुध, दही, ताक, लस्सी, तुप यांचा वापर आहारामध्ये करावा. सामान्य आहारातील भात, भाकरी यांचा समावेशही असावा. मात्र फ्रीजमधील अतिथंड पाणी पिणे टाळावे. आईस्क्रीम, विविध शीतपेये यांचा ठराविक प्रमाणामध्येच वापर करावा.
आहारसंबंधीत हे सुद्धा वाचा..
उत्तम आरोग्यासाठी भाज्या कशा शिजवाव्यात?
ताज्या आहाराचे महत्व
पावसाळ्यात काय खावे?
हिवाळ्यात कोणते पदार्थ खावेत?
Read Marathi language article about summer season diet plan. Last Medically Reviewed on March 8, 2024 By Dr. Satish Upalkar.